सर्वसामान्यत: anti-biotics हा शब्द ऐकला नाही असा माणूस शोधून देखिल सापडणे दुर्मिळच म्हणावे लागेल इतका आजकाल हा anti-biotics शब्द हा आजाराशी अगदी जवळचे नाते बनवून बसलाय. सर्वसामान्यपणे सर्दी/पडसे किंवा, खोकला , ताप , जुलाब झाले आणि डॉक्टरांकडे गेले तर आपल्याला डॉक्टर सांगताना आढळतात की तुम्हाला बॅक्टेरियल इनफेक्शन ( bacterial infection/ viral infection) झाले आहे आणि anti-biotics घ्यावी लागतील. तर कधी कधी उलटेच चित्र दिसते की डॉक्टर सांगतात दोन तीन दिवस औषधे घ्या बरे वाटेल, पण आम्हालाच घाई झालेली असते लवकर बरे वाटावे म्हणून आणि मग आम्हीच डॉक्टरांना सांगतो, " नाही डॉक्टर, ताबडतोब बरं वाटलं पाहिजे, तुम्ही आताच anti-biotics सुरु कराच !
बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. पण जीवाणू म्हणण्यापेक्षा बॅक्टेरिया हा शब्द जास्त परिचयाचा असल्याने पुढील भागात आपण जीवाणूऐवजी बॅक्टेरिया शब्दच वापरू या.
बॅक्टेरिया हे अपायकारक , घातक असतात , पण सर्वच बॅक्टेरिया हे वाईट किंवा अपायकारक असतातच असे नाही, काही बॅक्टेरिया चांगले पण असतात हे मला डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या " आपले आरोग्य " ह्या दिनांक १३ डिसेंबर २०१४ च्या व्याख्यानाला जाऊन कळले.
डॉक्टर अनिरूध्द जोशी सांगत होते की आपली आतडी अत्यंत चांगली असणं , हीच आपल्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.
The Healthy Gut is hidden key to perfect health.