Saturday 26 September 2015

टेलिपोर्टेशन - दूरप्रागट्य - अदृश्‍य करण्याचे तंत्र !!!

१८ सप्टेबर २०१५ ला सकाळ ह्या वृत्तपत्रात " वैज्ञानिकांना गवसले अदृश्‍य करण्याचे तंत्र! " ह्या मथळ्याखाली टेलिपोर्टेशन संबंधी एक बातमी नुकतीच वाचनात आली होती. त्यात असे सांगितले होते की -
  
वॉशिंटन डी सी - आतापर्यंत आपण केवळ कल्पनाविश्‍वात, जादूच्या प्रयोगांमध्ये किंवा हॅरी पॉटरसारख्या चित्रपटात पाहिलेली अदृश्‍य होण्याची कला आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात साकारणार असल्याचे कळले. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अतिशय पातळ त्वचेसारखा अंगरखा तयार केला असून तो माणसाने अंगात घातल्यास क्षणार्धात अदृश्‍य होता येणार असल्याचा दावाही केला आहे. 

अमेरिकेतील बर्कले लॅब आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी सोन्याच्या वीटेच्या आकाराच्या अतिशय सूक्ष्म भागापासून अदृश्‍य करणारा अंगरखा तयार केला आहे. या अंगरख्याची जाडी केवळ 80 नॅनोमीटर आहे. या अंगरख्याच्याभोवती त्रिमितीय (थ्रीडी) पद्धतीने काही जीवनशास्त्रीय पेशी चढउतारांसह गुंडाळण्यात आल्या आहेत. हा अंगरखा परिधान करणाऱ्या व्यक्तीशी एकरूप होऊन प्रकाशातही संबंधित व्यक्तीला अदृश्‍य करतो. "कोणताही विशिष्ट आकार नसणारा तसेच प्रकाशातही न दिसणारा हा थ्रीडी अंगरखा प्रथमच निर्माण करण्यात आला आहे' अशी माहिती बर्कले लॅबच्या मटेरियल सायन्स विभागाचे संचालक माहिती झियांग झांग यांनी दिली आहे. असे वाचनात आले होते. 

त्यापाठोपाठ लगेच २३ सप्टेंबर २०१५ ला Washington Post ह्या वृत्तपत्रात Scientists just smashed the distance record for quantum teleportation ही बातमी वाचनात आली. 

Washington Post च्या बातमीनुसार National Institute of Standards and Technology (NIST) च्या भौतिकशास्त्रज्ञांनी माहिती पाठवताना एक फॉटॉन (PHOTON) द्वारे दुसर्‍या फॉटॉन मध्ये ६० मैलांच्या अंतरावर फायबर ऑप्टीक केबलच्याद्वारे यशस्वीरीत्या पाठवले असल्याचा दावा केला आहे, जे पूर्वीच्या पेक्षा ४ पट अधिक अंतर आहे. 

अधिक माहितीसाठी आपण खालील link वर भेट देऊन माहिती वाचू शकता.

https://www.washingtonpost.com/news/speaking-of-science/wp/2015/09/23/scientists-just-smashed-the-distance-record-for-quantum-teleportation/?wpmm=1&wpisrc=nl_most

लागोपाठच्या ह्या दोन्ही बातम्यांमुळे साहजिकच टेलिपोर्टेशन म्हणजे नक्की काय असते ह्या विषयी अपार कौतुक मनी दाटले आणि खरेच माणूस असा विज्ञान- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अदृश्य होऊ शकतो , किंवा माणूस एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी असा अदृश्य होऊन प्रगटू शकतो का खरेच ? हे जाणण्याची जिज्ञासा मनात दाटली आणि संगणकावरच्या आंतरजाल(Internet) ह्या महान माहिती स्त्रोताचा वापर करण्याचे ठरविले आणि त्यातून हाती लागलेले हे ज्ञान !!!!

अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन संस्थांनी येत्या १५० वर्षांतील म्हणजे भविष्यकाळातील इंटरनेट कसे असेल याचा अंदाज घेणारे अहवाल तयार केले होते असे वाचनात आले. ह्या अहवालाची माहिती देताना मांडलेल्या लेखात २०१५ ते २०२४ ह्या दहा वर्षांचा काळ कसा असेल ह्यावर भाष्य केले आहे. त्यात २०१५ ते २०२० चा वेध घेताना एलॉन विद्यापीठ आणि प्युइंटरनेटचा अहवाल म्हणतो की नारदमुनींसारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे क्षणार्धात प्रकट होणे माणसाला शक्य नाही हे लहान मुलालाही कळते. मात्र ह्या अशक्यप्राय चमत्काराला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया इसवी सन २०१५ मध्ये सुरू झालेली असेल, ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत याला 'टेलिपोर्टेशन' असे म्हणतात. 

टेलिपोर्टेशन म्हणजे आपण समजायला सोपे म्हणून त्याला दूरप्रागट्य असेही मराठीत म्हणू शकतो. आता टेलिपोर्टेशन म्हणजे काय? हा पहिला प्रश्न साहजिकच मनात उद्भवतो. आपण लहानपणी गोष्टींच्या पुस्तकातून वाचले आहे किंवा टी.व्ही. मालिकेत पाहिले आहे की काही पौराणिक कथांमध्ये देवर्षि नारद मुनी, देव किंवा अंगी मायावी शक्ती असणारे काही राक्षस हे डोळे मिटून ध्यान करताच क्षणार्धात कधी वसुंधरा पृथ्वीवर तर कधी पाताळलोकात तर कधी देवलोकात वावरताना दिसत आणि ते त्यांच्या इच्छेप्रमाणे काम होता क्षणी अंतर्धान पावून इच्छित स्थळी पोहचत असत. 


एवढेच नव्हे तर चक्क काही वर्षांपूर्वी टी.व्ही.वर प्रक्षेपित होणार्‍या "स्टार ट्रेक " ह्या मालिकेतही आपण असे पाहिले आहे की या मालिकेतील काही पात्रे (माणसे)  त्यांच्या अंतराळयानातून जवळच्या ग्रहावर किंवा इतर ठिकाणी कोणत्याही वाहनाशिवाय किंवा हवेतून न उडता आपोआप अवतरत असल्याचे दाखवले जायचे. त्यासाठी त्या व्यक्ती ह्या एका विशिष्ट कक्षात जाऊन विशिष्ट प्रकारच्या वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या प्रणालीद्वारे त्यांचे स्थलांतर होत असल्याचे दृश्य तेव्हा आपल्या सर्वांनाच थक्क करून टाकत असे. त्या कक्षामध्ये तीन वर्तुळाकार जागांवर तीन व्यक्ती उभ्या राहत आणि ते यंत्र सुरू केले की त्या जागेवरील त्या व्यक्ती हळूहळू कणस्वरूपांमध्ये विरून जाताना दिसत व काही वेळाने त्या वर्तुळाकार जागेवर कोणीही उरत नसे. त्या ठिकाणाहून अदृश्य झालेल्या त्या व्यक्ती इतरत्र कुठे तरी (त्यांना हवे असलेल्या ठिकाणी ) तशाच प्रकारे प्रकट होताना दिसत होते. 




अशा प्रकारे कोणत्याही साधनाविना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी संचार करण्याचा प्रकार म्हणजे ‘अदृश्य संचार’(टेलिपोर्टेशन) ही संकल्पना आहे जी आतापर्यंत तरी मानवाला काल्पनिक वाटत होती व त्याला कोणताही आधार/प्रमाण नसल्याचे वाटत होते. पण अशा प्रकारचे टेलिपोर्टेशन करणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे व भविष्यात मानवालाही एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवता येऊ शकेल, असे त्यांना वाटत आहे. मानवासहित मोठया वस्तूंचे टेलिपोर्टेशन करणेही अशक्य नाही हे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राच्या नियमांच्या आधारे ठासून सांगत आहेत आणि तसा दावा त्यांनी केला आहे. 

थोडक्यात सांगायचे तर "टेलिपोर्टेशन " ह्या तंत्राने माणूस एका ठिकाणाहून अदृश्य होऊन दुसर्‍या ठिकाणी कोणत्याही गोष्टीच्या मदतीशिवाय आपोआप जाऊ शकतो , अगदी विमानाची मदत न घेता सुध्दा. 

आता टेलिपोर्टेशन नेमके कसे असेल? हे आपण एका उदाहरणावरून समजून घ्यायचा प्रयत्न करू या. समजा एका माणसाला मुंबईतून अमेरीकेतील न्युयॉर्कला जायचे आहे, तर आपण म्हणू काय सोपे आहे तो माणूस विमानाने सहज जाऊ शकतो, काय बरोबर ना? पण त्यासाठी त्याला अनेक तासांचा विमानप्रवास करावा लागणार हे मात्र नक्की आहे. आता हा माणूस एखादा करोडोपती आहे की भारताचा पंतप्रधान आहे की अमेरिकेचा अध्यक्ष आहे की सामान्य माणूस आहे यावर विमानप्रवासाचे अंतर कमी-जास्त होऊ शकत नाही. काही तासांचा विमानप्रवास हा प्रत्येक माणसला करावाच लागणार आहे. फक्त कोणी Premium Class ने luxuruious प्रवास करेल त्याच्या पैशाच्य जोरावर तर कोणी Economc Class ने मर्यादीत सुविधांसह प्रवास करेल.

पण टेलिपोर्टेशनमध्ये हे काही तासांचे अंतर काही क्षणांचे होईल. हे नेमकं कसं घडेल हे जाणून घेणे सुध्दा खूपच गंमतीशीर आहे. ज्या मुंबईतील माणसाला न्युयॉर्कला जायचे आहे तो मुंबईत असणारा माणूस एका भल्या मोठ्या कपाटात जाईल. आत गेल्यावर कपाट बंद होईल. विशिष्ट बटण दाबल्यानंतर कपाटातील माणसाच्या शरीरातला प्रत्येक अणूरेणू वेगळा होऊ लागेल. संपूर्ण शरीराचे अणूरेणू वेगळे झाले की ते तसेच्या तसे न्युयॉर्कमधील त्या विशिष्ट स्थळी असलेल्या कपाटात पाठवले जातील. न्युयॉर्कच्या त्या कपाटातील अणूरेणू एकत्र झाले की कपाट उघडले जाईल. आतून मुंबईतला माणूस जशाच्या तसा बाहेर पडेल. 


आज हा सारा प्रकार एखाद्या काल्पनिक विज्ञानकथेतला वाटतो. असं कसं शक्य आहे असा प्रश्न स्वाभाविकच आपल्याला पडतो. ह्या संदर्भात २९ अप्रिल २००५ साली प्रसिद्ध झालेल्या " Teleportation - The Impossible Leap" by DaviD Darling 'टेलिपोर्टेशन - दि इंपॉसिबल लीप' ह्या डेव्हीड डार्लींग नामक ब्रिटीश संशोधकाने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उल्लेख अहवालात आला आहे. डेव्हीड यांनी आपल्या पुस्तकात आत्मविश्वासाने लिहीले आहे की माणसाच्या शरीरातले अणू (Atom) आणि रेणू (Molecules) एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचे प्रयोग म्हणजे मानवी शरीराचे अदृश्य वहन करण्याच्या क्रियेचे पहिले पाऊल आहे. त्यानंतर लवकरच अतिसुक्ष्म विgघटित अणू रेणू (Micromolecules व Microbes) यांचे अदृश्य वहन करण्याची पायरी असेल. 

टेलिपोर्टेशनचा भाग हा माणसाला केवळ मुंबई ते न्युयॉर्क पाठवण्याइतका किंवा आंतरराष्ट्रीय किंवा आंतरखंडीय प्रवासापुरताच मर्यादित मात्र नाही. ह्या टेलिपोर्टेशनचा वापर करून परग्रहावर पाठवायचे एखादे यान वा यांत्रिक मानव (रोबो) हेही पृथ्वीवरून पाठवले जाऊ शकेल. अंतराळ प्रवास संपूर्णपणे टाळता येणे त्यामुळे शक्य होईल. आज उदयाला येत असलेली नॅनो टेक्नॉलॉजी त्यासाठी संपूर्णपणे प्रगत होण्याची मात्र गरज आहे. आज आपण पाहतो की कोणत्याही कार्यालयात रंगीत फॅक्स (Colour FAX) ही नित्य व्यवहारातील गोष्ट झालेली आहे पण सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी एका ठिकाणी ऑफीसमध्ये ठेवलेला मजकूर वा चित्र दुसर्‍या शहरातल्या ऑफीसमध्ये किंवा दुसर्‍या देशातल्या ऑफीसमध्ये पाठवणे हे किती अवघड होते आणि तेही जसाच्या तसा आणि तोही काही क्षणात उमटू शकेल ही कल्पना केवळ अशक्य वाटायची. काही जादूचा चमत्कारच असे करू शकतो असे वाटायचे , पण आपण आज रंगीत फॅक्स चुटकीसरशी वापरता येतो. तेव्हा मुद्दा एका ठिकाणचे चित्र वा मजकूर दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचा विषय होता. आणि आपल्याला आज टेलिपोर्टेशनचा विषय जाणून घेताना मजकूर वा चित्राऐवजी एक जिवंत माणूस अख्खाच्या अख्खा एका ठिकाणाहून दुसर्‍या  ठिकाणी पाठवायचा आहे हा एवढाच फरक लक्षात घ्यावा लागेल. 

मे २०१४ च्या अखेरीस नेदरलँड्समधील प्रयोगशाळेत प्रा. हॅन्सन यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगामध्ये एका अणूला सुमारे तीन मीटर अंतरावर नेऊन ठेवण्यात यश मिळाले. हा प्रयोग १०० टक्के अचूक होता. या प्रयोगामध्ये प्रा. हॅन्सन यांनी तीन कणांचा वापर केला. हि-याच्या स्फटिकामध्ये बंदिस्त असलेला नायट्रोजनचा एक अणू व दोन इलेक्ट्रॉन यांचा वापर करून त्यांना तीन मीटर अंतरावर नेऊन ठेवण्यासाठी एका विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रा. हॅन्सन सांगतात की या प्रयोगामध्ये आम्ही एका कणस्वरूपात असलेल्या पदार्थाचे टेलिपोर्टेशन केले. त्यामुळे जर आपण मानवी देह म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अनेक अणूंचा एका विशिष्ट रचनेने बांधलेला समूह आहे, असे मानले तर तत्त्वत: आपल्यालासुद्धा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रणालीतून जाणे शक्य आहे, असे त्यांचे मत आहे. सध्या जरी आपल्याला प्रत्यक्षात असे होण्याची शक्यता कमी आहे असे भासले तरी मात्र, असे कधीच होऊ शकत नाही, असे म्हणणेही चुकीचे आहे. कारण या शक्यतेला विरोध करणारा कोणताही मुलभूत नियम भौतिकशास्त्रात नाही. प्रयोगाचा पुढील टप्पा जुलै महिन्यात केला जाणार आहे. १३०० मीटर अंतरावर असलेल्या दोन इमारतींमध्ये या प्रणालीचा वापर करून माहितीचे टेलिपोर्टेशन केले जाणार आहे अशी माहिती प्रा. हॅन्सन व त्यांच्या सहकार्‍यांनी दिली होती. 

ह्या सर्वांपेक्षा अजूनही विस्मयाचा प्रचंड धक्का देणारी घटना, डॉक्टर अनिरुध्द जोशी कार्यकारी संपादक असलेल्या दैनिक प्रत्यक्ष ६  जानेवारी २०१५ च्या अंकामध्ये वाचनात आली होती ती म्हणजे अमेरीकन नौदलाची एक रिकामी युध्दनौका केवळ मानवाच्या दृष्टीस पडणार नाही एवढेच नव्हे तर रडारवरूनही ओळखता येणार नाही अशा रीतीने "टेलिपोर्टेशन " ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अदृश्य करून दाखविण्याची किमया आजपासून ७५ वर्षांपूर्वीच म्हणजेच १९४० साली एका महान शास्त्रज्ञाने प्रत्यक्षात करून दाखविली होती.

तो महान शास्त्रज्ञ म्हणजे "विज्ञानाचा जनक " मह्णून ओळखले जाणारे डॉक्टर निकोल टेसला !!! 


Andrew Basiago , Alfred Bielek ह्यांच्यासारखे Consiparcy Theory मांडणारे अभ्यासक आणि विवीध वेबसाईटस आणि काही चित्रपटांमधून असे मांडले गेले होते की डॉक्टर निकोल टेसला ह्यांच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञान वापरून अमेरिकेच्या नौदलाकडून " फिलाडेल्फिया प्रॉजेक्ट " ( Philadelphia Project ) किंवा " प्रॉजेक्ट रेन्बो "  (Project Rainbow) नावाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात होता ज्याचे डॉक्टर निकोल टेसला हे संचालक होते. त्यांनी जरी "टेलिपोर्टेशन " ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक अख्खी रिकामी युध्दनौका अदृश्य करण्याची यशस्वी चाचणी केली होती, तरी मानवजातीसाठी हा प्रयोग खूप धोकादायक होऊ शकतो ह्याची जाणीव त्यांना होताच मानव युध्द्नौकेत असताना केलेला प्रयोग मानवी जीवाला धोका निर्माण करू शकतो असे त्यांनी स्पष्ट बजावून  सांगितले. तसेच अमेरीकी नौदलाने युध्द्नौकेवर माणसांना घेऊन तसे प्रयोग करू नये म्हणून खूप प्रयत्नही केले , पण ते अयशस्वी ठरले. शेवटी प्रयोगाच्या अपयशाची जबाबदारी स्विकारून वयाच्या ८७ व्या वर्षी टेसला यांनी मानवजातीच्या प्रगतीसाठी आणि विज्ञानाच्या उचित वापरासाठी आयुष्यभर झटण्याची आपली नैतिक मूल्ये व परमेश्वरी तत्त्वांशी तडजोड करण्याचे साफ नाकारून अमेरीकी नौदलाला नकार देण्याचे असामान्य धैर्य दाखविलेच आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. टेसला ह्यांच्या नकाराला न जुमानता त्यांच्या मृत्युनंतर अवघ्या काही महिन्यांनी हा प्रयोग पुन्हा सुरु केला गेला आणि त्याचे मानवावर झालेले विध्वंसकारक दुष्परिणाम पाहून तो प्रयोग बंद करावा लागला असे वाचनात आले होते. 
  
म्हणजेच "टेलिपोर्टेशन " हे तंत्रज्ञान मानवाला अदृश्य करू शकते जर त्याचा उचित वापर झाला तर अन्यथा अमेरीकेला जसे अट्टाहासाने अनुचित वापर करून मानवाला "टेलिपोर्टेशन " द्वारे अदृश्य केल्यावर ज्या दुष्परिणामांना सामोरे जाऊन ते थांबवावे लागले तशी पाळी मानवजातीवर अनुचित पध्द्तीच्या वापरामुळे ओढावू शकेल  अशी दाट भीती मनात दाटून येते.  

डॉक्टर निकोल टेसला ह्या महान शास्त्रज्ञाने मानवजातीवर अगणित उपकार करणारे संशोधन करून ७०० पेटंटस काढली होती , ह्या अवाढव्य कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त वाचकांना ह्याचा लाभ घेता  यावा म्हणून पुन्हा प्रथम भागापासून ही मालिका वेबस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अधिक माहितीसाठी आपण http://www.pratyaksha-mitra.com/dr-nikola-tesla-01/ ह्या स्थळावर भेट देऊ शकता. 

आपण विचार पण करू शकत नाही की " टेलिपोर्टेशन " ही एक वैज्ञानिक कल्पना वाटणारी गोष्ट सत्यात उतरू शकते परंतु डॉक्टर निकोल टेसला ह्या महान द्रष्ट्या शास्त्रज्ञाने मात्र अनाकलीय वाटणारी ही घटना, स्वत:च्या अफाट कार्याने आणि अथक परिश्रमाने " टेलिपोर्टेशन " द्वारे  अदृश्य संचार करता येऊ शकतो हे सप्रमाण सिध्द करून करून प्रत्यक्षात सत्यातही उतरविली होती, हे निर्विवाद सत्य मात्र आपल्याला स्विकारावेच लागेल.

" अशक्य ते शक्य तूची घडवावे तुझ्या अनंत लीला पाहण्यात मी रमलो" असेच उद्गार परमेश्वराविषयी मानवाने काढावे असेच जणू हे "टेलिपोर्टेशन" मानवाला शिकवू इच्छिते असे वाटते. 

    

  

1 comment:

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog