आजी म्हटली
की डोळ्यापुढे उभी राहते ती फक्त प्रेम आणि प्रेम ह्याने ओतप्रोत भरलेली ...आई-वडीलांनी
रागे भरता प्रेमाने पोटाशी धरणारी , नातवंडाच्या चुकांवर पांघरूण घालणारी आणि थोरा-मोठ्यांचा मार चुकवणारी,
पण गोडी गुलाबीने चुका न व्हाव्या म्हणून कान उघाडणी करणारी आणि प्रेमाच्या
धाकातही ठेवणारी.....अशा माझ्या लाडक्या आजीने लहानपणी खूप-खूप गोष्टी सांगून धार्मिक
संस्काराचे बी पेरले. त्या गोष्टींतील
संत कान्होपात्राची गोष्ट खूप आवडायची. कठीण प्रसंगी देवाला आर्ततेने साद घातल्यावर
देव हाकेला धावतोच ह्याची जाणीव होत होती.
Monday, 29 December 2014
माझे मायबापगुरु - माझे बापू
माझ्याबद्दल
लहानपणापासून
माझ्या आजीने मला नानाविध गोष्टी सांगून देवाची गोडी लावली. माझी आई शिवभक्त होती आणि
वडीलही देवपूजा आणि जमेल तशी भक्ती करीत होते. पण सर्वात अधिक प्रभाव होता तो आजीचाच
!!! तिने सांगितलेल्या गोष्टींमुळे देव, सदगुरु
ह्यांची आवड निर्माण झाली होती. आरूणीची आणि एकलव्याची गोष्ट आणि संकटाशी शेवट्च्या
क्षणापर्यंत झगडणार्या संत कान्होपात्रेची गोष्ट मला खूप आवडायची. त्याची अधिक घट्ट
रोवणी झाली ती साईबाबांमुळे. "श्रीसाईसच्चरित" ह्या ग्रंथाने मला सदगुरुतत्त्वाची
खर्या अर्थाने ओढ लावली.
Subscribe to:
Posts (Atom)