आश्चर्य वाटले असेल ना? शीर्षक वाचून, अगदी बुचकाळ्यात देखील पडला असाल ना? आज-कालच्या कलीयुगात जो तो आपला आपला मतलब आपला स्वार्थच पहाण्यात मशगूल असतो, जेथे माणसूकीची चाड देखील राहिलेली नाही अशाही काही किळसवाण्या घटनांनाही आपण सामोरे जातो तर मग ह्या जगात असे स्वत:च्या लाभाशिवाय कोणी तरी प्रेम करू शकेल का? साहजिकच उत्तर वाटते नाही, नाही , छे , छे हे तर केवळ अशक्यच आहे. मी ही ह्याच मताची होते खरे तर , पण जेव्हा भगवंताच्या आपल्या वरील अपार मायेची, प्रेमाची जाणीव होऊ लागली आणि भगवत्स्वरूप असणार्या सदगुरुंचा जीवनाला परीस स्पर्श झाला तेव्हा मात्र ह्याची पुरती अनुभूती आली आणि मग मात्र स्वत:च्या मताला बदलावेच लागले.

