Monday 14 November 2016

माझ्या लाडक्या डॅड, साठाव्या जन्मदिवसाच्या तुम्हाला अनिरूध्द शुभेच्छा !

हरि ॐ

माझ्या लाडक्या डॅड,  साठाव्या जन्मदिवसाच्या तुम्हाला अनिरूध्द शुभेच्छा  !


तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले
अपने पे भरोसा हैं तो एक दाँव  लगा ले

डरता है जमाने की निगाहों से भला क्यों ?
इन्साफ तेरे साथ है, इल्जाम उठा ले 

क्या खाक वो जीना है, जो अपने ही लिए हो
खुद मिट के किसी और को मिटने से बचा ले

टूटे हुए पतवार हैं कश्ती के तो गम क्या
हारी हुई बाहों की पतवार बना दे 







गुरुदत्तजींनी दिगदर्शित केलेल्या देवानंद आणि गीता बाली ह्यांच्या १९५१ सालच्या बाजी सिनेमातील हे साहिर लुधियानवीचें  स्वरांनी सजलेले  आणि बर्मनदांच्या संगीताने नटलेले हे जीवनाच्या अजरामर सत्याचे दर्शन घडविणारे हे गीत आजही मनाला तितकीच भुरळ घालते. 

हे गाणे ऐकताना जीवनाच्या हरत चाललेल्या डावाला जिंकायचाच आणि विजय प्राप्तीचा १०८% भरोसा देऊन , आकाशाला गवसणी घालणारे अनिरूध्द  मन:सामर्थ्य प्रदान करणार्‍या माझ्या अचित्यदानी गुरुमाऊलीचा , माझ्या सदगुरुरायाचा , माझ्या लाडक्या , प्राणप्रिय डॅडचा मनमोहक ,लाघवी, हसरा चेहराच डोळ्यांपुढे तरळला आणि नयनांत आनंद-विरहांश्रूची एकच दाटी झाली...  

ह्या गाण्यात वर्णिलेली परिस्थिती माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा येत असते . जेव्हा स्वत: वरचा आत्मविश्वासच डगमगतो , संकटाचे डोंगर कोसळलेले असतात आणि आयुष्यात सर्व काही संपले असे वाटू लागते, परमेश्वराने बहाल केलेल्या मानवी जन्माचे माहात्म्य ठाऊक असूनही तोच जन्म नकोसा होतो आणि असा नैराश्येच्या गर्तेत सापडलेला तो असहाय्य जीव अगतिकपणे मिळेल त्या प्रत्येकाकडे मदतीचा हात मागतो पण कुठे म्हणून आशेचा किरण तर सोडाच पण प्रकाशाचा कवडसाही दिसत नाही आणि शेवटी हतबल होऊन तो माणूस  शेवटी आपले आयुष्य संपवण्याच्या चुकीच्या , अधोगतीला नेणार्‍या मार्गाकडे झुकू लागतो आणि अचानक त्याच्या आयुष्यात असे काही बदल घडू लागतात ...
तिमीरातूनी पसरूनिया बाहू आले ते उजळीत ....



राखेतून उठण्याचे मन:सामर्थ्य देत आकाशात उंच  भरारी घेणार्‍या फिनीक्स पक्ष्यासम जीवनाचा संपूर्ण कायापालट करविणारे माझे लाडके डॅड- माझे बापू!
 


वाट पहाशील तर आठवण बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहर्‍यावर "हास्य" बनून येईन ... अनिरूध्द बापू . अंबज्ञ !
क्षणार्धात होत्याचे नव्हते होत असतानाच "तो " येतो आणि भरोसा देतो , ऊठ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे  असे अभयवचन देत  "तो" अभयदाता स्वामी समर्थ बनून येतो, सर्व जगाने  साथ सोडली असताही भक्कम , खंबीर आधार देतो - "तो" असतो माझा खराखुरा आप्त, जीवीचा जीवलग - माझा सदगुरु !
शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी अशी ग्वाही देत  कृपेचा अमाप वर्षाव करीत "कृपासिंधु" बनून "तो" येतो साक्षात ईश्वर बनून - माझा "साई"बनून आणि ग्वाही देतो  मी असताना तू अनाथ नाही , तुझा साईनाथ आहे ना तुझ्या संगे ! - "तो " असतो माझा सदगुरु !
"तू आणि मी मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही " असे म्हणत मित्रत्वाच्या नाते सदैव सांभाळून , माता-पित्याच्या मायेची पखरण करणारा , कधीही दगा न देता सच्च्या मित्राच्या नात्याने अखंड साथ देणारा, निभावणारा  असतो "तो " माझा मन:सामर्थ्यदाता - माझा आत्मा, माझा प्राण बनून माझे जीवन रसरशीत ठेवणारा, माझ्या जीवनात सत्याला प्रकाशित करून "सत्यप्रवेश " करवून देणारा, प्रेमाचा अविरत स्त्रोत बरसवून
"प्रेमप्रवास" करवून घेणारा , आणि पदोपदी, ठायी ठाय़ी आनंदाच्या राशीवर पहुडायला लावून " आनंद साधना " करवून घेणारा - "तो" असतो माझा सदगुरु !

"मी तुला कधीच टाकणार नाही " ह्याची प्रचिती देत साता-समुद्रांच्या पलिकडे असो वा उंच कड्यावरून दरीत कोसळत असो वा सुनामी , भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात फसलेले असो वा मृत्यूच्या कराल दाढेत अडकलेले असो , "स्मर्तुगामी " बनून अनिरूध्द गतीने धाव घेणारा , चिडीच्या पायाला दोर लावून अलगद आपल्या प्रेमपाशात खेचणारा, आधारवडाच्या सावलीत विसावा देणारा "तो" असतो माझा सदगुरु - माझा DAD- माझा बापूराया - माझे सदगुरु !

नशीब नशीब म्हणून काय रडत बसतो वेड्या, माझ्या राजा "त्या" अनंत करूणामयी परमेश्वरावर विश्वास ठेवून तर बघ एकदा , "तो" लाभेवीण प्रेम करणारा एकच ! "तो" आपल्या लेकरांना कधीच असहाय्य अवस्थेत ठेवत नाही ह्याची ग्वाही आणि जिवंत प्रचिती देऊन जगण्याची आस जागवितो, मरगळलेल्या मनाला चैतन्याची नव उभारी देतो "तो" माझा बापूरायाच !



तू आणि मी मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही अशी ग्वाही देत , आळसाला घालवून , "जेथे राबती हात तेथे हरी " ह्या उक्तीला जीवनात सत्यात उतरावयाला भाग पाडणारा "माझा बापूराया - तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले

मन:सामर्थ्यदाता असलेला माझा सदगुरुराया मला जीवनाचे फासे फेकताना भरोसा देतो "त्या"च्या चरणांवरचा आणि पर्यायाने " स्वत:" वरचा ! - अपने पे भरोसा हैं तो एक दाँव  लगा ले

भगवंत , परमात्मा, परमेश्वर अन्यायी नाहीच मुळी , "त्या"च्या न्यायीपणावर विश्वास ठेवायला शिकवतो "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा " हे साईनाथांचे वचन सत्यात उतरविण्याची ग्वाही देत माझा बापूराया मला संकटाशी झुंजायला शिकवतो -    डरता है जमाने की निगाहों से भला क्यों ? इन्साफ तेरे साथ है, इल्जाम उठा ले 

माता-पित्यांच्या ऋणाइतकेच मातृभूमीचे ऋण असते ह्याची जाणीव करवून देऊन , सदैव सभान राहून माझ्याकडून मायभूमीचे पांग फेडून घेतो "तो" माझा बापूरायाच - क्या खाक वो जीना है, जो अपने ही लिए हो  खुद मिट के किसी और को मिटने से बचा ले

अरे माझ्या राजा, जीवनात हे नाही , ते नाही असा नन्ना चा पाढा वाचत , रडत बसण्यापेक्षा आहे त्यातून जीवनाची बाग फुलवायला शिक - माझ्या साईनाथाने उजाड , बंजर जमीनीतूनच चैतन्याची बाग फुलविली हे शिकविणारे हेमाडपंतविरचिते अपौरूषेय ग्रंथ असलेले "श्रीसाईसच्चरीत" जरा डोळे उघडून वाच, मनाची बंद कवाडे उघड आणि मग बघ "तो" आहेच तुझ्या पाठीशी दूधाची वाटी घेऊन उभा ,मग माझ्या लेकरा तुझे प्रयास नको का करायला तू म्हणत प्रेमाने गोंजारत तर कधी रागाने कान पकडून दरडावत तर कधी नाठाळ, टवाळ लेकराला पाठीत धपाटा घालत जीवनाची युध्द्कला आचरणात आणायला शिकवितो ’"तो" माझा नंदारमणा अनिरूध्द ! राम बनून सत्याशी , मर्यादेशी बांधिलकी घालून देणारा, निष्काम कर्माची दीक्षा देणारा कृष्ण बनून , हातातले गळून पडणारे गांडीव धनुष्य सावरीत , तुझ्या जीवनाचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून मी आज येथे उभा आहे हे मनावर बिंबवीत , सत्य-प्रेम -पावित्र्य ह्या त्रिसूत्रीला अनुसरूनच आणि "पावित्र्य हेच प्रेमाण" ह्या आदिमाता चण्डिकेच्या नियमाला कटीबध्द होत , "ठं" बीजाची जीवनात बीज रोवणारा - माझा रणधुरंधर , लढवय्या - बापूराया -   
टूटे हुए पतवार हैं कश्ती के तो गम क्या
हारी हुई बाहों की पतवार बना दे


अशा ह्या माझ्या प्राणप्रिय गुरुमाऊलीचा - माझ्या सदगुरु बापूरायांचा  आज ६० वा जन्मदिवस !  त्या निमीत्त्ताने ही गुणसंकीर्तनाची पुष्पांजली त्यांच्या चरणी समर्पित!

अखिल जगताचा समर्थ , मूळ आधार असणारे दत्तगुरु आमच्या बापूंना उदंड आयुष्य देवो,हीच तुमच्या चरणी प्रार्थना !

हे आदिमाता माय चण्डिके माझ्या प्रेमळ पित्याला, माझ्या गुरुमाऊलीला, माझ्या बापूंना उदंड आयुष्य़ लाभो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

माझ्या बापूरायाला आवडेल अशीच भक्ती-सेवा आमच्या हातून सदैव घडो , जेणेकरून माझ्या सदगुरुंच्या चेहर्‍यावर हास्याची, आनंदाची एक लकेर तर झळकू हेच आदिमातेकडे मागणे !  

I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER !!!
हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ  







प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog