आपत्ती व्यवस्थापन हे काही फक्त भूकंप, पूर, दुष्काळ, त्सुनामी ह्या सारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा आगी, दंगली ह्यासारख्या मानव निर्मीत आपत्ती ह्या भल्या मोठ्या आपत्तींपुरतेच मर्यादीत असते असे नाही.
भले मग ते घरगुती अपघात असो स्वत:च्या घरातले वा शेजारच्या घरातले किंवा आपण राहतो त्या इमारतीमधील वा आपण राहतो त्या परिसरातील, तरी देखील अपघात हे अपघातच असतात. अचानक, अनाहूतपणे, आकस्मिकरित्या आलेले कोणतेही संकट हे त्या त्या माणसासाठी मोठी आपत्तीच असते नाही का बरे एक प्रकारे?
चला तर मग आपण काही उदाहरणेच पाहू या -
दुपारी दोन अडीचचा सुमार असावा. त्या ८ मजली इमारतीमध्ये नीरव शांतता पसरली होती. नोकरचाकर मंडळी सकाळीच आपआपल्या कामावर गेलेली. शाळेची बच्चे कंपनी शाळेत गेलेली ! काही घरांमध्ये गृहिणी दुपारचे जेवण आटोपून वामकुशीच्या तयारीला लागलेल्या आणि अचानक एक आजी अत्यंत घाबरल्या अवस्थेत, थरथर कापत, कावर्याबावर्या होऊन कोणी तरी मदतीला येते का ह्याचा शोध घेत होत्या. हाका मारण्यासाठी त्यांच्या अंगात पुरते बळही उरले नसावे. घरात वयस्कर आजोबा पाय घसरून बाथरूम मध्ये पडले होते , त्यांचा इजा झालेला पाय बाहेरच्या बाजूला वळून जमिनीला टेकलेला आणि त्यामुळे त्यांना नीट धडपणे उठूनही बसता येत नव्हते. बिचार्या आजी त्यांना आजोबांना एकट्याने उचलता येणेही अशक्य आणि भीतीने गाळण उडाल्याने नक्की काय करावे हे ही सुचत नव्हते....
आता दुसरा प्रसंग पाहू या - अकराचा सुमार असावा, स्वंयपाक घरातून अचानक बॉम्ब -स्फोट झाल्यासारखा खूप मोठा आवाज आला आणि सर्वत्र काहीतरी उडत असल्याचा भास झाला...अचानक कुकरचा स्फोट झाला होता आणि त्यातील भाताचे पातेले बाहेर उडून अस्ताव्यस्त सारा भात पसरला होता....
आणि येथे काय़ झाले बरे? शाळेच्या एका वर्गात नुसता थरकाप करणारा किंचाळ्यांच्या ,केविलवाण्या रडण्याच्या आवाजाने हृदयाचा ठोका चुकत होता , खेळता खेळता अचानक छोटा शिशु वर्गातल्या एका मुलाने लपाछपी खेळताना लपण्यासाठी वर्गाचे दार लावून घेतले आणि तो एकटाच आत अडकला होता , आणि त्याला दार उघडायचे कळत नव्हते. सर्व लहान मुले घाबरून रडत आणि किंचाळत होती त्या अडकलेल्या त्यांच्या मित्राला सोडवण्यासाठी......
हल्लीच्या काळात आपल्या सर्वांच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात असे अनेक लहान मोठे अपघात घडताना आपण अनेक वेळा पाहत असतो. हे अपघात म्हणजे अगदी नित्याचाच प्रसंग होऊन बसल्यासारखा असल्याने कधी आपण त्यांच्याकडे काणाडोळा करतो तर कधी तटस्थाची भूमिका घेऊन बघ्यांच्या गर्दीतले एक होऊन जातो. ऑफीस , कारखाने येथील कामाच्या ठिकाणांच्या अपघातां बरोबर घरातल्या अपघातंचे प्रमाणही वाढल्याचं आपल्याला आढळून येईल. गावातील-शहरांतील बेसुमार वाढलेली लोकसंख्या, घरातील वृध्दांच्या आणि बालकांच्या वाढ्त्या समस्या आणि नवनवीन अत्याधुनिक वैज्ञानिक घरगुती यांत्रिक उपकरणांचा वाढता उपयोग हे बरेचसे या अपघातांना कारणीभूत आहेत. ह्या अपघातांमधून पाळण्यातल्या अगदी लहानग्या तान्ह्या बाळांपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत कोणाचीही सुटका नाही.
खरे पाहता योग्य खबरदारी घेतल्यास बरेचसे अपघात टाळता येण्यासारखे असतात. परंतु एकदा अपघात झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळेपर्यंत सर्वसामान्य माणसालाच या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असल्यामुळे, त्याला प्राथमिक उपचारांची ओळख असण्याची आवश्यकता आहे. जखमांच्या आणि फ्रॅक्चर्सच्या बाबतीत तर हेच योग्य प्राथमिक उपचार खूपच मोलाचे ठरतात. घरामध्ये होणाऱ्या अपघातांच्या वेळी मदतीला कोणी दुसरे उपस्थित असेलच याची खात्री देता येत नाही. लहान मुले अथवा वृद्ध या अपघातात सापडल्यास गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतो. अशावेळी प्रसंगावधान राखून धीर न सोडता योग्य त्या हालचाली करणं अतिशय महत्त्वाचं असतं.
आपती व्यवस्थापन - मूळ हेतू
भीषण आपती असो वा मोठे संकट असो वा गंभीर अपघात असो, तो टाळता येणे जरी अशक्यप्राय असले तरीही त्यापासून उद्भवणारे संभाव्य धोके टाळून आणि त्यांची तीव्रता, त्यांचा प्रभाव कमी केल्यास होणारे नुकसान बर्याच प्रमाणात कमी आणि सुसह्य नक्कीच करता येऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनाचा हाच मूळ हेतु आहे, असे मला वाटते.
आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक म्हणजेच घराच्या पातळीवरचे-
आपण नेहमीच बघतो की शाळेच्या वयातील व्रात्य , खट्याळ मुलांचे उपद्व्याप अक्षरशः अगणित असतात. संपूर्ण महिन्याभरात एकदाही पडला नाही, धडपडला नाही असा एकही मुलगा/मुलगी शोधून सापडणार नाही . कधी दारात अथवा खिडकीत बोट चेमटून घेतील, तर उड्या मारण्याच्या नादात कधी पलंगावरून टेबलावरून, माळ्यावरून किंवा बाल्कनीतूनही खाली पडतील. पतंगाच्या नादात गच्चीतून तोल जाऊन पडणारी आणि रस्त्यावर वाहनांखाली चेंगरणारी मुलं ठिकठिकाणी दिसतात.आजीचा, आईचा वा सांभाळणार्या बाईचा डोळा चुकवून स्वयंपाकघरातल्या चाकू, सुरी, विळी, खोबरं-किसणी इत्यादीं ही बालमंडळी सरास हाताळतात आणि न सांगता मनमानी करून वापरून हात पाय कापून घेतात. इतर मुलांबरोबर भांडणे, मारामार्या तर रोजच्या चालू असतात. एकमेकांचे पाय ओढणे, पाय घालून पाडणं, ढकलणं, दुसऱ्याचं डोकं आपटणे, पाठीत धपाटा घालणे, कान पिरगळणे, थोबाडीत मारणे, निरनिराळ्या वस्तू एकमेकांच्या अंगावर टाकणं, चावणं अशा असंख्य प्रकारात मुलं एक्मेकांना इजा करून घेत असतात. दाराच्या उंबऱ्यात अडखळून पडणं, दारात लोंबकळून झोके घेताना तोल जाऊन पडणं, जिन्यातून घसरणं, दोन ते तीन पायर्या सोडून उड्या मारणं इत्यादी नको ते प्रताप करून मस्ती करण्याच्या नादात ही मुले शरीराला मोठ्या प्रमाणावर इजा करून घेण्याची शक्यता दाट असते. पालकांच्या निष्काळजीपणामुळे स्टोव्ह, गॅस, शेगडी, कंदील अशा वस्तूंवर पडून अथवा कपडे पेटून अनेक मुले भाजत असतात. सायकलच्या चाकात पायाची बोटे अडकून तुटणं, सायकलवरून पडणं, लिफ्ट्मध्ये अडकणे अशा गोष्टीही सारख्या चालू असतात.
" Prevention is better than Cure" ही म्हण तर आपल्या सर्वांच्याच चांगल्याच परिचयाची असते. पण आपण त्याचा व्यवहारात वापर मात्र म्हणावा तितका करीत नाही. अपघात घडूच नये म्हणून खबरदारी घेणे हे कधीही हितकारकच असते नाही का?
अपघात हे संपूर्णत: टाळता येणे अशक्य वाटत असले तरी अपघात कसे कमीत कमी होतील ह्याकडे लक्ष दिल्यास अपघात टाळण्यासाठी परिचय करून घेतलेली ही जुजबी माहिती खूप मोलाचे सहकार्य नक्कीच करू शकेल असे माझे प्रामाणिक मत आहे. आणि हेच तर असते आपत्ती व्यवस्थापन घराच्या पातळीवरचे....
अपघात कसे टाळावे ?
मोठ्या माणसाचं व्यवस्थित लक्ष असल्यास यातील वर उल्लेख केलेले बरेचसे अपघात टाळता येतात. मुलांच्या खेळकरपणाला बाधा न आणता त्यांना चालावं कसं, पळावं कसं,वेगवेगळ्या गोष्टी हाताळाव्या कशा हे योग्य रीतीनं समजावून दिल्यास बरेच गंभीर प्रसंग टाळता येतील.
अत्यंत महत्त्वाची दक्षता/खबरदारी -
अर्धवट, अपुर्या माहितीच्या आधारे प्रथमोपचार करणे कधीही धोकादायक वा जीवाशी खेळणे ठरू शकते , म्हणून तज्ञ डॉक्टरांचा लवकरात लवकर वेळीच सल्ला घेऊनच औषधोपचार करावा.
सहज करता येण्याजोगे काही उपाय -
१. कातर, चाकु, सुऱ्या, नेलकटर, कटर, खिळे इत्यादी अणुकुचीदार, टोकेरी व धारदार वस्तू लहान मुलांपासून शक्यतो लांब ठेवाव्यात.
२. आगीच्या , विस्तवाच्या जवळपास मुलांना मस्ती वा धांगडधिंगा करू देऊ नये. लायटर वा काडीपेटी उंच जागी ठेवावी.
३. गॅसची शेगडी वा स्टोव्ह शक्यतो मुलांच्या हाती लागणार नाही इतक्या उंचीवर ठेवावा. घरातून बाहेर पडताना गॅस रेग्युलेटर बटण (gas regulator knob) काळजी पूर्वक आठवणीने बंद करावा. गॅसचे सिलींडर बदलताना गॅसची कोठूनही गळती होत नाही ना ह्याची नीट खबरदारी घ्यावी. तसे आढळल्यास गॅसचा वापर न करता आधी गॅस कंपनीत फोन करून तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, जेणे करून संभाव्य धोके टळू शकतात.
४. आयोडीन, स्पिरिट, बेन्झॉईन, सोफरामायसीन, आयोडेक्स, बर्नोल आणि ड्रेसिंगचे इतर सामान असलेली प्रथमोपचार पेटी (First-aid box) प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे आणि त्याची ठराविक सुनिश्चित जागा असणे आणि ती घरातील सर्वांना माहीत असणे ही तेवढेच आवश्यक असते.
५. अंगावर कुठं कापल्यास डॉक्टरकडं नेण्यापूर्वी जखम डेटॉल अथवा सॅव्हलॉनने स्वच्छ धुऊनं ती कोरड्या ड्रेसिंगनं ताबडतोब बंद करणं आवश्यक आहे.
६. कापून जखम झाली वा रक्तस्त्राव होत असेल तर चहा, कॊफी सारखी उत्तेजक पेये देऊ नये. त्याने रक्तस्त्राव अजून वाढतो.
७. घरी एखाद्या लहान डाय़रीत Ambulance , जवळपासचे Hospital, Family Doctor , Cardiologist, Specialist Doctor, Chemist , 24 hours Chemist (दिवस-रात्र उघडे असणारी औषधाची दुकाने) , Fire Brigade असे अत्यावश्यक फोन क्रमांक नोंदवून ठेवावे.
८. एखाद्याला व्यक्तीला Sulpha, Penicilin अशा काही ठराविक औषधांची allergy असते त्या संबंधीची डायरीत नोंद असावी.
९. एखादे हाताळण्यास सोपे असे handy Fire Extinguisher घरात ठेवणे कधीही हितावहच ठरते.
१०. घरातील main switch कोठे आहे आणि कधी व कसे बंद करायचे ह्याची जाणीव प्रत्येकाला असणे खूप गरजेचे आहे.
११. घरातून बाहेर निघताना देव्हार्यातील समई वा निरांजनाची जळती ज्योत शांत करावी, ज्यामुळे कधी कधी वार्याच्या झोताने आजूबाजूला आग लागण्याचा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.
हे झाले आपले घरगुती उपाय व दक्षता कशी घ्यावी याचे मुद्दे. परंतु या सगळ्या मुद्द्यांमधील समान सूत्र म्हणजे काय तर "सर्तकता"
आपण मुळात सर्तक राहणे आवश्यक असते. यामुळेच अनेक अपघात टळत असतात. आणि ही सर्तकता येते ती प्रशिक्षणातून. मी देखील हे प्रशिक्षण घेतेले ते अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मधून.
माहितीसाठी आभार : डॉ. निशिकांत विभूते, डॉ. नमिता जोशी आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट पुस्तक आणि श्री . राजीव कदम , अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट
- सुनीता करंडे
very thoroughly written. You may include pictures of AADM classes and AADM office contact nos. So that anyone, after reading , can contact us.
ReplyDeleteHari om Suneetavera, ambadnya for enlightening us on a very important aspect related to Disaster Management viz. 'Alertness'. Why it is so important because 'Alertness' is an attitude which takes long time to.change or develope. Pujya Samirdada always keeps on reminding us "Adhi Te Savadhpan". Ambadnya.
ReplyDeleteShreeram . Ambadnya. Rajeevsinh for your inspiration !!!!
ReplyDeleteAmbadnya Sanjaysinh....surely include Rescue Demonstration Photos of Training conducted by Aniruddha's Academy of Disaster Management in next article....
ReplyDelete