Friday 17 February 2017

बुली बासुमतारी- आसामी तिरंदाजपटूचा असामान्य जीवनसंघर्ष !


दिनांक ११-०२-२०१७ च्या दैनिक प्रत्यक्ष मध्ये राष्ट्रगंगेच्या तीरावर ह्या सदरात आसाममधील चिरांग जिल्ह्यात समथाईबारी येथे राहणार्‍या तिरंदाज बुली बासुमतारी ह्यांच्या वेरील लेख खूपच आवडला.



लहानपणापासूनच बुलीने तिरंदाजीत जरी कसब दाखवले असले तरी पहिल्यांदा शाळेतील जिल्हास्तरीय स्पर्धेत तिला अपयश पचवावे लागले. पण निराश न होता बुलीने तब्बल २ वर्षे  खडतर सराव करून अजमेर येथील नॅशनल चॅम्पिय़नशिप स्पर्धेत भाग घेऊन २ सुवर्णपदक व १ रौप्यपदक अशी कमाई केली. यानंतर ही अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय स्पर्धांमध्ये तिने भरीव कमाई केली. एवढेच नव्हे तर अनेक राज्यांकडून विशेष पुरस्कार तिने पटकाविले. परंतु २०१० सालच्या आजारपणाने बुलीच्या सुखाला जणू काही ग्रहणच लागले. आजारपणाचा प्रचंड खर्च, घरची हलाखीची परिस्थिती व लग्नानंतर संसाराचा वाढता भार ओढताना बुलीला तिरंदाजीचा सराव इच्छा असूनही करता आला नाही. जणू बुलीच्या जीवनात प्रत्येक क्षणी एक नवा संघर्षच सामोरी येऊन  उभा ठाकत होता. 

नुसत्या धनुष्याचीच किंमत अडीच लाख रुपये असल्याने आमच्या गरीबीमुळे सरावासाठी लागणारे धनुष्य-बाण विकत घेता येणे अशक्यच होते , त्यामुळे सराव बंद पडला अशी खंत बुलीने आसाम मधील एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

पुढे दोन मुलींची आई झाल्यावरही  बुलीचे तिरंदाजी बद्दलचे प्रेम ,आंतरीक ओढ तिला स्वस्थ बसू देईना  व तिने मुली मोठ्या झाल्यावर जवळच्या शाळेच्या मैदानात आपला सराव चालू ठेवला. पण संसाराचा उंबरेघाट ओलांडणे खूप कठीण असते म्हणतात तसेच पुन्हा बुलीला मजूर पतीच्या तुंट्पुंज्या मिळकतीला हातभार लावण्यासाठी उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी सरावाकडे पाठ फिरवावी लागली.
तिरंदाजी हा ऑलिम्पिक खेळ आहे. म्हणूनच तिरंदाजी हा खेळ निवडला तर क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करता येईल, या विचाराने काही मोजके खेळाडू तिरंदाजीची निवड करताना दिसतात.
                                                                  


दीपिकाकुमारी हे नाव खरे तर कित्येक वर्षांपासूनच भारतीय तिरंदाजीच्या क्षेत्रात झळकू लागले होते. मात्र, भारतीय क्रीडारसिकांनी कधी दखल घ्यावी वाटली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. २००७ च्या इंटरनॅशनल आर्चरी चॅलेंज कपमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावल्यानंतरदेखील तिच्या नावाची कोणत्याच लहान-मोठ्या दैनिकांनी (अपवाद दैनिक प्रत्यक्ष )विशेष दखल घेतली नव्हती. दीपिकाकुमारीला प्रथम मानांकन मिळाल्याचे वृत्तदेखील बहुतांशी सर्वच माध्यमांकडून असेच दुर्लक्षित राहिले होते.
जागतिक स्तरावरील बँकॉक ग्रँट प्रीक्स येथील तिरंदाजी स्पर्धेत आपल्या भारत देशासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या निशा राणी दत्ताची दुर्दैवी कहाणी ! निशाने टाटा आर्चरी अॅकॅडमीत प्रशिक्षण घेऊन देशासाठी सुवर्णपदक मिळवले होते; पण हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला खेळ सोडावा लागला. अखेर  कोरियाच्या एका प्रशिक्षकांनी तिला भेट दिलेले ४ लाख किमतीचे धनुष्य आणि एकूण २० बाण तिने मणीपूरच्या एका खेळाडूला केवळ ५० हजार रुपयांत विकून टाकले.

तिरंदाजी हा खेळ निवडल्याने सुरुवातीला मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीची माणसे थट्टा करत असतात. ‘चाललाय अर्जुन बनायला’ अशी रेवडी उडवत असत. मात्र मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडील अशी प्रचंड किंमत धनुष्य-बाणाची असून देखील आईवडीलांनी कर्ज काढून निधी जमवून ते  भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्यामुळेच वर्षभरातच अकादमीतून तिरंदाजीसाठी माझी निवड झाली अशी प्रतिक्रिया देणार्‍या अतानू दास ह्या तिरंदाजाच्या व्यथा काळजाला घरे पाडतात.    

बुली बासुमतारी सारख्या असंख्य मुली आज देशात मोठ्या संख्येने आहेत. या महिला खेळाडूंकडे पाहून खेळाकडे वळणाऱ्या मुलींच्या संख्येत भर पडते आहे. गरज आहे ती या मुलींची गुणवत्ता ओळखण्याचे. किंबहुना, गावागावात लपलेली ही गुणवत्ता ओळखण्याची .अशा गुणवान मुलींना वेळीच ही संधी उपलब्ध करून दिली, सोयीसुविधा मिळाल्या तर काय होऊ शकेल, याची कल्पना आपण करू शकतो.

बुलीला मिळालेल्या न्यायाची  कथा छापून दैनिक प्रत्यक्षने खरेच वाचकांना एक नवीन दृष्टीकोन दिला आहे त्याबद्दल दैनिक प्रत्यक्ष टीमचे मन:पूर्वक कौतुक आणि आभार !  ह्या लेखातील प्रतिक्रिया - अशा बुली देशाच्या कानाकोपर्‍यात आहेत, याचा कुणाला विसर पडता कामा नये , ह्यावरून सध्या आसाम मध्ये चर्चेत असलेल्या अशाच एका दुर्दैवी महिला खेळाडूची आठवण येथे प्रकर्षाने होत आहे. 

लीलावती दाईमरी ही आसाम मधील बसाका जिल्ह्यातील धावपटू जिने सलग १९७४, १९७५, व १९७६ मध्ये ३ वेळा सुवर्णपदक राष्ट्रीय पातळीवर मिळविले होते. त्या नंतर तिचे आंतर्राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करण्याचे स्वप्न होते पण गरीबीच्या हलाखीच्या परिस्थितीने ती हतबल झाली. सध्या वृद्धापकाळामुळे ती जेमतेम हाता-तोंडाची मिळवणी करून , तर रोजगार मिळाला नाही तर उपासमार सहन करून अत्यंत हलाखीत दिवस काढत आहे. 

हे चित्र पालटल तर  मग ऑलिम्पिकचे दरवाजे भारतासाठी अधिक विशाल स्वरूपात निश्चितच उघडतील ह्यात तिंळमात्र शंका नाही.

2 comments:

  1. Really it's very sad to see the treatment which our national players are getting .Unless you are a cricketer you can't expect people to notice you in India. It will result in discouragement amongst all other players who want to Perdue their dreams other than cricket.
    Many thanks to *PRATYAKSHA* team for bringing this social issue to reades' notice.

    ReplyDelete
  2. Very nice information about Buli Basumatari.This is unfortunate that young talent has been ignored by authorities of Indian sports organizations.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog