Sunday, 16 October 2016

युरेका युरेका ....आर्किमिडीज !

"युरेका युरेका" शब्द उच्चारताच आठवतात ते पटकन जगद्विख्यात शास्त्रज्ञआर्किमिडीज ! " युरेका" हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेतील εὕρηκα ह्या शब्दावरून प्रचलित झालेला शब्द ! ह्याचा अर्थ इंग्लिश भाषेत I have found it म्हणजेच मला ती मिळाली म्हणजेच मला सापडले, मला गवसले असाच होतो. 

आपण एखादी गोष्ट शोधत असतो बराच वेळ आणि आपल्याला ती सापडता सापडत नाही. आपण  ती हरवलेली गोष्ट म्हणा वा वस्तू बर्‍याच ठिकाणी नेहमीच्या ठेवायच्या वा अनपेक्षित जागीही शोधतो, पण ती काही केल्या सापडत नाही. तेव्हा सतत त्याच हरवलेल्या गोष्टीचा विचार आपल्या मनात घोळत राहतो, आपल्या ध्यानी -मनी तीच गोष्ट दिसत राहते आणि कधी एकदा ती सापडते असे आपणास होऊन जाते, आणि मग अचानक ती गोष्ट सापडते तेव्हा आपल्याला होतो तो आनंद अगदी अवर्णनीय असाच असतो नाही का?  

अप्रगत काळात आणि प्रतिकूल परिस्थितींमध्येही आपल्या विवेकशक्ती आणि तारतम्य ह्यांमुळे आपले विशेष स्थान बनविणार्‍या मान्यवरांमध्ये आर्किमिडीज ह्यांचे नाव विशेषत: गणले जाते. इ.स.पू. काळातील जेता मानल्या गेलेल्या रोमन सैनिकांना आपल्या शहराच्या सीमांवर रोखण्याचे अत्यंत धाडसाचे, शौर्याचे काम करणार्‍या ह्या प्रतिभासंपन्न संशोधकाचे नाव होते ’आर्किमिडीज’.

आर्किमिडीज  हे कल्पक वैज्ञानिक संकल्पनांचा जनक म्हणून प्रसिध्दीस आलेले (इ.स.पू. २८७ – इ.स.पू. २१२) प्राचीन ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ , अभियंता , संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म सिसिलीमधील सेरॅक्यूज येथे झाला. सेरॅक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. स्वत: खगोलशास्त्रज्ञ असलेल्या आर्किमिडीजच्या पित्याने त्यांना शिक्षणासाठी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे पाठविले होते, तेथीच त्यांचे सर्व शिक्षण झाले.

आर्किमिडीज ह्यांनी गणितातील घनफळ , पॅराबोला इत्यादी विषयांवर अत्यंत मोलाचे संशोधन केले.  तसेच भूमिती ,अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलीआहे. “पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते” हे त्यांचे तत्त्व ‘आर्किमिडीजचा सिद्धान्त’ या नावाने सुप्रसिद्ध आहे.

अशा ह्या विवीध क्षेत्रांत आपले मौलिक योगदान देणार्‍या आर्किमीडीज ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक सुंदर रीत्या मांडलेला,  माहितीपूर्ण लेख एका संकेतस्थळावर वाचनात आला आणि माझ्या वाचक मित्रांसवे तो वाटून त्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी तळमळ लागली.

नक्की जाणून घ्या - आर्किमिडीज ह्यांचे अमूल्य योगदान ...
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/archimedes/

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog