दैनिक प्रत्यक्षमधील हायपरसोनिक क्षेपणास्त्रासंबंधी लागोपाठ आलेल्या दोन बातम्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. त्यातील पहिली बातमी होती - रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्रासह ’हायपरसोनिक’ यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि त्या पाठोपाठ दुसरी बातमी होती - की रशिया नंतर लगेच दुसर्या दिवशी चीनने एका तासात अकरा हजार किलोमीटर अंतर पार करू शकणार्या त्यांच्या ’डीएफ -झेडएफ’ (DF-ZF) ह्या अणवस्त्रवाहू हायपरसोनिक क्षेपणास्त्राची सातवी यशस्वी चाचणी घेतली. ह्या दोन्ही बाताम्यांनी सर्वत्र मोठी चर्चेची झोड उठवून दिली. काही विश्लेषकांच्या मते ह्या दोन्ही हायपरसोनिक क्षेपणांस्त्रांच्या यशस्वी चाचण्या रशिया, चीन आणि अमेरीकेमध्ये हायपरसोनिक शस्त्रांत्रांबाबत सुरु असलेली स्पर्धा दर्शवित आहे.
या बातम्यांच्या अनुषंगाने क्षेपणास्त्र , आधुनिक युध्दातील त्यांचे वाढते वर्चस्व याबाबत कुतुहल चाळवले गेले आणि सध्याच्या काळातील ह्या आधुनिक शस्त्रात्रांचा वाढता प्रभाव , तिसर्या महायुध्दाचे पडघम वाजू लागल्याचे वारंवार दिले जाणारे संकेत, सार्या जगाला ग्रासून टाकणारी एक अनामिक भीती, बद्दल जे वाचनातून जाणवले ते मांडण्याचा हा प्रयास-
’क्षेपणास्त्र ’ म्हणजे मिसाईल ( missile) . क्षेपणास्त्र हा शब्द तसा आजकाल वारंवार कानावर पडत असतो . परंतु आपण सामान्य माणसे ह्या युध्दाच्या गोष्टी जाणून आपल्याला काय करायचे आहे अशा काहीशा तटस्थ भूमिकेमुळे क्षेपणास्त्रे म्हणजे नक्की काय असते , खरेच त्यांचा एवढा प्रभाव भयावह आहे का? आणि असल्यास का ह्याची उत्तरे शोधण्याचा ना प्रयास करत , ना आपली जिज्ञासा दाटून येत असे बहुतांशी कमी-अधिक फरकाने चित्र आढळते.
पूर्वीच्या काळापासून युध्द हे फक्त देशाच्या सीमेवर दोन वा अधिक देशांच्या सैनिकांमध्ये लढले जाते असे चित्र आढळत असे. पण ह्या विचारसरणीला तडा गेला जेव्हा ४ डिसेंबर २००६ साली डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांनी लिहिलेले " तिसरे महायुध्द" वाचनात आले आणि डोळे खाडकन उघडले. सध्याची युध्द ही फक्त सीमांपुरतीच मर्यादीत राहिली नसून त्या देशातील शहरांतील, गावांतील नागरीकांपर्यंत आणि थेट घराघरांमध्ये ह्यांची व्याप्ती पोहचलेली आहे असे प्रकर्षाने आढळले. त्यामुळे बदलत्या काळाबरोबर पावले न उचल्यास माणसाचा घात हा खूपदा अज्ञानामुळे संभवू शकतो ह्याची जाणीव प्रखरतेने मनाला भिडली.
"Survival of the fittest" ह्या नियमाला अनुसरून आपण बदलत्या काळाची पावले ओळखून स्वत:ला बदलले नाही तर आपण ह्या काळात तग धरून राहूच शकत नाही हे ह्या पुस्तकाच्या वाचनाने प्रकर्षाने जाणवले आणि मग दिवसागणिक येऊन धडकणार्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बातम्यांच्या आधारे आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयास सुरु केला... ज्याला मोलाचा हातभार लावला गेला दैनंदिन आंतरराष्ट्रीय घडामोडींना प्राधान्य देणार्या दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून !
क्षेपणास्त्रे ही बहुत करून आण्विक अस्त्रे त्याच्या टप्प्यापर्य़त पोहचविण्यास सहाय्य करणारी यंत्रणा असते असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. पहिले महायुध्द झाले , दुसरे महायुध्द झाले आणि तिसरे महायुध्द सुध्दा सुरु झाल्याच्या बातम्य़ा आणि त्याला दुजोरा देणारी वक्तव्ये सध्या वारंवार कानी येतात. आज येऊ घातलेल्या वा सतत दार ठोठावणार्या तिसर्या महायुध्दाच्या बातम्यांनी ध्यानी येते ते प्रखर वास्तव की पहिल्या दोन महायुध्दांपेक्षा होणारा विध्वंस , जीवीत हानी, वित्त- हानी ही कैक पटींनी वाढणार आहे. आज देशांमध्ये स्वत:चे सामर्थ्य वाढवून केवळ स्वत: अधिक बलशाही होण्याचेच ध्येय उरले नसून , स्वत:च्या देशाच्या सीमा विस्तारण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसते. आज येऊ घातलेल्या तिसर्या महायुध्दामध्ये हवेतून बॉम्बफेक करणार्या विमानांपेक्षाही ही आंतरराष्ट्रीयच नव्हे तर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अधिक विध्वंस सहज , सोप्या पध्दतीने घडवून आणू शकतात असे निदर्शनास आले.
’क्रूज मिसाईल’ हे या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आघाडीचे पाऊल ! पहिल्या महायुध्दाच्या वेळी म्हणजे १९१७ साली सर्वात प्रथम ’केटरींग बग’ ह्या शास्त्रज्ञाने ही क्रूज मिसाईल पहिल्यांदा विकसित केली खरी, पण त्याचा युध्दात काही वापर झालाच नाही आणि पहिले महायुध्द संपले. त्यानंतर मात्र हिटलरच्या नाझी जर्मन सैन्याने दुसर्या महायुध्द्दाच्या वेळीस इ.स. १९४४ साली जगात सर्वप्रथम ह्या क्रूज मिसाईलचा वापर केला होता. ह्या पहिल्या क्रूज मिसाईलचे नाव ’व्ही -वन ’ (V-1) होते. ह्या प्राथमिक क्रूज क्षेपणास्त्रांचा टप्पा आणि दिशा अचूक नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यांना फेकणार्या मशिनचा प्रचंड मोठा कर्णकर्कश आवाज होत असे आणि त्यामुळे त्यांना ’बझ बॉम्ब ’ (Buzz bomb) असे नाव मिळाले.
पुढे अमेरीकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्बहल्ल्यामुळे दुसरे महायुध्द संपले खरे, पण दुसर्या महायुध्दाच्या अनुभवाने भीतीपोटी म्हणा वा स्वत:च्या सुरक्षेपोटी सावध झालेली राष्ट्रे स्वत:ला अधिकाधिक शस्त्रात्रांनी सुसज्ज , संपन्न आणि बलशाली करण्यासाठी पावले उचलू लागली. अमेरीका व सोविएत युनियन म्हणजेच सध्याचा रशिया ह्या दोन महासत्त्तांनी आण्विक शस्त्रांत्रामध्ये जोरदार प्रगती करून प्रचंड प्रमाणावर आण्विक शस्त्रात्रांचा साठा केला व त्यामुळे ह्या दोन महासत्तांमध्ये शीतयुध्द सुरु झाले आणि त्यामुळे जगभरात अनेक राष्ट्रांनी आपआपले उघड व गुप्त गट तयार केले. ह्या दोन महासत्तांच्या पाठोपाठ जगभरातील साम्राज्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा असणार्या चीनने ह्या आण्विक शस्त्रांत्रांच्या चढाओढीत हिरीरीने सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर आज तर चीनची ही आण्विक क्षमता अमेरीकेला भयकारक बनून राहिली आहे आणि रशियाला सुध्दा दखल घेण्यास भाग पाडीत आहे असे चित्र दिसत आहे.
रशियाने २०१३ साली हायपरसोनिक यंत्रणा तसेच क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर भर देण्यात येईल असे संकेत दिले होते आणि त्यानंतर २०१५साली रशियाने आपल्या ’हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’ ची पहिली यशस्वी चाचणी घेतली होती आणि त्यानंतर वर्षभरातच, २३ एप्रिल २०१६ रोजी रशियाने ध्वनीच्या ५ ते १० पट वेग असणार्या ’हायपरसोनिक’ यंत्रणेसह प्रगत क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केल्याच्या वृत्ताला रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था ’इंटरफॅक्स’ ने संमती दर्शविली. रशियाने विकसित केलेली ही हायपरसोनिक यंत्रणा लवकरच सध्या रशियात अस्तित्त्वात असलेल्या तसेच भविष्यातील दीर्घ पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांवर तैनात करण्यात येईल अशी माहितीही रशियाने दिली .
हायपरसोनिक यंत्रणा वापरताना प्रचंड प्रमाणात उष्णता व दाब निर्माण होतो , ज्यामुळे लक्ष्य करणे ही अत्यंत अवघड आणि कठीण बाब असते. जगात सध्या उपलब्ध असलेल्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा अशा प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम नाहीत. अमेरीकेने २०१४ साली हायपरसोनिक यंत्रणेचे परीक्षण केले होते ते अयशस्वी झाले होते. त्यामुळे सध्या परिस्थीतीत अमेरीका मात्र याबाबतीत पिछाडीवर पडला असल्यामुळे अमेरीकेच्या वरीष्ठ संसद सदस्य माईक रॉजर्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रशियाची ही चाचणी अमेरीकेसमोर नवे आव्हान असल्याची चिंता अमेरीकी अधिकार्यांनी व्यक्त केली आहे ही महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नसल्याचे लक्षात येते.
रशियन संरक्षणदलाच्या ’ स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’ ने कझाकस्तान सीमेजवळील ओरेनबर्ग प्रांतातून ’आरएस १८ए’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करताना ’हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’ (Hypersonic Glide Vehicle) वापर केला होता. कमीत कमी ४ ते जास्तीत जास्त ८ हजार मैल प्रति तास वेग असणारे हे हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल अणवस्त्रे तसेच पारंपारीक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
गायडेड मिसाईल्स म्हणजे संगणक नियंत्रित क्षेपणास्त्र ! आक्रमण करून येणार्या ( शत्रूदेशाच्या ) विमानांच्या ताफ्यावर बचाव करणारं सैन्यदल, ही क्षेपणास्त्र सोडतं. मग त्या विमानांनी क्षेपणास्त्रांना चुकविण्याचा किंवा चकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी उपयोग नसतो. ते क्षेपणास्त्र आपल्या संगणकाने ठरवून दिलेल्या लक्ष्यावर जाऊन धडकल्याशिवाय थांबतच नाही.
ध्वनीचा वेग हा सर्वात अधिक आहे असे आपल्याला वाटते. पण आता ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असणारी ही मिसाईल असतात.
कोणत्याही गोष्टीचा वेग मोजण्यासाठी त्या गोष्टीचा वेग हा ध्वनीच्या किती पट आहे हे सापेक्षतेने मोजले जाते त्या एककाला "मॅक" असे म्हणतात .
MACH NUMBER is defined as a speed ratio, referenced to the speed of sound, i.e
MACH NUMBER = Velocity of Object / Velocity of Sound (at the given atmospheric conditions)
थोडक्यात एखाद्या वस्तूचा एखाद्या वातावरणातला वेग आणि ध्वनीचा वेग ह्यांचा रेशिओ म्हणजे त्या वस्तूचा मॅक नंबर.
सुपरसोनिक वेग हा १.२ ते ५ मॅक असतो तर हायपर सोनिक वेग हा ५ ते १० मॅक नंबर एवढा असतो.
हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ५ ते १० मॅक ह्या वेगाने म्हणजेच अंदाजे ३८३६ मैल ते ७६७३ मैल प्रति ताशी ह्या वेगाने प्रवास करू शकतात.
आता आपण वेगवेगळ्या देशांनी विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांविषयी थोडक्यात जाणून घेऊ या -
अमेरीकेकडे आणि ब्रिटनकडे "टॉम हॉक" पध्द्तीची सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जलद क्षेपणास्त्रे आहेत. भारताचा कटटर हाडवैरी असणारा आणि सदैव शत्रू असणार्या पाकितानने ’बाबर ’ मध्यम पल्ल्याची आणि मध्यम क्षमतेची क्रूज क्षेपणास्त्रे तयार केली आहेत जी "टॉम हॉक" पध्द्तीच्या क्षेपणास्त्रांची कमी दर्जाची व छोटी प्रतिकृती मानली जाते.
आपल्या भारताने विधायक कार्यासाठी अणुतंत्र विकसित करत असतानाच स्वसंरक्षणाची सर्व काळजी घेतलेली आहे. "ब्रम्होस" ही सुपरसोनिक पध्द्तीची क्षेपणास्त्रे रशियाच्या सहकार्याने आपण विकसित केली आहेत.
भारताच्या "मिसाईल मॅन " म्हणून गौरविल्या जाणार्या डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांचा हायपर सोनिक मिसाईल बाबतचा दृष्टीकोन:
८ नोव्हेंबर २०११ ला इंडो-रशियन जॉईंट व्हेंचरच्या अधिपत्याखाली ब्रम्होस ऍरोस्पेस ह्या कंपनीचे इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स येथे उद्घाटन करताना डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी एक आगळाच दृष्टीकोन भारतीय शास्त्रज्ञांसमोर मांडला होता - आज मॅक २ च्या वेगाचे मिसाईल बनवायला सुमारे २०० करोड एवढा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारच्या मिसाईलची पुन्हा पुन्हा निर्मीती करून अधिक पैसा खर्च करता कामा नये. ह्या सेंटरने ८ ते १० मॅकचे re-usable (पुनर्वापर करू शकणारे ) मिसाईल २०२० पर्यंत निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
ह्यावरून डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी हायपरसोनिक मिसाईल निर्मीती साठी स्विकृती दिली असली तरी त्याचा वापर विधायक कार्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी व्हावा यावर किती भर दिला होता हेच सिध्द होते.
भविष्यात भारत ब्रम्होस-२ ह्या हायपरसोनिक मिसाईलची निर्मीती करण्याच्या वाटेवर प्रगती करीत आहे ज्याचा वेग ७ मॅक असेल आणि ६००० किलोमीटर प्रती-तास वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा ते भेद घेऊ शकेल. परंतु ह्यापेक्षा जास्त दूरच्या अंतराची मारक क्षमता असलेल्या मिसाईलच्या निर्मीतीमध्ये भारताला रशियाचे सहकार्य लाभू शकत नाही . रशियाने Missile Technology Control Regime(एमटीसीआर) करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ३०० किमी पेक्षा अधिक मारक क्षमता असलेल्या मिसाईलच्या विकासासाठी रशिया दुसर्या देशांना मदत करू शकत नाही.
थोडक्यात ब्रम्होस -२ ची निर्मीती ही भारताची स्वदेशी निर्मीती असेल असे दिसते.
भारताच्या "मिसाईल मॅन " म्हणून गौरविल्या जाणार्या डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांचा हायपर सोनिक मिसाईल बाबतचा दृष्टीकोन:
८ नोव्हेंबर २०११ ला इंडो-रशियन जॉईंट व्हेंचरच्या अधिपत्याखाली ब्रम्होस ऍरोस्पेस ह्या कंपनीचे इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स येथे उद्घाटन करताना डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी एक आगळाच दृष्टीकोन भारतीय शास्त्रज्ञांसमोर मांडला होता - आज मॅक २ च्या वेगाचे मिसाईल बनवायला सुमारे २०० करोड एवढा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारच्या मिसाईलची पुन्हा पुन्हा निर्मीती करून अधिक पैसा खर्च करता कामा नये. ह्या सेंटरने ८ ते १० मॅकचे re-usable (पुनर्वापर करू शकणारे ) मिसाईल २०२० पर्यंत निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
ह्यावरून डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी हायपरसोनिक मिसाईल निर्मीती साठी स्विकृती दिली असली तरी त्याचा वापर विधायक कार्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी व्हावा यावर किती भर दिला होता हेच सिध्द होते.
थोडक्यात ब्रम्होस -२ ची निर्मीती ही भारताची स्वदेशी निर्मीती असेल असे दिसते.
चीनने ’डीएफ- झेडएफ’ ह्या त्यांच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रासंबंधी कमालीची गुप्तता पाळली होती. तरी देखिल वॉशिंगटन येथील ’फ्री बिकॉन’ ह्यांना त्याचा सुगावा लागलाच होता. पॅंटेगॉनने ' WU-14' सांकेतिक नाव चीनच्या ह्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राला दिले होते , जे आज ’डीएफ- झेडएफ’ ह्या नावाने ओळखले जाते. नोव्हेंबर २३,ऑगस्ट १९,जून ७,२०१५ आणि जानेवारी ९,ऑगस्ट ७, व डिसेंबर २, २०१४ रोजी सहा वेळा चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या पार पाडल्या होत्या आणि आता एप्रिल २०१६ मध्ये पुन्हा एकदा सातवी चाचणी चीनने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
ह्यावरून ’हायपरसोनिक क्षेपणास्त्र " यंत्रणांचा आधुनिक युध्दातील वाढता प्रभाव ध्यानात येतो.
संदर्भ -
१. तिसरे महायुध्द - डॉक्टर अनिरुध्द धैर्यधर जोशी
२. दैनिक प्रत्यक्ष
३.http://www.popularmechanics.com/military/research/a20604/china-successfully-tests-hypersonic-weapon-system/
४.https://www.quora.com/What-is-the-difference-between-hypersonic-supersonic-and-cruise-missiles
५. http://freebeacon.com/national-security/russia-tests-hypersonic-glide-vehicle/
६.http://www.realcleardefense.com/2016/04/23/russia_tests_hypersonic_glide_vehicle_on_icbm_281305.html
संदर्भ -
१. तिसरे महायुध्द - डॉक्टर अनिरुध्द धैर्यधर जोशी
२. दैनिक प्रत्यक्ष
३.http://www.popularmechanics.com/military/research/a20604/china-successfully-tests-hypersonic-weapon-system/
४.https://www.quora.com/What-is-the-difference-between-hypersonic-supersonic-and-cruise-missiles
५. http://freebeacon.com/national-security/russia-tests-hypersonic-glide-vehicle/
६.http://www.realcleardefense.com/2016/04/23/russia_tests_hypersonic_glide_vehicle_on_icbm_281305.html