Friday 29 May 2015

उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती - २९ मे २०१५

उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती -  २९ मे २०१५



रोजच्या मृतांच्या वाढत जाणार्‍या आकडेवारीने वृत्तपत्रातील ह्या बातमीने अधिकच लक्ष वेधून घेतले.  
यंदाचा उन्हाळा जीवघेणा ठरला असून देशात उष्म्याच्या लाटेने आतापर्यंत १७०० वर लोकांचा बळी घेतला आहे. सध्या हैदराबाद - तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील उष्णतेची लहर काही कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात उकाड्याने मृत्यू झाल्याची नोंदीत दिवसागणिक अधिकच वाढ होत चालल्याचे आढळून येते आहे. कालच्या गुरुवारपासून ( २८ मे २०१५) फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताने ४१४ वर जणांचा बळी घेतला आहे.

जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची ही लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात अनेक राज्यांत पारा ४७ अंशावर असून अनेक राज्यांत सरासरी तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिएसपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकार उष्णतेच्या लाटेने तत्पर झाले असून डॉक्टरांच्या सुट्‌या रद्द केल्या आहेत.

आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यात उष्णतेच्या बळींची संख्या सर्वाधिक आहेत. या राज्यात तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. दोन्ही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणखी किमान दोन दिवस कायम राहील असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ईशान्य भारतातून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीचे तापमानही भारतात वाढू लागले आहे. सरकारने सर्व राज्यांना दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयांमध्ये अतिरिक्त वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.


यावर्षीचा उन्हाळा अधिक भयानक होत चालला आहे. २०१० च्या मानाने यावर्षी उष्णतेची लाट कमी दिवसांची आहे. मात्र तरीही त्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. फेब्रुवारी, मार्चनंतर तापमानात अचानक वाढ होत आहे, असे निरीक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी व्यक्त केले आहे. शहरांमध्ये झाडांची संख्या घटल्याने तापमान प्रचंड वाढत आहे. तसेच वाढत्या तापमानाबरोबरच अतिनील किरणांचाही मोठा त्रास भोगावा लागत आहे. या किरणांचे प्रमाण सध्या प्रमाणापेक्षा अधिक आढळले आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रापिकल मेटिरॉलॉजी ( Indian Institute of Tropical Meterology) या संस्थेने दोन आठवडयापूर्वी दिल्लीत अतिनील किरणांचे मोजमाप करण्यासाठी यंत्रणा बसवली आहे. यात अतिनील किरणांचे प्रमाण ६ते९ च्या दरम्यान आढळले. हे प्रमाण अतिशय घातक आहे.

आता पर्यंत उष्णतेच्या लाटेने ओडिशात - ६६, झारखंड - २२, पं. बंगाल - १४ तर राजस्थान ०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम गरिब निवाराहीन लोक, बांधकाम मजूर, रिक्षा ओढणारे, फेरीवाले यांच्यावर होत आहे असे निरीक्षणाअंती आढळल्याचे सूत्र सांगत आहेत. 


ह्या बातम्या वाचून मन सुन्न होते, आणी बुध्दी कुंठीत होते की उन्हामुळे माणसाचा चक्क मृत्यु कसा काय ओढावू शकतो?

चला  तर जाणून घेऊ या ढोबळ मानाने लक्षात घेण्याजोग्या काही महत्त्वाच्या अशा गोष्टी-     

उन्हाळ्यात बाहेरील दिवसाचे तापमान ४२ सेल्सियस पेक्षा जास्त असते. बहुधा उन्हामध्ये शरीरातील घाम निर्माण करणारे केंद्र (हायपोथॅलेमस यंत्रणा ) बाहेरच्या हवेतील (वातावरणातील) तापमान कितीही असले तरी माणसाच्या शरीराचे तापमान ३७.७ सेल्सियस एवढे कायम ठेवते.




जेव्हा प्रखर उन्हात जास्त वेळ फिरले किंवा तापमानात जास्त फरक असलेल्या जागी जास्त वेळ राहिले तर शरीराचे तापमान नियंत्रीत करणारी ही हायपोथॅलेमस यंत्रणा कोलमडून पडते आणि अचानक शरीराचे तापमान वाढते आणि त्यावर नियंत्रण न आल्यास मृत्यु येतो. यालाच इंग्लिशमध्ये "सनस्ट्रोक " किंवा हिंदीत "लू लगना" असे म्हणतात. मराठीत ह्याला उष्माघात म्हणतात किंवा सूर्यघात असेही म्हणतात. गावाकडे काही ठिकाणी ह्याला उन्हाळी लागणे असे म्हटले जाते. 

उष्माघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणार्‍या उष्णतेहून शरीरात शोषलेली उष्णता अधिक असते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. अशा वेळी उष्माघात झालेल्या रुग्णास तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर मृत्यु ओढावतो.

उष्माघात आणि ताप येऊन शरीराचे तापमान वाढणे ह्यात फरक आहे, ह्या दोन्ही खूपच वेगळ्या गोष्टी आहेत. ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान नेहमीपेक्षा (३७.७ से.) अधिक राहते, पण उष्माघातात शरीराचे तापमान ३८.१ से. पेक्षा अधिक किंवा त्याहून जास्त होते, जे माणसास जीवघेणे ठरू शकते. शरीराचे तापमान जेव्हा ४२ से. पर्यंत पोहचते, तेव्हा रक्त तापू लागते, स्नायू कडक होऊ लागतात व श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू निकामी होऊ शकतात, रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होऊ लागते , रक्तदाब (blood pressure) कमी होऊ लागतो, विशेषत: मेंदूला रक्त पुरवठा थांबला तर माणूस कोमातही जाऊ शकतो आणि त्याचे एक एक अवयव निकामी पडून मृत्यु होऊ शकतो. 

हे सर्व काही प्रमुख लक्षणांमध्ये जाणवते -
उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून  येणारे लक्षण  -  त्वचेलगतच्या रक्तवाहिन्यांमधून उष्णता बाहेर पडल्यामुळे त्वचेचा रंग लालबुंद होतो. त्वचा काळपट असेल तर नखे, ओठ ह्यांचा नेहमीचा रंग बदलेला समजते. ओठ सुजतात. घाम येण्याचे बंद झाल्याने त्वचा कोरडी पडते. 
काही इतर लक्षणे - शरीरातील पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले तर मळमळ, उलट्या, रकक्तदाब कमी होणे , दोकेदुखी , परिंणामी बेशुध्दी. अशा व्यक्तीस उभे करण्याचा प्रयत्न केला तर ती पटकन खाली पडते.

उष्माघातावरील उपचार म्हणजे शरीराचे तापमान कमी करणे- स्वत:च्या संरक्षणासाठी सावलीत बसणे, पुरेसे पाणी पिणे , थंड सावलीच्या ठिकाणी बसणे , अंगावरील घट्ट कपडे त्वरीत बदलने आणि सैलसर कपडे घालणे, डोके , मान आणि शरीर थंड पाण्याच्या पट्यांनी पुसून घेणे, पंखा, एअर-कूलर चालू करणे किंवा वातानुकूलीत यंत्रणा ( Air-Conditioner) चालू करणे. 

उष्माघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी- 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्यतो उन्हाच्या वेळीस (साधारणपणे दुपारी १२ .०० ते ४.०० वाजेपर्यंत ) बाहेर न पडणे, उन्हातील कामे टाळावे आणि सावलीत राहावे.   

                 
कामासाठी घराबाहेर पडायचे असल्यास अंगभर शक्यतो पांढरी सुती कपडे घालणे, सोबत मोठा पांढरा मान आणि डोके झाकेल असा रुमाल किंवा पंचा ठेवणे, कमीत कमी वेळात इच्छीत स्थळी पोहचणे, जवळ पिण्याच्या पाण्याची बाटली बाळगणे , दर अर्ध्या तासाने अक ग्लास पाणी पिणे, अधून मधून लिंबू पाणी बर्फ न टाकलेले पिणे. पंखे , कूलर पेक्षा सुध्दा अशा वेळी थंड पाण्याची चादर पटकन थंडावा देऊन तापमान कमी करते. लवकरात लवकर शरीरातील जादा उष्णता काढून टाकणे आणि रक्ताभिसरण खेळते ठेवणे हेच महत्त्वाचे प्रथमोपचार आहेत. 
लवकरात लवकर रुग्णास रुग्णालयात ( Hospital) नेऊन वैद्यकीय मदतीने औषधोपचार चालू करावेत.  

मेपल क्रोफ्ट ह्या कंपनीच्या अभ्यास अहवालाचा संदर्भ आपण पाहू शकता 

  

मराठीत एक म्हण वापरतात की "तहान लागल्यावर विहीर खणू नये"   
सर्वसाधारणपणे उष्माघात हा नैसर्गिक वा मानवी आपत्तीचा प्रकार म्हणून गणला जात नाही , पण कोणत्याही आपतीला योग्य माहितीच्या आधारे तोंड देणे अधिक सोपे जाते , त्यासाठी हा छोटासा प्रयत्न....       

1 comment:

  1. Hello, Suneeta Karande,

    Thanks for such nice and timely article on this current and very ‘hot’ issue of heat wave. Do & Don’t given by you are very much welcome.

    It is understood that such high temperatures occur elsewhere in the world and are survivable, but it’s the level of humidity which causes heat stress. These two together i.e. temperature and humidity, create a dangerous heat stress environment. As per the IMD, this type of heat wave would continue till the onset of monsoon over the southern coast.

    The most touching and disturbing fact pointed out by you is that many of the dead are reported to be poorer people, beggars and the homeless, as well as construction workers who are expected to work on building sites in direct sunlight. Poor men are caught in a very difficult situation….if they work in such scorching heat then it is a question of survival and if they do not work ….. then also it is a question of survival…. Who will feed them???

    In India, about one third of the country's 1.2 billion people have access to electricity, which means: millions are enduring the blistering heat without relief. Many people without ways to cool their homes are seeking shelter in shops and malls. However, poor persons cannot afford to waste their time to go and cool themselves just by roaming in the mall. But that’s how the reality is …probably, with no prospects early change.

    Hindustan Times has warned that some of the worst-affected states could be plunged into drought before the monsoon rains arrive.

    Probably, it’s a time to start thinking about do & don’t for oncoming drought!!!


    RAJEEV KADAM

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog