लोटस पब्लिकेशनच्यावतीने २६ जून २०१७ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पुस्तक
प्रकाशन सोहळा आयोजित केला होता त्यात सहभागी होण्याची सुसंधी प्राप्त
झाल्यामुळे एका अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य ईशकृपेने
लाभले. अत्यंत प्रभावी भारदस्त व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दोन लेखिकांच्या
पुस्तक पकाशनाचा हा सोहळा मुबईमध्ये दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात पार
पडला.
विख्यात मराठी अभिनेते सचिन खेडेकर आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांच्या हस्ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या सुप्रसिध्द अभिनेत्री आशालता वाबगावकर ह्यांच्या "गर्द सभोवती " पुस्तकाचे आणि वैद्यकीय महविद्यालयांत , न्यायवैद्यक शास्त्र (Forensic Medicine) विभागांत ३५ वर्षे विभागप्रमुख पदावरून अध्यापन व सेवा करणार्या डॉक्टर वसुधा आपटे ह्यांच्या "गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र " पुस्तकाचे प्रकाशन लोटस पब्लिकेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विख्यात मराठी अभिनेते सचिन खेडेकर आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांच्या हस्ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या सुप्रसिध्द अभिनेत्री आशालता वाबगावकर ह्यांच्या "गर्द सभोवती " पुस्तकाचे आणि वैद्यकीय महविद्यालयांत , न्यायवैद्यक शास्त्र (Forensic Medicine) विभागांत ३५ वर्षे विभागप्रमुख पदावरून अध्यापन व सेवा करणार्या डॉक्टर वसुधा आपटे ह्यांच्या "गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र " पुस्तकाचे प्रकाशन लोटस पब्लिकेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कल्पना नाईक यांनी दैनिक प्रत्यक्षच्या अफाट व्याप्तीचा आढावा घेताना श्रोत्यांना दैनिक प्रत्यक्षने चालता बोलता इतिहास या सदराद्वारे आपल्या सुमधुर स्वर्गीय संगीताने श्रोत्यांची मने जिंकणार्या विख्यात ज्येष्ठ अभिनेत्री जयमालाबाई शिलेदार, श्रीमती मृणालताई गोरे, सहकार क्षेत्रातील श्री बाळासाहेब विखे पाटील, वृत्तपत्रसृष्टीतले प्रसिध्द श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला असल्याची जाणीव करून दिली. तसेच माननीय लेखिका श्रीमती पुष्पा त्रिलोकेकर, सुप्रसिद्ध संगीतकार श्री प्यारेलाल शर्मा, पटकथाकार श्री सलीम खान, रंगभूषाकार श्री पंढरीनाथदादा जुकर ह्यांच्या लेखांनी तर वाचकांना मेजवानीच दिली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या लेखमालांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या लेखमालांची पुस्तकेही लवकरच लोटस पब्लिकेशन वाचकांसमोर आणणार असल्याची आनंददायक बातमी ह्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान देण्यात आली.
लोटस पब्लिकेशनने "राष्ट्रीय सेवक संघ - विश्वातील अद्वितीय संघटन " ह्या मराठी , हिंदी, इंग्लिश, गुजराथी अशा चार भाषांतून नुकतेच प्रकाशित केलेल्या पुस्तकाचीही माहिती मिळाली.
त्यानंतर आशालता वाबगावकर आणि डॉक्टर वसुधा आपटे ह्या दोन्ही लेखिकांनी दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशी ह्यांनी आपल्या दैनिक प्रत्यक्षच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजेच २००६ पासूनच स्तंभ लेखनाला प्रोत्साहित करून एक दुर्मिळ संधी दिल्यामुळेच आज ह्या पुस्तकांचे प्रकाशन होत असल्याचे सांगून डॉ. अनिरुद्ध जोशींबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त केला. दोन्ही लेखिकांचे हे प्रथम पुस्तकच आहे आणि ते एकाच वेळी दैनिक प्रत्यक्षच्याच लोटस पब्लिकेशनने प्रकाशित केले असल्यामुळे, लेखिकांना आपल्या चाहत्या वाचकवर्गाला भेटण्याचीही संधी लाभली होती - जणू दुग्ध-शर्करा योगच जुळून आला होता !
आशालता वाबगावकर आणि डॉक्टर वसुधा आपटे |
आशालताजींच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेता सुबोध भावे काही आकस्मिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी त्यांच्या मन:पूर्वक शुभेच्छांचा संदेश पाठविल्याचे विनोद सातव ह्यांनी कथन केले. सुबोध भावे ह्यांनी आपल्या प्रस्तावनेत आशालताबाईंच्या लिखाणाबद्दल खूपच सुंदर मत व्यक्त केले आहे की एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचे मंथन आपल्यासमोर्पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत आपल्या जगण्याचे मंथन आपल्यासमोर आशालताबाईंनी मांडले आहे अन् हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारे आहे. ह्यावरून वाचकांना "गर्द सभोवती " मध्ये किती अप्रतिम अनुभवांची शिदोरीची पर्वणी लाभणार असल्याची कल्पना येईलच.
ज्यांनी माझ्या हाती लेखणी धरण्याची ताकद दिली आणि मी लिहू शकेन असा विश्वास दाखविला त्या दैनिक प्रत्यक्षच्या कार्यकारी संपादक डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या बद्दलची आपल्या मनातील अपार आदरभावना व्यक्त करताना आशालताबाईंचा कंठ दाटून आला होता.
डॉ. वसुधा आपटे ह्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांनी स्वत: आपल्या भाषणातून त्या व्यक्त केल्या. त्यांनी न्यायवैद्यक विभागाचा पोलिसांच्या गुन्हेगार शोध प्रक्रियेत असलेला अन्योन्य संबंध स्पष्ट केला. सामान्य माणसांना न्याय वैद्यक शास्त्राच्या कार्याबद्दल सोप्या भाषेत माहिती देणार्या डॉ. वसुधा आपटे ह्यांच्या पुस्तकाचे व कार्याचे कौतुक केले. तसेच दैनिक प्रत्यक्षने त्यांना लिखाणाची संधी दिल्याने हे समाजाला प्रबोधन करणारे पुस्तक आज उपलब्ध झाले असल्याचे आपले मत मांडले
" पोस्टमार्टेम" ह्या गुन्हेगारीशी निगडीत पोलीस आणि न्यायवैद्यक शास्त्राच्या संयुक्त कारवाईबाबत समाजात असलेल्या अज्ञानाला आणि गैरसमजूतींना दूर करण्यासाठी दैनिक प्रत्यक्षने ठोस पावले उचलावीत असे आपले मत त्यांनी लोटस पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांना सभागृहातील श्रोत्यांच्या उपस्थितीत निवेदन केले. ह्या वरून समाजात दैनिक प्रत्यक्ष ह्या बिगर राजकीय पत्रक पार पाडीत असलेली मोलाची कामगिरी आणि दैनिक प्रत्यक्षने वाचक वर्गाला दिलेली सभानता ह्याची जाणीव झाली. भ्रष्टाचाराची पालेमुळे उखडून टाकणारे एक निडर, धडाडीचे पोलीस महासंचालक म्हणून ज्यांची कारकीर्द वाखाणली जाते असा ज्यांचा विनोदजींनी परिचय करून दिला होता त्या माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ह्यांचे हे जाहीर निवेदन म्हणजे "दैनिक प्रत्यक्ष "च्या समाज-प्रबोधनाच्या कार्याची दखल आणि पाठीवरील कौतुकाची थापच जणू काही !
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन खेडेकर ह्यांनी लोटस पब्लिकेशनने एका अभिनेत्याला आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पदी आमंत्रित करून , अभिनेता हा देखिल अभिनयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात आपली आवड जोपासत असतो ह्या विशेष बाबीकडे समाजाचे लक्ष वेधले असल्याचे समाधान आपल्या मनोगतातून व्यक्त केले. खेडेकरजींनी आपल्या विशेष शैलीतून विलेपार्ले येथील आपल्या वास्तव्यात अनुभवलेला प्रथितयश लेखक विजय तेंडूलकर ह्यांचा लेखकाने लिखाणाच्या सरावासाठी घ्यावयाच्या प्रयासांचा मजेदार किस्सा प्रेक्षकांना सांगून एक महत्त्वाचा संदेशच जणू दिला. लेखकाच्या जीवनातील नियमीत सरावासाठी एखाद्या दैनिकातील स्तंभ लेखनाची जबाबदारी कशी मोलाचा हातभार लावते ते नमूद करून दैनिक प्रत्यक्षने आशालताजी आणि डॉ वसुधा ह्यांच्यातील लेखिकेला प्रेरणा देण्याचे किती बहुमोल कार्यच केल्याचे जणू अधोरेखित केले होते. आपल्या भाषणातून त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी मराठी वाचनाला चांगले दिवस आणायला हवे असे प्रतिपादन केले आणि सरते शेवटी "तयारी असली पाहिजे" ही विंदा करंदीकारांची कविता आपल्या अनोख्या शैलीने मधुर आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आजकाल पुस्तक हातात घेऊन वाचण्यापेक्षा तरूणाई बहुतांशी किंडलवर किंवा e-book वाचणे अधिक पसंद करतात हे ध्यानात घेऊन लोटस पब्लिकेशनने वाचकांसाठी e-book स्वरूपातही ही पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत ह्याची विशेष नोंद घ्यायलाच हवी.
समाजातील अज्ञानाला झटकून, वाचकांच्या मनाची मरगळ अलगदपणे दूर करून, दर्जेदार वाचनाप्रती सामान्य मानवाला दिशा दर्शन करण्याबाबतची किती ही अटाटी, किती ही घट्ट बांधिलकी !
"गर्द सभोवती"
Garda Sabhowati - गर्द सभोवती (Marathi Print Copy)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GRSMDL
Garda Sabhowati - गर्द सभोवती (Marathi E-Book)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GRSMAR
Garda Sabhowati - गर्द सभोवती (Marathi E-Book)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GRSMAR
"गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र"
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi Print Copy)
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi Print Copy)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMDL
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi E-Book)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMAR
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi E-Book)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMAR
लोटस पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्याशी संवाद |
लोटस पब्लिकेशनच्या प्रकाशन समारंभात आशालाताबाई आणि डॉ वसुधा आपटे ह्या मान्यवर लेखिकांची
पुस्तकावर स्वाक्षरी मिळणे म्हणजे आनंदाची पर्वणी !
एखाद्या रत्नाची महती जगाला कळते ती रत्नपारख्याने त्या रत्नाला, हिर्याला कोंदणात बसविल्यावरच ! आशालाता वाबगावकर आणि डॉ वसुधा आपटे ह्या हरहुन्नरी लेखिकांना लिखाणासाठी केवळ प्रोत्साहीत करूनच नव्हे तर त्यांच्या लिखाणाला आपल्या दैनिक प्रत्यक्ष मधून प्रसिध्दीस आणून दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशींनी ह्या लेखिकांच्या दैवी प्रतिभेला एक अनोखे दालनच उपलब्ध करून दिले. लोटस पब्लिकेशनतर्फे ह्या लेखिकांच्या दैनिक प्रत्यक्ष मधील स्तंभलेखनातील प्रकाशित लेखांचे पुस्तक प्रकाशन म्हणजे ज्ञानगंगेच्या तीरी लोटस पब्लिकेशनने लावलेला एक निरामय ज्ञानमयी दीप !
पुनश्च लोटस पब्लिकेशनच्या अवर्णनीय अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभो हीच आदिमातेच्या चरणी प्रार्थना !