चोरीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये तशा नेहमीच वाचतो. कोणाचे मंगळसूत्र ओढले, कोणाची सदनिका फोडली (घर फोडले), कधी कोणा बॅंकेवर दरोडा पडला, जवाहिर्याची वा सोनारांची दुकाने फोडली वगैरे. बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर इंटरनेटवरून दुसर्याचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करणे, दुसर्याचे क्रेडिट कार्ड चोरून वापरणे वगैरे गुन्हे करणार्या बुद्धीमान चोरट्यांबद्दल आपण नेहमीच वाचतो.तर क्वचित कोणाचा पासपोर्ट तर कधी मौल्यवान रत्ने चोरीला गेल्याचीही बातमी वाचतो. आजकाल तर राजरोसपणे विजेचीही चोरी केली जाते सर्रास असे वाचनात येते.
Monday, 16 March 2015
चोरी ही फक्त पैशाचीच असते का?

वृद्धांना होणारे संभाव्य अपघात आणि सभानता
लहान मुलांच्या बाबतीतील संभाव्य अपघात आपण मागील लेखात पाहिले होते , आता वृध्द आजी आजोबा मंडळीच्या अपघातांची ओळख करून घेऊ या.....
वृद्धांना होणारे अपघात -
" म्हातारपणं हे दुसरे बालपण असते " असे म्हणतात.
रक्तस्त्राव कमी असो वा जास्त दुर्लक्ष मुळीच करू नका.
वृध्दापकाळात वयोमानाबरोबर हाडांमधील कॅल्शियम द्रव्य कमी होत असते. शरीराची हालचाल कमी होऊन जडत्व आलेले असते. काही वृद्धांचा आहारही बराचसा कमी झालेला असतो आणि त्यामुळं अत्यावश्यक जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण झालेला असतो. ह्या सर्वांमुळं म्हातारपणी हाडं अतिशय ठिसूळ होतात. किरकोळ मार किंवा हातपाय लचकणं असली कारणेसुद्धा ती मोडायला पुरेशी असतात. बऱ्याचशा वृद्धांना डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर संधिवात इत्यादीं आजारांनी ग्रासलेले असते. त्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती (resistance power) , झीज भरून येण्याची शक्ती (healing power)सर्वच कमी झालेले असते. म्हणूनच किरकोळ जखमेतील रक्तस्त्राव थांबवणेही कधी कधी खूपच कठीण होऊन बसते. यावरूनच आपल्या लक्षात येईल की वृद्धांना कितीही किरकोळ इजा झालेली असो त्याची योग्य त्या गांभीर्यानं तिकडीनं दखल घेणं अतिशय आवश्यक आहे.
कवटी, दंड, मांडी, कंबर,मणके, हाताची बोटे, हाताचा तळवा, मनगट, खांदा, खुबा, , इत्यादी जागचे अस्थिभंग उपचार करायला अवघड असतात; कारण तुटलेले तुकडे एकत्र ठेवणे अवघड असते. म्हणून या प्रकारांसाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे जाणे आवश्यक आहे.

Saturday, 7 March 2015
माझा कुणा म्हणू मी?
नुकतीच होळी-पौर्णिमा अगदी जल्लोषात साजरी झाली . होळी म्हटली की मला पहिली आठवते ती बाळ प्रल्हाद आणि होलिका राक्षसीची गोष्ट. जन्मदात्या निष्ठुर पित्याच्या राक्षसराज हिरण्यकश्यपूच्या आदेशावरून त्याची बहीण होलिका राक्षसी प्रल्हादाला जिवंत अग्नीत जाळायला निघते. तिला आगीपासून अभय असते. पण प्रल्हादाच्या भक्तीच्या हाकेला त्याने ज्याला एकमेव आपला मानला, माझा मानला "तो" त्याचा लाडका महाविष्णू धाव न घेईल तरच नवल ....आणि मग विपरीत घडते, आगीपासून अभय वरदान असूनही होलिका आगीत भस्म होते आणि भक्त प्रल्हाद मात्र सुखरूप वाचतो.
अशा प्रल्हादाच्या भक्तीच्या , त्या बालरुपाच्या आठवणीत रमून सकाळी चालायला जाऊन घरी परतत होते आणि अचानक लक्ष वेधले ....

Saturday, 21 February 2015
कोsहं- मी कोण ?
आज माझ्या एका आप्त स्नेह्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग कानी आला आणि मन विचारात पडले. त्याचे असे झाले की माझे हे आप्त संगीत क्षेत्रातील अत्यंत जाणकार आणि स्व मेहनतीने संगीतात कौशल्य संपादन करत असलेले व्यक्तीमत्त्व. एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील पारितोषक वितरण समारंभाला हे गेले होते. तेथे मोठ-मोठ्या प्रथितयश व्यक्तींशी भेट-गाठ होत होती, नव्याने ओळख होत होती. नाट्य-संगीत क्षेत्रातील अनेक नामांकित कलावंताशी भेट घेताना ह्या माझ्या स्नेह्याने कोठेही स्वत:च्या कलेच्या अभिरुचीचा वा संगीत क्षेत्रातील प्राविण्य संपादलेल्या मान-सन्मानाचा आधार जराही घेतला नाही. उलट स्वत:ची ओळख आपल्या सदगुरुंच्या नावाने करून दिली...खरेच हृदय हेलावून गेले, सदगदीत झाले मी....किती हे भाबडे , निर्व्याज प्रेम आपल्या सदगुरुवर, कोठे ही स्वत:च्या यशाची, प्रसिध्दीची, मान-सन्मानाची जराही अपेक्षा न ठेवता फक्त सदगुरुंच्या नावातच आपली खरी ओळख असल्याचे भान ठेवणे...मी अवाक् झाले....त्या प्रसंगाने विचारांची शृंखलाच उद्धृत झाली माझ्याही नकळत...आपोआप --
Subscribe to:
Posts (Atom)