Sunday 26 April 2015

आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल !!!

संध्याकाळची वेळ होती. शाळेतून कंटाळून, दमून भागून आलेली बच्चे कंपनी खेळायला बिल्डींगच्या परिसरात जमू लागली. धावाधावी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ रंगू लागले आणि बघता बघता अख्खा परिसर त्यांच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.

काही लहान मुलांचे उडया मारायचे खेळ चालले होते. आजूबाजूला बसायला जे सुमारे २ - २ १/२ फूट उंचीचे बाकडे बनवले होते त्यावरून ६-७ वर्षाची ती लहानगी चिमुरडी बाळे उडया मारून आपण किती शूर आहोत हे दाखवून आपाआपसात गोंधळ घालत होती.

त्यातल्या काही मुलांचे बोलणे कानी पडले ए मी ना जिन्यावरून २ पायर्‍यांवरून उडी मारू शकतो.

दुसर्‍याने त्याला तोंड वेंगाडून दाखवत चिडवले हे त्यात काय एवढे मोठे सांगतोस तू. मी तर ना ३ पायरीवरून पण उडी मारतो.

प्रत्येक जण आपण किती उंचावरून उडी मारू शकतो हे अगदी तावातावाने रंगवून सांगत होता.

तेवढ्यात एक चिमुरडी म्हणाली त्यात काय ? तुम्ही कोणी गच्चीवरून खाली उडी माराल का?

आधी जरा सगळे घाबरले आणि गोंधळले.

तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला त्यात काय ते टी.व्ही.वर दाखवतात ना तसे पोटाला दोरी बांधून मारायची उडी.

एका भित्र्या मुलाने विचारले आपण पडून हात पाय मोडले तर? आई-बाबा किती मारतील, झोडूनच काढतील बघ...

त्या प्रश्न विचारणार्‍या चिमुरडीने सांगितले  फक्त उडी मारायच्या आधी suicide note लिहून ठेवायची ...

अग ते suicide note काय असते ? ह्या श्रावणीचे तर काही तरी नवीनच असते बाबा....

आता आश्चर्याने अवाक होऊन तोंड वासायची पाळी  माझी  होती . एव्हाना तेथे असलेल्या काही जणांची बाचाबाची सुरु  झाली... ह्या एवढ्या लहानशा चिमुरडीला कसे काय माहिती?

एक वयस्क बाई म्हणाल्या हे सारे त्या टी. व्ही. वरच्या नको नको त्या मालिका, सिरीयल्स पाहण्याचे परीणाम. किती वेळा सांगून आई - बापांना कळत नाही. लहान मुले जे बघतात ते करायला बघतात. त्यात चांगले काय , वाईट काय हे त्यांना कुठे कळते. म्हणून तर त्यांना वेळ द्यावा लागतो.
दुसरी कडाडली हल्लीच्या आई-बापांना वेळ असतो का मुलांना द्यायला. कामावरून आले तरी कोठे लक्ष असते घरात... लहान मुले एकतर बिचारी वाट पाहून पाहून दमतात आणि आई बाबा नाही लक्ष देत असे दिसले की मुकाट्याने टी.व्ही. म्हणा., Computer म्हणा नाहीतर ते मोबाईल , व्हिडीओ गेम्स घेऊन बसतात आणि शिकतात मग हे असले नको ते...


असाच एक अजून प्रसंग ... शाळेच्या एक टीचर बाई आज वर्गात मुलांना दिलेले निबंध तपासत होत्या आणि चक्क रडू लागल्या , बाजूलाच त्यांचा नवरा मोबाईल वर गुंग झाला होता. त्याचे बायकोकडे सहज लक्ष गेले आणि त्याने तिला विचारले की ए बाई तुला आता काय झाले?

तेव्हा त्या बाईने सांगितलेला किस्सा ही असेच काही सांगून जातो. ती म्हणाली आज वर्गात मुलांना मी मोठा होऊन काय बनावे वाटते ह्यावर निबंध लिहायला सांगितला. मुलांचे असे भयानक विचार वाचून डोळ्यांत पाणी आले. वेळ मारून नेण्यासाठी नवरोबाने बायकोचे सांत्वन केले अग असे आहे तरी काय त्यात ? एवढी का तू गंभीर झाली.
ती म्हणाली एका मुलाने चक्क लिहीले आहे मला मोठेपणी मोबाईल व्हावे वाटते. म्हणजे मी सर्वांचा लाडका, आवडता होईल. ऑफीस मधून आले तरी बाबा मला प्रेमाने जवळ घेतील, आई पण रागावणार नाही, तिच्या मैत्रीणींचे SMS पाहायला, chatting करायला मला जवळच ठेवेल...

आता जरा मोबाईल मधून डोके वर काढून त्या नवर्‍याने सांगितले की अग तू त्या मुलाच्या आई-बाबांना बोलावून समज दे आणि मुलाला जरा थोडा वेळ द्या म्हणून समजावून सांग. सगळे काही नीट होईल बघ.

तेव्हा तर ती जास्तच रडू लागली.. आता त्याने तिच्या जवळ जात विचारले अग किती सोपा उपाय आहे...

तेव्हा रडत रडत ती म्हणाली अहो तो मुलगा कोण आहे माहीत आहे का? आपलाच मुलगा हे लिहीतोय?
आता मात्र त्यातला ’बाबा’ जागा झाला होता... आपण आपल्याही नकळत किती चुका करतो हे त्याच्या ध्यानी आले होते...

नुकताच नेपाळ आणि उत्तर भारतात ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि क्षणार्धात हजारों लोकांची घरे उध्वस्त झाली. होत्याचे नव्हते झाले. टी.व्ही., वर्तमानपत्रे ह्यांतून डोळ्याला पाणी दाटेल अशी केविलवाणी बिकट चित्रे आपण पाहतो आहोत. त्यामुळे साहजिकच आपत्ती म्हटले की आपल्या डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते ते भूकंप, पूर, त्सुनामी , दुष्काळ , दरड कोसळणे आणि त्यातून आ वासून उभी राहिलेली प्रचंड जीवित हानी, वित्त हानी ह्यांचे भयानक चित्र.

पण आता वर नुकतेच वाचलेले हे बोलके प्रसंग काय सांगू पाहतात ? ह्याचा जरा नीट विचार करू या.

तसे बघायला गेले तर आपण सर्व कुटुंबीय एकाच घरात राहतो पण बहुतांशी खूप मोठ्या प्रमाणावर ह्या आपल्या वाटणार्‍या घरातला आपलेपणा हद्दपार झाला आहे जणू आणि ह्या आपत्तीला तोंड देण्यासाठी व्यवस्थापन करायला हवे ते संवादाचे..हरवत चाललेल्या नात्यांना जपण्यासाठी खरी सुसंवादाची गरज आहे.  मी माझे , माझे ह्यात खर्‍या माझेपणाचा अर्थच हरवला आहे कळत वा नकळत...

त्यामुळे रोजच्या व्यावहारिक , सांसारीक जीवनात आपल्या स्वत:च्या घरातील हरवलेली नाती, हरवलेला आनंद वा ह्यासारख्या इतरही लहान लहान दिसणार्‍या अशा अनेक छोटया-मोठया गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपणच आणखी मोठया संकटाला किंवा गंभीर प्रकारच्या प्रश्नांना आमंत्रणच देतो जणू काही, ह्याचे साधे भानही आपल्याला उरतच नाही. आणि मग त्यातूनच उद्भवतात आपले घर आपले न वाटणे, त्या घरात आपण फक्त लॉजिंग-बोर्डींग असलेल्या पाहुण्यासारखे राहणे म्हणजेच खर्‍या घराच्या आनंदाला हरवणे ह्या आपत्ती.

माझ्या वा आमच्या घराचा हरवलेला आनंद ह्या पेक्षा माणसाच्या स्वत:च्या जीवनात दुसरी कोणती दुर्दैवी गंभीर आपत्ती असू शकते असे मला तरी निदान वाटत नाही.

लहान मुलांचे वय खूप संस्कारक्षम असते. जणू ओल्या मातीचा गोळा... जसा आकार देऊ तसा .... पूर्वीच्या काळी एकत्र कुटूंब पध्दती होत्या, त्यामुळे घरात आजी-आजोबा, काका, आत्या, मामा , मावशी आणि भरपूर चिल्ली-पिली असायची आणि मुलांचा वेळ आरामात जायचा. कधी भावंडा बरोबर कधी आजोबा , कधी काका... आज काळा बरोबर चित्र पालटले आणि आम्ही दोघे आणि आमचे दोन वा एकच असा चौकोनी  वा त्रिकोणी कुटुंबाचा प्रघात पडला. त्यामुळे लहान मुले खूप एकटी पडतात. त्यांना आपण योग्य तो वेळ दिला नाही तर ते एकतर एकलकोंडे बनतात, स्वत:चे विश्व स्वत: शोधतात ...त्यात त्यांना चागले काय वाईट काय हे समजण्याचे वय नसते. जे दिसते त्याचे अनुकरण करायचे एवढेच माहित असते. त्यांना नाना प्रश्न पडतात हे कसे , ते कसे , असेच का आणि तसेच का ... ह्या प्रश्नांना त्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे द्यावी लागतात , त्यांचे कुतुहल , कोडी ह्यांना समजून घ्यावे लागते.





आज घड्याळाच्या काट्या सोबत आपण सारे धावत असतो पण ह्या आपल्याच लहान चिमण्या पाखरांना आपण वेळ देत नाही. Mobile, smart phone, tab , computer, laptop ह्यांच्या भुलभुलैयात आपण एवढे हरवून जातो की आपले खरे कर्तव्यच विसरतो. मुलांना आज आपण शाळेत वा क्लास मध्ये काय काय केले , कधी किती मजा केली तर कधी किती ओरडा खाल्ला टीचरचा, तर कधी काय गंमत झाली , काय फटफजिती झाली अशा अनेक गोष्टी आई बाबांशी बोलायच्या असतात. आपण जर त्यांना वेळ दिला नाही, त्यांचे म्हणणे एकून घेतले नाही, त्यांच्या प्रश्नांना , शंकाना समाधान करणारी उत्तरे दिली नाही, तर ती मुले अजाणते पणाने म्हणा तर कधी चुकीच्या मार्गाने , कळत वा नकळत जाऊन फसू शकतात . त्यात त्यांच्या स्वत:चे नुकसान होऊ शकते वा कधी कधी तरी वाईट संगतीने अख्खे आयुष्य सुध्दा वाया जाऊ शकते.

थोरा-मोठयांचे नेहमी कानी पडणारे बोल -  तोंडातून निघालेला शब्द , धनुष्यातून सुटलेला बाण आणि हातातून निघून गेलेला वेळ कधी परत मिळवता येत नाही. म्हणूनच आपण वेळीच  जागरूक होणे आणि सभान असणे, सजग असणे खूप मह्त्त्वाचे आहे. दिवसातला काही मोजका वेळ तरी आपण घरातील सर्व कुटूंबीयांनी हसत खेळत आनंदात घालवायला हवा. सकाळच्या वेळी शाळा, कॉलेज, ऑफीस ह्यामुळे बहुतेक सर्वच जण घराबाहेर पडतात आणि त्यामुळे दुपारचे जेवण हे वेगवेगळेच होते. परंतु रात्री सर्वांनी एकत्र बसून जेवले, त्या वेळेत टी.व्ही. न पाहता एकमेकांची गप्पा मारल्या तर आज हरवत चाललेला हा सुसंवाद , दुर्मिळ होणार नाही. रात्री मनोरंजनासाठी एखादी मालिका , टी.व्ही.पाहणे ह्यात काहीच चुकीचे नाही. पण घरात एक जण ह्या खोलीत तर एक जण दुसर्‍या खोलीत... असे चित्र असल्याने आपण आपल्याच माणसांपासून दुरावतो.
वैयक्तिक जीवनात ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण खरेच खूप मोठे संकट ओढावून घेत असतो असे मला वाटते.

इंग्लिश भाषेत एक खूप चांगली गोष्ट वाचनात आली - The family that prays together,stays together ..Servant of God म्हणून ओळखल्या जाणार्‍या Father Patrick Peyton ह्यांचे slogan. दुसर्‍या महायुध्दानंतर लॅटीन अमेरीका आणि फिलीपाईन्स मध्ये युध्दाची झळ लागून विभागलेल्या , विस्कळीत झालेल्या कुटूंबियांना एकत्र आणण्यासाठी वापरला गेलेला हा अत्यंत प्रभावी मंत्र... खरेच आजही तेवढाच महत्त्वाचा आहे असे जाणवते.


जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते नेहमी एकत्र राहते... पूर्वी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला आजी-आजोबा घरातील लहान -थोर मंडळी एकत्र येऊन "शुंभम करोती कल्याणं " अशी प्रार्थना करायचे. आज बदलत्या काळा नुसार हे जरी शक्य नसले तरी किमान रात्री झोपण्याच्या आधी कमीत कमी १०-१५ मिनीटे सर्वांनी एकत्र बसून आपल्या आवडत्या देवाची प्रार्थना करायला काहीच हरकत नसावी. कोणताही मंत्र, गजर, स्तोत्र आपण घेऊ शकतो जो सर्वांना सोयीचा असेल. ह्यामुळे आपले आपल्या भगवंताशी नातेही चांगले अधिक घट्ट बांधले जाईल आणि "तो" परमात्माच आपल्या एकमेकांची नाती अधिक चांगल्या प्रकारे घट्ट बांधून देईल नक्कीच...

आयुष्यभर माणूस सुखासाठी वणवण करत फिरतो , सुखाचा सदरा असा शोधून सापडत नाही म्हणून दु:खी होतो पण संत रामदास ही सांगतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे"  मला तरी वाटते की सुख हे आयुष्याच्या अंतिम टोकाला कधीच नसते , तर ते असते तुमच्या वाटेवरच , सभान राहून मला ते माझ्या वाटेवरच आहे ह्यासाठी शोध घेणारी दृष्टी बाळगावी लागते .....मगच "तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी "अशी माझी परवड होत नाही...

"अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोक" ही संत ज्ञानेश्वरांची अमृत वाणी  सत्यात उतरल्याची साक्षात प्रचिती घेता येईल , ते केवळ एक स्वप्न उरणार नाही.

काय पटतयं ना मग आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - हेच आमच्या करीता आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल आहे..

चला तर मग आनंदाच्या मार्गावर चालताना "एकाकीपणा, एकटेपणा" ह्या विपत्तीला बारा वाटा दूर पळवू या.... सुखी , आनंदी जीवनाचे व्यवस्थापन करू या...

11 comments:

  1. Ambadnya Sunitaveera khupach apratim lekh.... Aplya bappane aplyala sanwadache mahhatva mhanunach patvun dile ahe... Ani ya varshiche aim he prem ani sanwad vadhvne hech sangitale ahe te tumhi khup sopya ritine mandale ahe.... Ambadnya

    ReplyDelete
  2. हरी ओम,

    'आनंदी कुटुंब' किंवा 'आनंदी कुटुंबीय' हि आता वस्तुस्थिती नसून संकल्पना वाटावी अशी सध्याची सामाजिक परिस्थिती आहे. सुखाच्या आणि आनंदाच्या मागे धावण्यात अख्खे आयुष्य जाते परंतु "ह्यासाठी शोध घेणारी दृष्टी" मात्र सापडत नाही आणि मग आयुष्याची परवडच होते.

    'घराचा हरवलेला आनंद ' हि कौटुंबिक आणि वय्यक्तिक जीवनातील आपत्ती आहे ह्या गोष्टीची जाणीवच कधी होत नाही.......तर मग व्यवस्थापन तर दूरच राहिले.

    एका अत्यंत संवेदनशील विषयावरचा हा लेख खरंच विचार करायला लावणारा आणि सुखी व आनंदी जीवनाचे व्यवस्थापन करायला प्रोत्साहन देणारा आहे.

    अम्बज्ञ

    ReplyDelete
    Replies
    1. समाजाभिमुख व सतर्क अशी पिढी जर तयार करायची असेल तर घरापासुनच सुरवात करणे आवश्यक आहे. आपल्याला बाह्य जगतात जो बदल अपेक्षित आहे तो मुळात स्वतःमधे घडवुन आणला पाहीजे. आजची नवी पिढी ही उपजतच हुशार आहे. तंत्रज्ञान त्यांना सहज उपलब्ध आहे व त्यामुळे कुठलीही गोष्ट त्यांच्यापासुन लपली जाउ शकत नाही. योग्य माहीतीद्वारे त्यांची जिज्ञासा आपण भागवु शकलो तर त्यांना जिवनाची योग्य दिशा लगेच मिळेल. शेवटी पालकांची कुंभाराची भूमिका बदलत नाहीच. सध्या कुटुंबांचा आक्रसलेला आकारही त्यातील सर्व घटकांना सुसंवादाच्या समान पातळीवर आणू शकत नाही यासाठीची पूर्व तयारी पालकत्वाच्या निर्णयापासुनच सुरु व्हायला हवी. चांगले संस्कार व आदर्श हा आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आद्य कर्तव्य आपण पार पाडले पाहीजे तरच पुढच्या पिढीकडुन अपेक्षा करण्याचा अधिकार आपल्याला राहील. सुनिताविरा फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर हे वाक्य समर्पक आहे. रात्री झोपण्यापूर्वी सर्व कुटुंबियांनी एकत्र हनुमान चालिसा व गुरुक्षेत्रमंत्र म्हणावा असे बापूंनी सांगीतले त्यामागे हीच भूमिका आहे.
      अंबज्ञ!

      Delete
  3. हरि ओम सुनितावीरा ,
    खुप सुंदर लिहील आहे तुम्ही … खरच ह्या Mobile ने वेड करून ठेवलाय सगळ्यांना . नवऱ्याला बायको साठी वेळ नाही आणि बायकोला नवऱ्यासाठी वेळ नाही अशीच चित्र दिसतात. एकाच घरात राहून सगळे नुसते Mobile ला चिकटलेले असतात.
    ह्या Mobile,Computer पासून थोडं लांब झालं तर खरा आनंद उपभोगता येतो हेच जणू विसरले आहेत सर्व.
    तुमचा हा विषय खरंच सर्वाना विचार करण्यास भाग पडणारा आहे.
    Ambadnya

    ReplyDelete
  4. हरि ॐ सुनितावीरा
    जे काही तुम्ही लिहिले आहे ते प्रत्येक घरात घडत आहे ।
    ही मोठी आपत्तीच् आहे ।
    आणि भक्ती हां रामबाण उपाय आहे हे देखील तेवढेच सत्य आहे ।
    जाणीव बोथट होत चाललेल्या असताना घरातील एकोपा वाढण्यासाठी प्रेरक असे लिखाण आहे हे ।
    श्री राम अम्बज्ञ सुनितावीरा ।
    जय जगदंब जय दुर्गे ।

    ReplyDelete
  5. श्री राम अम्बज्ञ. डॉ. दीप्ती गायकवाड, राजीव कदम, अजित मालफाटक, माधुरी येरुणकर , डॉ. निशीकांत विभूते आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आभारी आहे.

    ReplyDelete
  6. As a psychiatrist I am seeing a major change in behavior of children and their parents .
    A source of knowledge has changed now a days . Children learn many things that are age inappropriate from television and internet . Moreover famous newspapers are also focusing on negative , provocative , glamorous news . Most of the news suggest that our little one's and young generation is led in wrong direction .
    Bharat (India ) is well-known for its rich culture and sanskar It has been seen that new generation is getting interested in following easy gratification thinking pattern . Real value and the quality time spent by parents is reducing day by day . Blame it on revolution in gadgets or media , but the reality is our minds are getting distracted from real people to unrealistic relations and negligence of real values .
    Suneetaveera has taken great efforts in writing such an eye opening article .
    This should be read by most of Indian who love their children and want the family bonding intact .
    Hari Om Shree Ram Ambadnya
    Jay Jagdamb Jay Durge .

    ReplyDelete
  7. Hari om,Suneetaveera.
    Well written & rightly pointed that social media nowadays is drawing all our focus& diverting & engrossing our thoughts.thereby limiting our thought process in right direction.our good thoughts are the pillars of our good deeds which our children are observing and trying to imitate.but this is very simple if we do follow our Dads path,as its based on bhakti,love &sanskar.all the kids in our Pariwar are very energetic, sanskari and are in deep love of their beloved aajoba(Bapu).This is the very reason we as parents are relieved,as Bapu is there to take care.we just have to take care of his children as caretaker.I Love You My Dad.Ambadnya.

    ReplyDelete
  8. It is really a great pleasure to note that people have engaged themselves in healthy discussion on a very sensitive, social and close-to-heart topic

    I agree with the views expressed by Smriti Naik, that nowadays social media has been drawing all our focus & diverting our thoughts and also limiting our thought process.

    Further, it is worth to read the comments of Dr Vibhute, especially considering his specialised field of Psychiatry:
    “but the reality is our minds are getting distracted from real people to unrealistic relations and negligence of real values”

    What I understand from this discussion that as parents, we should be very alert about the time we spent on gadgets and social media. We ourselves are responsible for creating and maintaining happiness in our homes. Along our abstinence from use of social media, it would be equally important to keep check on the our children so as to ensure that they do not develop a habit of living in virtual world, due to excessive use internet.

    It is seems to be very imperative in the present days of technology that parents should be aware of the ill effects of excessive use of internet or internet addiction. Such awareness shall not only help their own family but also help in spreading this awareness across the society.

    It would be desirable that Mrs. Suneeta Karande extends this topic further to enlighten all parents on the growing trend and ill-effects of internet addiction among children.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog