Thursday 1 January 2015

आपत्ती व्यवस्थापन



आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच Disaster Management . हा एक अत्यंत मोठा आणि व्यापक विषय आहे. ह्या विषयावर इंटरनेटवर शोधायला गेल्यास असंख्य पुस्तके, लेख आणि websites मिळतील. ह्या सगळ्याचा इत्भूंत आढावा घेणे तसे अशक्य आहे. तरी देखील आपण व्यवहारात आवश्यक जुजबी माहिती मिळवण्याचा प्रयास नक्कीच करु शकतो जेणे करून आपत्ती सारख्या बिकट परिस्थितीत आपण मार्ग काढून आपले प्राण वाचविण्याचे प्रयत्न नक्की करू शकतो. 


तहान लागल्यावर विहीर खणायला गेले तर काय होईल हे आपण सारे जाणतोच. मग तहान लागण्याआधी जशी पाण्याची सोय करणे श्रेयस्कर असते तसेच आपत्ती आल्यावर जीव वाचविण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा , उपाय शोधण्यापेक्षा संकट निवारणाची उपाय योजना आधी पासूनच आखणे आणि त्याची पूर्वतयारी करून ठेवणे कधीही उचितच असेल, नाही का बरे ?     

चला तर मग आपती व्यवस्थापन म्हणजे काय असते ह्याची माहिती घेऊ या- 
Prevention is betther than cure ही गोष्ट आपणा सर्वांनाच मान्य आहे. कोणताही अपघात घडण्याआधी तो घडू नये म्हणून घेतली गेलेली खबरदारी, सावधानता ही कधी ही हितावहच असते. जसे अपघात म्हणता क्षणी नजरेपुढे प्रथम लक्षात येते तो प्रथमोपचार.आपण सर्वजण प्रथमोपचार म्हणजे First-Aid ह्या बाबत जाणतोच की अपघात वा दुर्घटना प्रसंगी वैद्यकीय मदत मिळण्याआधी त्या जखमेचे संभाव्य परिणाम वा त्यापासून उद्भवणारे धोके कमी करण्यासाठी केले जाणारे सोपे उपाय. जसे भाजल्यावर जखम झालेला शरीराचा अवयव वेदना शमविण्यासाठी थंड पाण्याखाली धरणे वा रक्त प्रवाह थांबविण्यासाठी हळद वापरणे इत्यादी... अगदी तसेच थोडक्यात सांगायचे तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपतींपासून उद्भवणारे जीवित हानी, वित्त हानी, सामाजिक हानी अशा सर्वच पातळींवरील दुष्परिणाम अभ्यासून शक्य तेवढ्या प्रमाणात होणारी हानी कमी करण्यासाठी योजले जाणारे विवीध उपाय आणि उपाय योजना .

आपल्या भारतात तसे पाहिले तर एकाच वेळेस दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी,चक्रीवादळ, आगी, जातीय दंगे, दहशतवाद अशा विवीध प्रकारच्या आपती आढळतात. 
साधारणपणे आपत्तींचे
असे वर्गीकरण केले जाते. 

आपला भारत देश हा नैसर्गिक आपत्ती येणारा जगातील सर्वात मोठा देश समजला जातो. अंदाजे भारतात दरवर्षी ५० % भागात भूकंप , ३०% भागात दुष्काळ, १० % भागात पूर येत असतो. तसेच विवीध प्रकारच्या जातीय दंगली, दहशतवाद , आगी ह्या सुध्दा वारंवार घडताना दिसतात.

कोणत्याही प्रकारच्या आपत्ती आल्या की आज आपण सगळे शासनाला दोष देण्यात धन्यता मानतो. परंतु आपण जर एक समजंस नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून वागायला लागलो तर खूप प्रमाणात गोष्टी बदलू शकतील. ह्याच सुजाण नागरिकाच्या भूमिकेतून माझे  सदगुरु डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांनी " एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" ह्या तत्त्वाला आणि "केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे " ह्या संत समर्थ रामदासस्वामींच्या शिकवणीला अनुसरून मार्च २००२ साली "Aniruddha'S Academy of Disaster Management" संस्थेची स्थापना केली. 

येथे आपती व्यवस्थापनेचे एक आठवडा कालावधी असणारे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसहीत विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. अधिक माहितीसाठी आपण http://www.aniruddhasadm.com/ ह्या सांकेतिक स्थळावर भेट देऊ शकता वा कार्यालयात थेट संपर्क साधू शकता. 

श्रीराम. अंबज्ञ 
सुनीतावीरा करंडे

5 comments:

  1. आपत्ती व्यवस्थापन हा विषय अत्यत व्यापक असुन तो काळाची गरज आहे व हि संधि आपल्याला आपल्या बापुने दिली अंबज्ञ बापु

    ReplyDelete
  2. छान लिहिलय. अंबज्ञ

    ReplyDelete
  3. हरी ओम सुनितावीरा , तुम्ही तुमचा ब्लॉग चालू केल्याबद्दल अभिनंदन. आम्हाला खात्री आहे कि खूप चांगले वाचनीय आणि संकलित माहिती तुमच्या ब्लॉगवर मिळू शकेल.



    ब्लॉगची सुरुवातच 'आपत्ती व्यवस्थापन' ह्या सद्यकालीन अत्यावश्यक विषयाबद्दल लिहिलेत त्याबद्दल अम्बज्ञ.



    तुमच्या ब्लॉगच्या वाटचालीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  4. सुनीताविरा नुकताच आपला आपत्ती निवारणावरचा लेख वाचला. भविष्यात काय वाढून ठेवललय आणी त्यातुन सुरक्षीतपणे स्वताचे, परिवाराचे व थोडक्यात गरजवंताचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प.पू सदगुरु डॉ. अनिरुद्ध जोशी यानी मार्गदर्शन केलले आहे. त्यात आपत्तीनिवारण प्रशिक्षण घेउन काळानुसार व परिस्थीतीनुसार स्वताला तयार ठेवणे ही निकडीची गरज आहे व यासाठी प्रत्येकाने जागरुक राहणे हिताचे आहे. सुनीताविरा थोडक्यात आवश्यक व महत्वाची माहीती उपलब्ध करुन दिल्याबद्दल अंबज्ञ.

    संजयसिंह वायंगणकर

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog