सध्याची उत्तर कोरीया आणि दक्षिण कोरीया मधील चिघळत जाणारी परिस्थिती पाहताअमेरिकेचे आशियासंबंधितविषयाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व्हिक्टर चा ह्यांचा ४ वर्षांपूर्वी दिलेला इशारा खरा होत आहे., असे दिसत आहे. व्हिक्टर चा ह्यांचे ४ वर्षांपूर्वी ’ द इम्पॉसिबल स्टेट ’ ( The impossiblle state) पुस्तक प्रसिध्द झाले होते. या पुस्तकात त्यांनी उत्तर कोरीया या देशाची मानसिकता आणि त्याचा जगाला असलेला धोका उलगडून सांगताना अनेक इशारे दिले होते.
दोन महिन्यांपूर्वी उत्तर कोरीयाने आंतरराष्ट्रीय विरोधाला न जुमानता अणुचाचणी केली. त्यानंतर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या. अमेरीकेची बेटेही या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याचा उत्तर कोरीयाचा दावा आहे. उत्तर कोरीया ज्या पध्द्तीने सध्या आक्रमकपणे हालचाली करत आहे, ते वाचून व्हिक्टर ह्यांच्या ’ द इमपॉसिबल स्टेट ’ ची आठवण झाली. ह्या पुस्तकात व्हिक्टर चा ह्यांनी उत्तर कोरीयाच्या झाकलेल्या भूतकाळावरील पडदा दूर केला आहे आणि भविष्यातील अनिश्चित आकस्मिक विध्वंस घडविण्याच्या शक्यतेवर वा त्यातून उदभवणार्या प्रखर भीषण वास्तवावर प्रकाश टाकला आहे.
उत्तर कोरिया हा दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलवर एका प्रचंड आक्रमणाची तयारी करीत आहे ज्यातून ताशी पाच लाख तोफखान्याच्या गोळ्यांचा धुवांधार वर्षाव डागला जाऊ शकतो आणि त्याच बरोबरीने ६०० रासायनिक बॉम्ब विमानतळाचा धुव्वा उडवून बेचिराख करू शकतात. उत्तर कोरियाच्या ह्या विनाशकारी हल्ल्यातून दक्षिण कोरियाला मदतीचा हात द्यायला जराही विलंब न लावता त्वरेने अमेरीका आणि दक्षिण कोरीयाचे इतर सहयोगी देश पुढे सरसावतील, ज्याची परिणती युध्दात होऊ शकते अशी चेतावणी व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार श्री ’व्हिक्टर चा' (Victor Cha) ह्यांनी ह्या पुस्तकात दिली आहे. उत्तर कोरीया जे युध्द पुकारण्याची तयारी करीत आहे, त्यात लाखो जीव आपल्या प्राणाला मुकू शकतात अशी भीती व्हिक्टर व्यक्त करतात.
KIM Inspects ... |
’ द इमपॉसिबल स्टेट ’ ( The impossiblle state) पुस्तकातून उत्तर कोरीयाच्या युध्दाच्या अवाढव्य क्षमतेचा आढावा घेतला आहे. देशातील बहुतांश भाग हे अन्नधान्याच्या तीव्र कमतरतेने ग्रासलेले आहेत ज्यांना अन्नधान्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मजुरी मिळाली होती. हुकूमशहा किम जॉंग-ऊन ह्यांच्या शासनकाळात लोकसंख्येच्या अन्न पुरवठ्याच्या मागणीला तोंड द्यायला असमर्थता आल्याने अब्जावधि लोकांना भुकेला आणि उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण कोरीयाने जनतेच्या मनात अशांती आणि असमाधान खदखदत असल्याचा दावा व्यक्त केला आहे. ह्या परिस्थितीवर मात करून नियंत्रण मिळविण्याकरिता किम जॉंग-ऊन ह्यांनी त्यांच्या सैन्याला दक्षिण कोरीयात घुसविण्याच्या योजना आखायचा आश्रय घेतला आहे. त्यांच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी दक्षिण कोरीयाच्या राष्ट्र्पतिंच्या महालाची प्रतिकृती बांधून घेतली आहे. ह्या आक्रमणाचा खर्च हाअंदाजे १अब्ज डॉलर इतका असून एक ट्रिलियन डॉलर इतक्या किंमतीच्या मालमत्तेची नासधूस आणि नुकसान संभवते.
ह्या हल्ल्याचे प्रमुख उद्देश्य उर्जा प्रकल्प आणि संपर्क यंत्रणेची नासधूस आहे ज्यातून संपूर्ण दक्षिण कोरीया हा जमीनदोस्त होऊन तेथे अराजकता, गोंधळ माजेल. व्हिक्टर ह्यांनी अशी चेतावणी दिली आहे की ह्या प्रसंगी जपान दक्षिण कोरीयाच्या मदतीसाठी मिसाईलसह एक जोरदार मुंसडी मारून तळ ठोकेल व युध्दात उडी घेईल अशी दाट शक्यता आहे. जपान हा किनारी भागात व्यस्त झाल्यावर उत्तर कोरीयाचे ७ लाख सैन्य आणि २० हजार शस्त्रास्त्रांनी सुसज्ज टॅंक्स ( सुमारे ४७५ फूट खोल आक्रमण करण्यासाठी निर्माण केलेल्या बोगद्यांतून , ज्यापैकी काही प्रती ताशी ३०,००० सैन्याची वाहतूक करण्याची क्षमता आहे ) दक्षिण कोरीयात थेट घुसून विध्वंसक नरसंहार करतील असा व्हिक्टर ह्यांचा दावा आहे. हे सैन्य युध्दभूमीवरील सुमारे ५००० मॅट्रीक टन एवढा परीसर नर्व्ह गॅस, मस्टर्ड गॅस आणि जैविक शस्त्रात्रे वापरून दूषित करून करोडो लोकांना ठार मारतील असे मत चा ह्यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर कोरीयाच्या उत्कृष्ट प्रतिकार तंत्रामुळे शत्रूने प्रति-आक्रमण केले तरी त्यातून शत्रूचाच प्रचंड नरसंहारच होण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर कोरीयाचे सैन्य हे जगातील अत्यंत भयावह सैन्यापैकी एक म्हणून प्रसिध्द आहे, ज्यातील सैन्य हे दर दिवशी ३१ मैलाचा अथक प्रवास ८८ पौड वजनाच्या सामानासह करू शकते. ह्या सैन्याला घुसखोरी आणि गुप्त ऑपरेशनचे एवढे सखोल प्रशिक्षण दिले जाते की ज्यात स्वंयपाकाच्या भांड्याचा सुध्दा वेळप्रसंगी शस्त्रे म्हणून वापर करण्यात ते प्रवीण असतात.
Troops march |
हे अनपेक्षित आक्रमण हे अमेरीकेला आणि इतर पाश्चिमात्त्य राष्ट्रांना युध्दात खेचेल. ह्या संघर्षातून प्रचंड युध्दाच्या ज्वाळा पेट घेतील ज्याचे दोन्ही पक्षांना आघात सोसावे लागतील . उत्तर कोरीयाचे हे घणाघाती हल्ले पचवून त्याच्या परिणामाला तोंड द्यायला अमेरीका , दक्षिण कोरीया आणि त्याच्या सहयोगी मित्र राष्ट्रांना फार मोठा काळ वाट पहावी लागेल.
ह्या दरम्यान जरी उत्तर कोरीयन जनसंख्येला तीव्र अन्नधान्य टंचाईला सामोरे जावे लागत असले तरी ह्या देशाच्या सैन्य तळावर सहा महिने पुरेल इतक्या अन्न साठा आणि इंधन साठा सुरक्षित साठवलेला आहे. येथील बंकर मध्ये भरपूर ताज्या पाण्याचा साठा केलेला आहे आणि प्यॉनग्यांग राजधानीच्या खाली सुमारे १ लाख लोक राहू शकतील असा सुरंग (बोगदा) बांधून तयार केला आहे ही आश्चर्यजनक बाब आहे असे मत व्हिक्टर चा त्यांच्या पुस्तकात नमूद करतात.
उत्तर कोरीया ज्या पध्द्तीने सध्या आक्रमक हालचाली करत आहे, अमेरीकेवर हल्ल्याच्या धमक्या देत आहे, ते पाहून व्हिक्टर यांच्या पुस्तकातील या गोष्टी आठवल्यावाचून राहत नाहीत. त्यामुळे व्हिक्टर ह्यांनी वर्तविलेला धोका जवळ येत असल्याचे जाणवत राहते. अर्थात उत्तर कोरीयाला चीनची फूस आहे, हे उघड आहे. उत्तर कोरीयाला अणु तंत्रज्ञानही पाकिस्तानमार्फत चीननेच पुरविले आहे. दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुध्द जोशी यांच्या ’तिसरे महायुध्द’ या पुस्तकातून चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरीया या तिकडीचा जगाला असलेला धोका ठळकपणे मांडला आहे.पाकिस्तानात सध्या जी परिस्थिती आहे, चीन आणि उत्तर कोरीया ज्या पध्दतीने सध्या आक्रमक हालचाली करत आहेत, ते पाहून या तिकडीच्या हालचाली लवकरच जगात विध्वंस माजवितील, हे लक्षात येते.
संदर्भ ;
१. http://www.newscast-pratyaksha.com/north-korea-will-drag-west-into-third-world-war/
२.http://www.dailystar.co.uk/news/latest-news/512138/North-Korea-invasion-plan-South-Korea-USA-Japan-DMZ
३.http://www.express.co.uk/news/world/666468/World-War-Three-North-Korea-planning-war-with-West-which-could-leave-ONE-MILLION-dead
सूचना : हा लेख पहिल्यांदा "दैनिक प्रत्यक्ष" मध्ये २३ मे २०१६ रोजी प्रकाशित झाला होता. त्याचे कात्रण सोबत देत आहे.