Monday, 29 December 2014

माझ्याबद्दल


लहानपणापासून माझ्या आजीने मला नानाविध गोष्टी सांगून देवाची गोडी लावली. माझी आई शिवभक्त होती आणि वडीलही देवपूजा आणि जमेल तशी भक्ती करीत होते. पण सर्वात अधिक प्रभाव होता तो आजीचाच !!! तिने सांगितलेल्या गोष्टींमुळे देव, सदगुरु ह्यांची आवड निर्माण झाली होती. आरूणीची आणि एकलव्याची गोष्ट आणि संकटाशी शेवट्च्या क्षणापर्यंत झगडणार्‍या संत कान्होपात्रेची गोष्ट मला खूप आवडायची. त्याची अधिक घट्ट रोवणी झाली ती साईबाबांमुळे. "श्रीसाईसच्चरित" ह्या ग्रंथाने मला सदगुरुतत्त्वाची खर्‍या अर्थाने ओढ लावली. 


आमच्या घरी माझी लहान बहीण सौ. संध्यावीरा इधाते ही साईबाबांची भक्ती करायची, त्यामुळे मला साईबाबांचे चरित्र वाचण्याची आवड लागली,त्याबद्दल मी तिची अत्यंत ऋणी आहे. पुढे सदगुरु डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांनी मला आपल्या छत्रछायेखाली चिडीच्या पोरासम खेचून घेतले आणि मी माझ्या बापूंची वीरा झाले. जीवनाला एक नवीन दिशा गवसली , सकारात्मक दृष्टीकोनाने बापूंनी पदोपदी  नित्यनूतन वाटावे  अशा आगळ्या वेगळ्या सदगुरुंच्या गोड गुरुशाळेत प्रवेश दिला जेथे श्रीसाईसच्चरिताची पंचशील परीक्षा होती आणि साईनाथांच्या कथा वाचणे हा तर माझा अत्यंत आवडता छंदच होता आणि आजही आहे. वाचन, लिखाण हे माझे आवडते छंद आहेत.

माझे शिक्षण हे प्रार्थना समाज, विलेपार्ले, मुंबई येथील शाळेत झाले आणि पुढे इंजिनीयरींग Digital Electronics ह्या विषयात झाले आणि  Oil & Natural Gas Coprporation Ltd ह्या कंपनीत सध्या मी Supt. Engg.(E&T) ह्या पदावर आसाम येथे कार्यरत आहे.                
माझ्या बापूंनी दाविलेल्या "सत्य-प्रेम-आनंद" आणि "पावित्र्य हेच प्रमाण" ह्या मानवी जीवन मूल्यांना अनुसरून भक्ती आणि मर्यादा हे आधारस्तंभ असणार्‍या देवयान पंथावर चालण्याचा मी प्रयास करत असते. अन्नाचा दाणा घेऊन अथकचालत राहण्याचे प्रयास करणार्‍या पिप्पलिका म्हणजेच मुंगीच्या सारखे संकटांनी न डगमगता, धैर्याने मार्गक्रमणा करीत माझ्या सदगुरु बापूंची वीरा म्हणूनच जगण्याचा आणि त्यांच्या चरणी हे त्यांनीच उमलविलेले जीवन-पुष्प समिधा म्हणून वाहण्याचे एकमेव ध्येय आहे....
सुकले जरी रोप माझे समीधाच व्हाव्या रे
तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठी तूच रे.....

फक्त बापूंचीच वीरा
अंबज्ञ सुनीतावीरा करंडे.

6 comments:

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog