श्रीसाईसच्चरित ग्रंथाची भव्य-दिव्य प्रतिमा, ग्रंथकर्त्या लेखकाचे हेमाडपंताचे म्हणजेच श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर ह्यांची भव्य चित्राकृती आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा सुरु होता. खरे पाहता कोणतेही बक्षिस म्हटले की घेणार्या माणसाची उर आनंदाने भरून येते, छाती अभिमानाने फुलून येते आणि चेहर्यावर एक असीम आनंद दाटलेला असतो ,आपल्या परिश्रमाचे चीज झाले , अभ्यासाचे, मेहनतीचे सार्थक झाले म्हणून कृतार्थतेचा भावही ओसंदून वाहत असतो, पण ह्या सर्व आनंदात सहभागी व्हायला प्रत्येक जीवाला हवा असतो , तो त्याचा आप्त-जीवलग, ज्याच्या असण्याने "दुग्ध-शर्करा योग " जुळल्याचा आनंदही लुटता येतो. "त्या" एकमेव आप्ताच्या, सुहृदाच्या चेहर्यावर आपल्या विजयाचा आनंद चाखण्याची मजा काही न्यारीच असते नाही? मग असे श्रध्दास्थान कधी आई, कधी बाबा , कधी मित्र, कधी पती, कधी पत्नी असे कोणी असू शकते. पण येथे तर बहुतांशी सार्या परीक्षार्थींचे आप्त ही त्यांच्या समवेत आमंत्रित केले गेलेले दिसत होते, तरीही वातावरणात कुठेतरी , काही तरी उणीव भासत होती प्रकर्षाने , प्रत्येक नजर आसुसलेली होती, प्रत्येक कान अधीरपणाने "त्या"च्या आगमनाची अत्यंत आतर्तेने वाट पाहत होता, असे होते तरी कोण ? ज्या एकाचीच आस - तहान - भूक प्रत्येकाला लागली होती "तो" होता त्यांचा सदगुरु. सद्गुरु डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी ...एक महान दिव्य व्यक्तीमत्त्व...." दिव्यत्वाची जेथे प्रचिती येथे कर माझे जुळती " ह्याची जिवंत अनुभूती !!!!
Tuesday, 17 March 2015
Monday, 16 March 2015
शरण्योsस्मि - अवघा काय़ापालट !!!!
शरण्योsस्मि - अवघा काय़ापालट !!!!
शरण्योsस्मि - शरणागती म्हणजेच शरण जाणे .
भगवंता मी तुला शरण आहे म्हणणे म्हणजेच अवघा काय़ापालट असे समीकरण मांडल्यास वावगे ठरणार नाही.
महाशिवरात्र - म्हणजे भगवान शिव-शंकराच्या पूजनाचा अतिशय महत्त्वाचा दिवस. बहुतेक करून आपण सारे जण ह्या दिवशी उपास करून , साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी असा उपासाच्या पदार्थांवर आडवा हात मारतो.
आता जरा विचार करू या की "महाशिवरात्र" नाव ठेवण्यामागे काय बरे कारण असावे?
शिवाचे पूजन हे प्रदोषसमयाला केलेले अधिक श्रेष्ठ मानले जाते. प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताआधीचा अर्धा तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास. आपण मराठीत दोष हे वाईट किंवा चुकीचे अशा अर्थाने वापरतो. परंतु संस्कृत भाषेत ‘दोष’ म्हणजे ‘मूलभूत घटक’. सर्व सृष्टीतील मूलभूत घटक, तत्व अतिशय प्रकर्षाने कार्यरत होतात त्याला ‘प्रदोषकाळ’ म्हणतात.

चोरी ही फक्त पैशाचीच असते का?
चोरीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये तशा नेहमीच वाचतो. कोणाचे मंगळसूत्र ओढले, कोणाची सदनिका फोडली (घर फोडले), कधी कोणा बॅंकेवर दरोडा पडला, जवाहिर्याची वा सोनारांची दुकाने फोडली वगैरे. बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर इंटरनेटवरून दुसर्याचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करणे, दुसर्याचे क्रेडिट कार्ड चोरून वापरणे वगैरे गुन्हे करणार्या बुद्धीमान चोरट्यांबद्दल आपण नेहमीच वाचतो.तर क्वचित कोणाचा पासपोर्ट तर कधी मौल्यवान रत्ने चोरीला गेल्याचीही बातमी वाचतो. आजकाल तर राजरोसपणे विजेचीही चोरी केली जाते सर्रास असे वाचनात येते.
वृद्धांना होणारे संभाव्य अपघात आणि सभानता
लहान मुलांच्या बाबतीतील संभाव्य अपघात आपण मागील लेखात पाहिले होते , आता वृध्द आजी आजोबा मंडळीच्या अपघातांची ओळख करून घेऊ या.....
वृद्धांना होणारे अपघात -
" म्हातारपणं हे दुसरे बालपण असते " असे म्हणतात.
रक्तस्त्राव कमी असो वा जास्त दुर्लक्ष मुळीच करू नका.
वृध्दापकाळात वयोमानाबरोबर हाडांमधील कॅल्शियम द्रव्य कमी होत असते. शरीराची हालचाल कमी होऊन जडत्व आलेले असते. काही वृद्धांचा आहारही बराचसा कमी झालेला असतो आणि त्यामुळं अत्यावश्यक जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण झालेला असतो. ह्या सर्वांमुळं म्हातारपणी हाडं अतिशय ठिसूळ होतात. किरकोळ मार किंवा हातपाय लचकणं असली कारणेसुद्धा ती मोडायला पुरेशी असतात. बऱ्याचशा वृद्धांना डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर संधिवात इत्यादीं आजारांनी ग्रासलेले असते. त्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती (resistance power) , झीज भरून येण्याची शक्ती (healing power)सर्वच कमी झालेले असते. म्हणूनच किरकोळ जखमेतील रक्तस्त्राव थांबवणेही कधी कधी खूपच कठीण होऊन बसते. यावरूनच आपल्या लक्षात येईल की वृद्धांना कितीही किरकोळ इजा झालेली असो त्याची योग्य त्या गांभीर्यानं तिकडीनं दखल घेणं अतिशय आवश्यक आहे.
कवटी, दंड, मांडी, कंबर,मणके, हाताची बोटे, हाताचा तळवा, मनगट, खांदा, खुबा, , इत्यादी जागचे अस्थिभंग उपचार करायला अवघड असतात; कारण तुटलेले तुकडे एकत्र ठेवणे अवघड असते. म्हणून या प्रकारांसाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे जाणे आवश्यक आहे.

Saturday, 7 March 2015
माझा कुणा म्हणू मी?
नुकतीच होळी-पौर्णिमा अगदी जल्लोषात साजरी झाली . होळी म्हटली की मला पहिली आठवते ती बाळ प्रल्हाद आणि होलिका राक्षसीची गोष्ट. जन्मदात्या निष्ठुर पित्याच्या राक्षसराज हिरण्यकश्यपूच्या आदेशावरून त्याची बहीण होलिका राक्षसी प्रल्हादाला जिवंत अग्नीत जाळायला निघते. तिला आगीपासून अभय असते. पण प्रल्हादाच्या भक्तीच्या हाकेला त्याने ज्याला एकमेव आपला मानला, माझा मानला "तो" त्याचा लाडका महाविष्णू धाव न घेईल तरच नवल ....आणि मग विपरीत घडते, आगीपासून अभय वरदान असूनही होलिका आगीत भस्म होते आणि भक्त प्रल्हाद मात्र सुखरूप वाचतो.
अशा प्रल्हादाच्या भक्तीच्या , त्या बालरुपाच्या आठवणीत रमून सकाळी चालायला जाऊन घरी परतत होते आणि अचानक लक्ष वेधले ....
अशा प्रल्हादाच्या भक्तीच्या , त्या बालरुपाच्या आठवणीत रमून सकाळी चालायला जाऊन घरी परतत होते आणि अचानक लक्ष वेधले ....
Subscribe to:
Posts (Atom)