आज माझ्या एका आप्त स्नेह्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग कानी आला आणि मन विचारात पडले. त्याचे असे झाले की माझे हे आप्त संगीत क्षेत्रातील अत्यंत जाणकार आणि स्व मेहनतीने संगीतात कौशल्य संपादन करत असलेले व्यक्तीमत्त्व. एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील पारितोषक वितरण समारंभाला हे गेले होते. तेथे मोठ-मोठ्या प्रथितयश व्यक्तींशी भेट-गाठ होत होती, नव्याने ओळख होत होती. नाट्य-संगीत क्षेत्रातील अनेक नामांकित कलावंताशी भेट घेताना ह्या माझ्या स्नेह्याने कोठेही स्वत:च्या कलेच्या अभिरुचीचा वा संगीत क्षेत्रातील प्राविण्य संपादलेल्या मान-सन्मानाचा आधार जराही घेतला नाही. उलट स्वत:ची ओळख आपल्या सदगुरुंच्या नावाने करून दिली...खरेच हृदय हेलावून गेले, सदगदीत झाले मी....किती हे भाबडे , निर्व्याज प्रेम आपल्या सदगुरुवर, कोठे ही स्वत:च्या यशाची, प्रसिध्दीची, मान-सन्मानाची जराही अपेक्षा न ठेवता फक्त सदगुरुंच्या नावातच आपली खरी ओळख असल्याचे भान ठेवणे...मी अवाक् झाले....त्या प्रसंगाने विचारांची शृंखलाच उद्धृत झाली माझ्याही नकळत...आपोआप --
Saturday, 21 February 2015
Saturday, 14 February 2015
लाभेवीण प्रिती
आश्चर्य वाटले असेल ना? शीर्षक वाचून, अगदी बुचकाळ्यात देखील पडला असाल ना? आज-कालच्या कलीयुगात जो तो आपला आपला मतलब आपला स्वार्थच पहाण्यात मशगूल असतो, जेथे माणसूकीची चाड देखील राहिलेली नाही अशाही काही किळसवाण्या घटनांनाही आपण सामोरे जातो तर मग ह्या जगात असे स्वत:च्या लाभाशिवाय कोणी तरी प्रेम करू शकेल का? साहजिकच उत्तर वाटते नाही, नाही , छे , छे हे तर केवळ अशक्यच आहे. मी ही ह्याच मताची होते खरे तर , पण जेव्हा भगवंताच्या आपल्या वरील अपार मायेची, प्रेमाची जाणीव होऊ लागली आणि भगवत्स्वरूप असणार्या सदगुरुंचा जीवनाला परीस स्पर्श झाला तेव्हा मात्र ह्याची पुरती अनुभूती आली आणि मग मात्र स्वत:च्या मताला बदलावेच लागले.
Monday, 9 February 2015
लहान मुलांची दुखापत आणि सतर्कता
आधीच्या लेखात सतर्कता आपण पाहिली. यावरुन एक गोष्ट आठवली मी शाळेत असताना वाचली होती. गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सतर्कतेची. शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराजांनी आपल्या सैन्याच्या अधिकार्यांना लिहिलेल्या एका पत्रात असे नमूद केले होते की रात्री निजताना पेटत्या दिव्यांची ज्योत मालवावयाची काळजी घ्यावी अन्यथा उंदरानी ती ज्योत इतस्तत: नेऊन टाकल्यास सुके वैरण वा दाणापाणी असलेली कोठारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील आणि प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागेल. राजे आपल्या सैन्याबाबत किती जागरूक आणि दक्ष होते ह्याची जाणीव होते. असे असावे आपत्ती व्यवस्थापन प्रशासकीय पातळीवरचे.
Friday, 6 February 2015
सतर्कता - आपत्ती व्यवस्थापनाची प्रथम पायरी
आपत्ती व्यवस्थापन हे काही फक्त भूकंप, पूर, दुष्काळ, त्सुनामी ह्या सारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा आगी, दंगली ह्यासारख्या मानव निर्मीत आपत्ती ह्या भल्या मोठ्या आपत्तींपुरतेच मर्यादीत असते असे नाही.
भले मग ते घरगुती अपघात असो स्वत:च्या घरातले वा शेजारच्या घरातले किंवा आपण राहतो त्या इमारतीमधील वा आपण राहतो त्या परिसरातील, तरी देखील अपघात हे अपघातच असतात. अचानक, अनाहूतपणे, आकस्मिकरित्या आलेले कोणतेही संकट हे त्या त्या माणसासाठी मोठी आपत्तीच असते नाही का बरे एक प्रकारे?
चला तर मग आपण काही उदाहरणेच पाहू या -
Wednesday, 4 February 2015
प्रदक्षिणा
नुकतीच माघी गणेश चतुर्थी साजरी झाली ,त्या निमीत्ताने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या काही कथांची आठवण झाली. श्री गणेशाचा जन्म मंगळवारी माघी शुध्द चतुर्थीला झाला त्यामुळे हा दिवस " श्री गणेश जयंती" म्हणून साजरा केला जातो. श्रीगणेशाला श्रीगजानन, गणपती अशीही दुसरी नावे आहेत. श्रीगणेश म्हणजे साक्षात परब्रम्ह !
Subscribe to:
Posts (Atom)