दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ मे २०१७ रोजीच्या अंकातील "नक्षलविरोधी मोहिमेतील ३६११ जवानांचा आजारपणामुळे मृत्यु" ही खरोखरीच दखल घेण्याजोगी गंभीर बाब आहे.आपले सैनिक म्हणा जवान म्हणा हे देशप्रेमापोटी आपले प्राण तळहाताच्या शिरावर घेऊन आपल्या भारतभूमीच्या संरक्षणासाठी सिध्द होऊन आपले कार्य बजावीत असतात. शत्रूशी लढताना शहीद होणे ही गोष्ट प्रत्येक सैनिकासाठी आत्मसन्मानाची गोष्ट असते. या जवानांच्या अन्न, वस्त्र , निवारा ह्या सारख्या मूलभूत मानवी गरजांसह त्यांना आघाडीवर उच्चस्तरीय वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्याची गरजही स्पष्ट झाली आहे. आजारपणामुळे सैनिक जीवनाला मुकले असल्याचे वृत्त वाचून खूप दु:ख झाले.
गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी मोहिमेत ’सीआरपीएफ़’, ’सीमा सुरक्षा दल’, ’आयटीबीपी’, ’एसएसबी’, ’सीआ्यएसएफ’, ’एनएसजी’ आणि ’आसाम रायफल’ चे जवान तैनात करण्यात आले आहेत. यातील १०६७ जवान नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झाले आहेत तर ३,६११ जवानांचा आजारपणामुळे मृत्यु झाला असल्याची आकडेवारी समोर आली. यावरून शहीद जवानांपेक्षा आजारपणामुळे मृत्यु पावणार्या जवानांचे प्रमाण तिपट्टीपेक्षासुध्दा अधिक असल्याची धक्कादायक गोष्ट लक्षात येते. म्हणूनच संबंधित बातमीत मांडण्यात आलेली आकडेवारी ही बाब खरोखरीच चिंताजनक आहे असे वाटते.
नुकत्याच सुकमा येथे २४ एप्रिल रोजी झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपले २५ जवान शहीद झाले ही खूपच दु:खद बातमी वाचून मन सुन्न झाले होते. देशाच्या सीमांवरील संरक्षणाच्या बरोबरीने अंतर्गत शत्रूंच्या कारवायांनाही सैनिकांना तोंड द्यावे लागत आहे. २४ एप्रिलच्या घटनेनंतर आज सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. माझ्या घरचे माझी काळजी करीत असतील आणि तरीही मी सुखरूप ( जिवंत) आहे ही गॊष्ट माझ्या घरी मी अजूनही कळवू शकत नाही येथील वायरलेस लोकल लूप (WLL) च्या फोनवरून . फोनला नेटवर्क मिळत नसल्यास सुकमा . साऊथ छत्तीसगड सारख्या संवेदनशील नक्षलग्रस्त भागात तैनात जवानांच्या दळणवळणात तर अडथळा येतोच . पण , त्यांना स्वत:ची खुशाली घरी कळविणेही शक्य होत नसल्याचे जाणून चिंता वाटते. आपण शहरांमध्ये , गावागावांमध्ये ४जी , ३जी नेटवर्क पोहचले अशा जाहिराती बघतो अशा परिस्थितीत नक्षलग्रस्त भागात आवश्यकता असतानाही मोबाईल सिग्नल पोहचत नसल्याचे वाचून मनाला प्रश्न पडला, की खरेच आज आपण म्हणतो तशी आणि तेवढी आपली प्रगती वास्तविक पातळीवर झाली आहे का ? आणि या प्रगतीचा योग्य वापर होत आहे का?

आरोग्यासाठी झुंज :
सुकमा . साऊथ छत्तीसगड येथील बुरकपाल गावाजवळील कॅम्पमध्ये पोस्टींग झालेल्या जवान सामोरे जात असलेल्या विपरित परिस्थितीची माहिती वाचून मन गलबलते - १५० जवान तेथे तैनात आहेत पण तेथे वसतिगृह नाही , झोपायला पुरेशा गाद्या नाही , त्यांचे वैयक्तिक सामान ठेवायला व्यवस्था नाही.
परंतु त्याही पेक्षा भयाण वास्तव म्हणजे तेथील झाडाझुडूपांमुळे आणि किड्यांपासून होणारा त्रास . शरीराच्या त्यामुळे उठणारे रेशेस जवानांसाठी त्रासदायक ठरतात. भर जंगलात तैनात असताना जवानांना तत्काळ डॉक्टर भेटणे मुश्कीलच. चारी बाजूंनी नक्षलवाद्यांचा धोका असलेले जंगल पसरले असताना कोणी जवान अजारी पडलाच तर लागलीच डॉक्टरपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी जवानांना रूग्णाला पायी किंवा गाडीने घेऊन डॉक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेत नक्षलवाद्यांचा धोकाही संभवतो. एकूण परिस्थिती म्हणजे , कोणी आजारी पडलेच तर त्याला फक्त देव किंवा हेलिकॉप्टरच वाचवू शकते. प्रत्येक महीन्याला एखादा तरी जवान मलेरीयाने आजारी होऊन अंथरूणाला खिळत असेल तर परिस्थिती बिकटच म्हणावी लागेल. म्हणजेच आपल्या जवानांना शत्रूशी लढण्याआधी स्वत:च्या आरोग्यासाठी लढावे लागत असल्याचे जाणवते.
"भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी " असे गाजलेले गीत कानी पडायचे युध्दाच्या काळी किंवा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या दिवशी, खरेच ह्याची आठवण आज आल्यावाचून रहावत नाही . आपला सुजाण नागरीकांचा घास खरेच अडकतो का ? ह्याचा आपणच विचार करायला हवा आणि जमेल तसे आपापल्या परीने आपण भारतीयांनी आपल्या सैनिकांसाठी आपले योगदान द्यायलाच हवे आणि आपल्या जवानांच्या आरोग्यासाठी सरकारने अधिक ठोस पावले उचलायलाच हवी असे आवर्जून म्हणावेसे वाटते.
सूचना - "जवानांचे आजरपणामुळे मृत्यु - गंभीर बाब " हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १५ मे २०१७ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता.