आज श्री आद्य शंकराचार्य जंयती.
श्री आद्य शंकराचार्यांनी अखिल मानव समाजाला श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र ह्या सारखी आदिमातेची अनेक स्तोत्रे देऊन आदिमातेच्या अनिर्वचनीय रूपाला शब्दबध्द करून जणू काही साक्षात तिचे प्रत्यक्ष दर्शनच घडवले आहे असेच वाटते.
चला तर मग आज त्यांच्या जंयतीच्या निमीत्ताने ह्या स्तोत्रांची आठवण करून त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करू या आणि आदिमातेच्या प्रेमात आकंठ अवगाहन करू या...
मूळ संस्कृत स्तोत्र पुढीलप्रमाणे आहे-
।। श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्।।
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्।।1।।
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्।
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।2।।
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।3।।
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4।।
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्।।5।।
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6।।
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्।।7।।
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।9।।
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10।।
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम्।।11।।
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु।।12।।
।। एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्।।
श्री आद्य शंकराचार्यांनी अखिल मानव समाजाला श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र ह्या सारखी आदिमातेची अनेक स्तोत्रे देऊन आदिमातेच्या अनिर्वचनीय रूपाला शब्दबध्द करून जणू काही साक्षात तिचे प्रत्यक्ष दर्शनच घडवले आहे असेच वाटते.
आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या १८ हातांमध्ये शस्त्रे असतात म्हणून काही लोक भोळ्या, भाबड्या भक्तांना घाबरवतात की हे देवीचे उग्र रूप आहे , तिच्या सर्व हातांत तर शस्त्रे आहेत , मग ती तुम्हाला मदत कशी करणार, ती सदैव उग्र रूपच धारण करते. त्या सर्व प्रश्नांना अगदी सोप्या पध्दतीने उत्तर देऊन शंकराचार्य निरुत्तर करतात. आदिमाता एवढी अपार करुणामयी आहे , तिची करुणा आपल्या लेकरांसाठी कशी सदैव भरभरून वाहते ह्याचे एवढे सुंदर वर्णन अजून तरी कोठे वाचनात नाही आले. आदिमाता उग्र रूप धारण करते , हातात शस्त्रे धारण करते ते दुष्ट . असुरांचा नि:पात करायला, त्यांनाचे निर्दालन करून श्रध्दावानांचे संरक्षण करायला , अन्यथा ती सर्वतोपरी प्रेमळ आणि प्रेमळच आहे, तिच्या इतुकी क्षमाशील अन्यत्र कोठेही सापडणे केवळ अशक्य...आदिमाता कशी आपल्या बालकाच्या अपराधाला पोटात घालून सदैव क्षमा करण्यास तत्पर असते हे जाणून घेऊ या , शंकराचार्यांच्या ह्या महान स्तोत्रातून ...
मूळ संस्कृत स्तोत्र पुढीलप्रमाणे आहे-
।। श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्।।
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्।।1।।
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्।
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।2।।
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।3।।
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4।।
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्।।5।।
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6।।
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्।।7।।
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।9।।
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10।।
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम्।।11।।
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु।।12।।
।। एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्।।
माझे परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्री अनिरुद्धसिंह जोशी (बापू) ह्यांनी त्यांच्या २८-०४-२०११ रोजीच्या प्रवचनातून दिलेली माहितीच्या आधारे काही मांडायचा प्रयत्न करीत आहे.
श्रीदेवी-अपराध-क्षमापन स्तोत्र हे आदिशंकराचार्यांद्वारे विरचित स्तोत्र आहे . मातृवात्सल्य -उपनिषद् अर्थात् श्री स्वस्तिक्षेमविद्य ह्या ग्रन्थात हे स्तोत्र उच्चारण आणि अर्थ समजण्यास सोपे जावे म्हणून पदच्छेद करून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दिले आहे, ते तसेच मांडत आहे.
आपण श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र वाचताना जाणवते की शंकराचार्यांच्या आकाशालाही गवसणी घालेल अशा अफाट ज्ञानाची वारंवार प्रचिती येते. शंकराचार्यांचे ज्ञान इतके महान होते की त्यांना त्रैलोक्य संचारण सिद्धि होती असे म्हटले जाते. .त्यांनी आदिमातेला ब्रम्हत्रिपुरसुंदरी ह्या नावाने आळवले.त्यांच्या श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्रातुन आदिमातेची खरीखुरी प्रतिमा उभी राहते. अगदी clean and clear, cut and Precise
न मत्रं न यत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न च आव्हानं ध्यानं तदपि न च जाने स्तुति कथा ।
ह्या स्तोत्रातून शंकराचार्य सांगतात की मी मंत्र, यंत्र जाणत नाही , तुझी गद्यात स्तुति कशी करायची हेही ज्ञान मला नाही , तुझे आवाहन कसे करायचे हे तर मला दुरान्वयेदेखील माहीत नाही. ध्यानाबद्दल तर मी अज्ञानीच आहे.
न जाने मुद्रा: ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मात: त्वद-अनुसरणं क्लेश हरणम् ।।
अगं आई, तुझ्या मुद्रांचे अर्थही मला कळत नाहीत, तु रागवलीस की आनंदी आहेस हे ही मला कळत नाही, एवढा मी अडाणी आहे. तुझ्या अठरा हातातील अठरा शस्त्रे तु कधी वापरतेस तेच मला कळत नाही.आई तुझ्याविना मला रडताही येत नाही गं, लहान बाळ जसे आई आई करुन रडते ते विरहाचे रडणेही मला जमत नाही गं ... एवढा मी बावळट आहे. परंतु एक मात्र मी नक्कीच जाणतो की तुझ्या मागोमाग (त्वद-अनुसरणं) येण्याने सर्व प्रकारच्या क्लेशांचा नाश होतो. आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक असो वा दानव, राक्षस ह्यांपासून होणारे क्लेश असो - असे कुठल्याही प्रकारचे क्लेश असूच शकत नाहीत. बाळाला आईने दूर लोटले तरी ते तिचाच पदर धरुन राहते, जेव्हा ते आईचा हात सोडून जाते तेव्हा मग ते कुठेतरी धडपडते, त्यामुळे क्लेश उत्पन्न होतो आणि आईचा विरह जाणवतो आणि मग ते बाळ परत आई आई करत आईच्या मागे मागे जाते.
विधे: अज्ञानेन द्रविण-विरहेण-आलसतया
विधेय- अशक्यत्वात् तव चरणयो: या च्युति: अभूत् ।।
शंकराचार्य सांगतात, मला पूजेचा विधीही येत नाही, माझ्याकडे द्रव्याचा अभाव आहे ,पण खरं गोष्ट आई ही आहे की, मी ह्या सबबी देतो कारण मी स्वभावाने आळशी आहे. तुझ्या मागे "आई,आई" म्हणत येण्याचा पण मी आळस करतो.त्यामुळे आई माझ्याकडुन पूजासुद्धा नीट होत नाही.ह्या सगळ्या कारणांमुळे मी तुझ्या चरणांपासुन दुर झालो आहे आणि त्याला कारण एकच माझा आळस.
आईचा मार्ग फक्त प्रभु श्रीपरशुराम दाखवतो.पहिली मानवी माता रेणुका आई हे त्याच आदिमातेचे रुप. म्हणजेच सगळ्या जगाला आदिमातेच्या उपासनेचा मार्ग दाखवतो तो परशुरामच. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद: ह्या ग्रंथामध्ये आपण बघतो प्रभु श्रीपरशुरामांच्या मनात माता रेणुकेच्या स्मृती जागृत होताना , ते व्याकुळ होतात आणि तेव्हाच त्यांना त्या आदिमातेची आठवण येते व मग त्याच ओढीने परशुराम श्रीगुरुदत्तात्रेयांकडे जातो व आदिमातेचे आख्यान ऐकतो. म्हणून शंकराचार्य जणू कळवळून सांगतात की आईच्यामागे जाण्याचा आळस करु नका. पुढे ते सांगतात, आणखीन काय करु ? मला क्षमा कर गं आई .कुपुत्र असणे सहज शक्य आहे पण आई तु कधीच कुमाता नव्हतीस व नसतेस.
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोध्दाराणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।।
"सकलोध्दाराणि" मराठीत "सगळे" ह्या अर्थाने सकल शब्द आपण वापरतो पण मूळ सकल शब्द खुप महान आहे. सगळ्यांचाच( जो जो उध्दार करुन घेऊ इच्छितो त्याचा) उध्दार करणारी.. किती अर्थ आहे ह्या षोड्शी मंत्रामध्ये !!
मनुष्याच्या त्रिविध देहाचा आधीच्या जन्मातील असलेल्या त्रिविध देहाच्या संबंधामुळे (बीजामुळे- पूर्व जन्मातील कनेक्शन ) क्लेश उत्पन्न होतात. सकल हे त्रिमितीवरचे आहे, हे कुठलेही क्लेश कारक संबंध ऊरु नयेत म्हणुन ही सकलोध्दाराणि आधीच्या जन्माशी जोडणारे बीज मुळापासुन उखडुन टाकते. ही सकलोध्दाराणि म्हणजे सकल - प्रत्येक गोष्टीचा उद्धार करते.मनुष्याच्या समग्रत्वाचा उद्धार करते म्हणजेच तुमच्याकडे जी गोष्ट ज्या स्थितीत आहे त्या स्थितीपासुन, त्या stage पासुन bestest stage पर्यंत तुम्हांला घेऊन जाते.
शंकराचार्यांचा हा कळवळा जणू आम्हाला सांगतो की तुम्ही आयुष्यात कितीही चुका करा पण ह्या आदिमातेचे चरण कधीही सोडू नका.
येथे आपण माता रेणुकेचा विरह होताना झालेला त्या परशुरामाचा शोक लक्षात घ्यायला हवा. स्वत:च्या शोकात बुडणारे अनेक असतात मात्र त्यातून सगळ्या विश्वाचा उध्दार करणारा तो एकच परशुराम , ज्याने आपल्याला मातृवात्सल्यविंदानम् दिले.
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहव: सन्ति सरला:
परं तेषां मध्ये विरल-तरलोsहं तव सुत:।
हे आई, प्रुथ्वीवर तुझे साधेसुधे भक्त असे तुझे पुत्र खूप असतील, परंतु त्यामध्ये अतिशय अवखळ असा मी एक आहे. तुझे सगळे पुत्र चांगले आहेत, मी एकटाच वाईट आहे. ह्यातुन शंकराचार्य सांगतात आधी स्वत:कडे बघा. ती आई अतिशय क्षमाशील असल्यामुळे ती माझ्या पुढे पुढे चालतच असते.
मदीय: अयं त्याग: समुचितं इदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।।
हा जो माझ्याकडुन तुझा त्याग केला गेला आहे हे उचित नाही गं आई...मग कर ना काहीतरी. मला जवळ तूच घे. मी वाईट आहे हे जाणुन तु मला जवळ घे . आईवार प्रेम कसे करायचे हे शंकराचार्य इथे शिकवतात.
हाक घालायची ना तर ती ह्या आईलाच. ज्या क्षणी तुम्ही तिला प्रेमाने हाक मारता त्या क्षणी ती तुमची मोठी आई झालेलीच असते. म्हणुन प्रेमाने तिला हाक मारा,तिचे कुठलेही नाव घ्या.
येथवर आपण आदिमातेचे सातत्याने दुथडी भरून वाहणारे प्रेम, अपार क्षमा अनुभवली, आता तिचे हे प्रेम निरपेक्ष कसे आणि किती अमर्याद आहे, तिला ना आपल्या सेवेची गरज ना आपण वाहिलेल्या धनाची अपेक्षा... कसे काय हे जाणून घेण्यासाठी उर्वरीत भाग वाचायला थोडी प्रतिक्षा करु या...
संदर्भ सूची :
१. सद्गुरु डॉक्टर श्री अनिरुद्धसिंह जोशी ह्यांचे २८-०४-२०११ रोजीचे प्रवचन.
२. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद:
३. मातृवात्सल्य -उपनिषद् अर्थात् श्री स्वस्तिक्षेमविद्या.
- क्रमश:
येथवर आपण आदिमातेचे सातत्याने दुथडी भरून वाहणारे प्रेम, अपार क्षमा अनुभवली, आता तिचे हे प्रेम निरपेक्ष कसे आणि किती अमर्याद आहे, तिला ना आपल्या सेवेची गरज ना आपण वाहिलेल्या धनाची अपेक्षा... कसे काय हे जाणून घेण्यासाठी उर्वरीत भाग वाचायला थोडी प्रतिक्षा करु या...
संदर्भ सूची :
१. सद्गुरु डॉक्टर श्री अनिरुद्धसिंह जोशी ह्यांचे २८-०४-२०११ रोजीचे प्रवचन.
२. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद:
३. मातृवात्सल्य -उपनिषद् अर्थात् श्री स्वस्तिक्षेमविद्या.
- क्रमश:
No comments:
Post a Comment