Sunday 7 August 2016

माझे सदगुरु - माझे एकमेव प्रत्यक्ष मित्र !

नुकतेच एका नवीन विषयाने माझे कुतूहल चाळवले गेले. माझ्या खांद्याचे ऑपरेशन झाले आणि दररोज फिजीओथेरपी करावी लागत असे. त्या दरम्यान त्या फिजीओथेरपीस्टशी बोलताना एक नवीन ज्ञानाचे दालन खुले झाले. त्या हॉस्पिटलमध्ये रिसर्च सेंटर (संशोधन विभाग ) कार्यरत आहे. त्याचा एक हिस्सा म्हणून तेथील सर्व डॉक्टर्सना आपापल्या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत (अपडेट) ठेवण्यासाठी सूचना दिली जाते आणि तसाच तो आग्रह कार्यान्वितही केला जातो Corporate Progress Developemnet(CPD) ह्या योजने अंतर्गत !

विवीध देशांत विवीध ठिकाणी वेगेवेगळ्या स्तरांवर शास्त्रज्ञ संशोधन करत असतात मग ते वैद्यकीय क्षेत्रात असेल, कॉम्पुटरमध्ये असेल, नॅनो टेकनॉलॉजीमध्ये असेल , मोबाईलच्या क्षेत्रात असेल. ह्या सार्‍या संशोधनाचे चांगले-वाईट असे परिणाम असू शकतात. परंतु मानव हा  नेहमी ह्याच संशोधनाच्या आधारांनी आपली प्रगती , विकास साधत असतो. "गरज ही शोधांची जननी आहे" असे ह्याच करीता म्हटले जात असावे , नाही का बरे ?

गप्पांच्या दरम्यान मला त्या फिजीओथेरापिस्ट्ने सांगितले की कामाच्या वेळेतील दर आठवड्यातील दोन तासांचा वेळ हा त्या प्रत्येकाला जगामध्ये नाना ठिकाणी मग ते राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही संशोधन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांशी निगडीत सुरु असते त्यावर माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने दिला जातो. अर्थात ह्या वेळेत त्यांना त्या वेळेत नियोजित काम करायचे नसून नवीन माहिती , शोध एकत्रित करायचे असतात. दर आठवड्याला त्यांच्या ग्रूपला एक विषय निवडण्याची मुभा असते , जो विषय ते आपापसांत ठरवितात आणि त्यावर इंटरनेटवरून माहिती मिळवतात आणि त्यावर नंतर चर्चा आयोजित होते, प्रेझेंटेशन बनविले जाते आणि नवीन उपचाराच्या पध्द्तींचा सखोल अभ्यासही केला जातो आणि पुढे त्याची सर्व पातळींवर नीट शहानिशा करून नवीन , आधुनिक उपचारासाठी त्याचा अवलंबही केला जातो. 

बदलत्या काळानुसार माणसाने स्वत:ला बदलणे आणि स्वत: मध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणात , कामाच्या स्वरूपात बदल करणे हे अत्यंत आवश्यक आहे, आजच्या युगात अनेक नवनवीन स्थित्यंरे, संशोधन सतत घडत असतात आणि बदलत्या काळाबरोबर आपण पाऊले टाकायला नाही शिकलो तर आपण कधी काळाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ ह्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आपण नेहमी दोन पिढ्यांमध्ये चाललेला संघर्ष अगदी घराघरांतूनही अनुभवतो बर्‍याच वेळेस. तरूण युवा पिढीला आपले आई-बाबा, आजी-आजोबा हे जुन्या मतांचे वाटतात. त्यांना आपल्या बरोबर जुळवून घेणे कठीण वाटू लागते. आणि ह्याला "जनरेशन गॅप" असे गोंडस नाव दिले जाते. पण खरेच नीट विचार करता ही विचारांतील तफावत, जीवनशैलीतील चढ-उतार ह्यांच्याशी आपण मिळते-जुळते घ्यायचे ठरवले तर काहीच अवघड बनत नाही. आता हेच बघा ना हळू हळू का होईना आपण नवीन मोबाईल. संगणक(कॉम्पुटर) , टॅब अशा अनेक गोष्टी नव्यानेच शिकतो ना. बदलत्या काळाची गरज ओळखून जो माणूस स्वत: मध्ये असे सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयास करतो , तेव्हा मग त्याला  कधीच अपयशाला सामोरे जात नाही, कासवाच्या धीम्या गतीने का होईना , तो विकासाच्या दिशेने पुढेच पाऊले टाकत असतो. 

ह्यावरून मला माझ्या सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या एका अभिनव संकल्पनेची आठवण झाली . त्यांनी "रामराज्य-२०२५" ह्या त्यांच्या ६ मे २०१० रोजीच्या प्रवचनातून आमच्या पुढे "द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स " ही एक नवीन संकल्पना मांडली होती. माझे सदगुरु हे स्वत: एका प्रथितयश, नावाजलेले डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मेडीकल क्षेत्रात अशासाठी मेडीकल जर्नल्स प्रसिध्द होतात , मग ती मासिक असतील वा वार्षिक ! त्या जर्नल्सच्या आधारे डॉक्टर्स आपले ज्ञान अपडेट ठेवू शकतात. ह्याच प्रकारे जर Electronics, Information Technology, Shares and Stock Market, Health and Health Services Information, CA, General Engineering, Professional Medicine, MBA ह्या विवीध क्षेत्रातील तज्ञमंडळीनी एकत्रित येऊन सुसंघटीतपणे अशी जर्नल्स तयार केली , तर समाजात नवीन प्रकारे प्रबोधन करता येऊ शकते असा पर्याय मांडला होता त्या प्रवचनात . 

सदगुरु हा आपला खरेच एक सच्चा मित्रही असतो, मार्गदर्शक ही असतो. तो नेहमीच आपल्याला संकट समयी उचित मार्गदर्शन करतो. भलेही कुणी मला साथ देवो , मला एकटे पाडो परंतु सदगुरु मात्र एकमेव असा मित्र असतो जो मला कधीच दगा तर देतच नाही. पण माझी सदैव साथ ही देतो. साक्षात भगवंत कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीच्या गोष्टी आपण वाचतो. कृष्ण आणि अर्जुनाची सख्य भक्तीही हेच "मैत्री" चे अनमोल नाते, निरपेक्ष प्रेमाचे, अतूट बंध दाखविते. अगदी संत तुकाराम सुध्दा आपल्या भगवंताबरोबर हेच नाते मैत्रीचे स्थापयाला शिकवतात - "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती "    



कृष्ण भगवंताने सुदाम्याला शिकविलेल्या निरपेक्ष म्हणजेच विना मतलब, विनाकारण प्रीतीचा खरा भाव मला माझ्या सदगुरुंच्या कृतीतून उमगला - "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले." 

माझ्या सदगुरुंनी आम्हां सर्व श्रध्दावान मित्रांना असेच मैत्रीचे अभयवचन दिले की "मी तुला कधीच टाकणार नाही." आणि सच्चा मित्रच उचित वाटेवर आपल्या मित्राला चालवितो. माझ्या सदगुरुंनी आमच्या साठी असेच काळाबरोबर पावले टाकण्यासाठी एक ज्ञानाचे आगळे-वेगळे भांडार उघडले ते ह्या "द एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स " .

ह्यात ही ई-जर्नल्स ही इंटरनेट वर असल्याकारणाने २४ तास उपलब्ध असतात, आणि कुठुनही वाचता येतात; शिवाय आपल्याला कुठलेही ओझे जवळ घेऊन वावरावे लागत नाही. हा याचा अत्य़ंत महत्त्वपूर्ण उपयोग आहे. विविध विषयांमध्ये उपलब्ध असलेली ही ई-जर्नल्स खूपच माहितीपूर्ण आहेत आणि त्या त्या विषयातील पारंगत लोकांनी लिहिली आहेत. तर अश्या ह्या ई-जर्नल्सचा आपण नक्कीच उपयोग करू शकता. http://exponentjournals.com/ या website वर The Exponent Group of Journals launch झाली आहेत. या संचात एकूण ८ प्रकारातली ई-जर्नल्स उपलब्ध झाली आहेत, ती पुढीलप्रमाणे:

मी स्वत: Electronics and Telecommuniction Engineer आहे आणि माझी दोन्ही मुले ह्याच क्षेत्रातील Engineer आहेत. त्यांच्या शिक्षणादरम्यान त्यांना अनेकदा अवघड वाटणार्‍या बर्‍याच Topics ना ह्या ई-जर्नल्स मुळे खूप सहाय्य झाले.

ह्या व्यतिरिक्त दुसर्‍या क्षेत्रांतील अमूल्य माहिती अत्यंत सुलभ व सोप्या पध्दतीने समजण्यास खूप मोलाचा हातभार ही जर्नल्स लावतात. समजा आपण मेडीकल फिल्डचे नाही आहोत तरी एखाद्या आजाराची माहिती , त्याची संभाव्य कारणे, समज-गैरसमज ह्याबद्दल देखिल अत्यंत महत्त्वाची माहिती येथे अनेक निष्णात डॉकटरांनी इतक्या सहजपणे समजावून दिली आहे की आपल्या मनातील भीती पार दूर पळून जाते आणि आपल्याला त्या विषयाचे छान ज्ञान ही मिळते, तेही विना सायास , ना कोठे शोधाशोध करायची गरज, ना कुठे फी भरायची गरज, अगदी बसल्या जागी ! म्हणूनच सदगुरु हा प्रत्यक्ष मित्रच असतो - अनेक जन्मांचा कधीही साथ न सोडणारा एकमेवाद्वितीय सखा !      

विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे "लाभेवीण प्रेम" करणार्‍या ह्या माझ्या सदगुरुंनी आपल्या मित्रांसाठी हे ज्ञानाचे दालन विनामूल्य अगदी फुकट उपलब्ध करून दिले आहे. म्हणतात ना खर्‍या मैत्रीत देवाण घेवाण नसते व्यवहारी पैशाची, असते फक्त नि:स्वार्थ प्रेमाची उधळण ! 


ह्या माझ्या एकमेव प्रत्यक्ष मित्राला - माझ्या सदगुरुंना मैत्रीदिनाच्या अनिरूध्द शुभेच्छा ! त्याच बरोबरीने वाचकांनाही अनिरूध्द शुभेच्छा ! 

संदर्भ: 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog