Wednesday 14 February 2018

भारताचा पहिला ’कचरा महोत्सव’

काय नाव वाचून दचकलात ना? पहिल्यांदा ही बातमी वाचली तेव्हा मी ही बुचकळ्यातच पडले होते. आपण नेहमी विवीध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले विवीध खाद्य मेळावे ,महोत्सव ह्यांबद्दल  ऐकतो , पाहतो आणि मस्त पैकी तावही मारतो जसे आंबा महोत्सव ,, चिक्कू महोत्सव,  चॉकलेट महोत्सव इत्यादी. पण नुकतीच एका आगळ्या वेगळ्या बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे आमच्या ऑफीसमध्ये होणार्‍या जनरल नोलेज क्वीझमधील एका प्रश्नाने आणि त्या अनुषंगाने दिलेल्या बातमीने. भारतातील पहिला गारबेज फेस्ट "कचरा महोत्सव २०१८" हा कोणत्या राज्याने आयोजित केला होता? उत्तरामध्ये नाव मिळाले ते छत्तीसगडचे !

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ फेब्रुवारी २०१८च्या अंकात "राष्ट्रगंगेच्या तीरावर" ह्या सदरात "टूर द छत्तीसगड" हा लेख वाचला आणि आवडला देखिल होता. 

जगभरात छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्याची नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख आहे आणि ही ओळख पुसून टाकण्यासाठी छत्तीसगड पर्यटन विभागाने कंबर कसली आणि "टूर द छत्तीसगड" म्हणून कार्यक्रम सुरु करून त्या अंतर्गत "सायकल एक्स्पेडिशन " आयोजित केली होती ही बातमी वाचनात आली.  त्या आधी "बेस्ट कॉप " ची बातमी वाचनात आली आणि त्यानंतर  ट्विटर ह्या सोशल मिडीयावर ’भारताचा पहिला ’कचरा महोत्सव २०१८’ हया रायगड डिस्ट्रीक्ट , छत्तीसगड ह्यांच्या ट्विटने छत्तीसगड ची नव्याने ओळख होत असल्याचे ध्यानात आले. छत्तीसगड राज्य असो वा बस्तर जिल्हा हा माओवाद्यांचा जिल्हा वा राज्य असल्याचा जो गैरसमज जगभरात  पसरला होता तो दूर होण्यास नक्कीच मोठा हातभार लागेल असा आशावाद निर्माण झाला आहे. 




रायपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनेने १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत द गारबेज फेस्टीव्हल "कचरा महोत्सव " चे छत्तीसगड मध्ये आयोजन केले होते. म्युनसिपल कॉर्पोरेशनच्यानुसार अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच उत्सव आहे. ह्या गारबेज उत्सवाचा मूळ उद्देश्य जागृती करणे , लोकांना वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषय़ाबाबत मार्गदर्शन करणे आणि गारबेज किंवा कचरा म्हणून संबोधित केल्या गेलेल्या वस्तूंपासून विवीध टेक्निकस वापरून त्याच फेकल्या जाणार्‍या वस्तू पुनश्च नव्याने वापरात  आणता येऊ शकतात ह्याचे प्रायक्षिक करून दाखविणे हा होता. ह्या ३ दिवसीय उत्सवामध्ये व्याख्याने,चर्चा , स्पर्धा आणि सांस्कृतिक प्रयोग आयोजित केले गेले होते. ह्या व्यतिरिक्त कचर्‍याचे (गारबेजचे) प्रभावी रीत्या ,व्यवस्ठित प्रकारे कसे व्यवस्थापन करता येऊ शकते  ह्यां बाबत लोकांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने विवीध प्रकारच्या कार्यशाळांचे ही आयोजन केले गेले होते.ह्या फेस्टीव्हल मध्ये वेस्ट ( टाकाऊ)  मधून युटिलीटी वस्तु कश्या बनविता येतील ह्या संबंधीच्या विवीध प्रकारचे स्टॉल्स देखिल सहभागी करण्यात आले होते. 


स्वच्छतेवर आणि आरोग्यावर शाळेतील मुलांनी लिहिलेल्या कविता, लेख ह्यांचा सुध्द्दा येथे समावेश केला होता. लहान मुले आपल्या वागण्यातून , कृतीतून स्वच्छतेचा संदेश सहजतेने समाजात  पसरविण्यास खूप मोठा हातभार लावतात , त्यामुळे ते खरे (ऍम्बेसेडार )प्रतिनिधी असतात. त्यांनी केलेल्या काही प्रतिकृती खरोखरीच खूप महत्त्वपूर्ण संदेश देऊन समाज प्रबोधनाचे कार्यच  जणू करीत होत्या. 
                                        



अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या संकल्पनांचा वापर करून स्वच्छ्ते संबंधी आपण नक्कीच सुंदर उपक्रम राबवून कचरा निर्मूलन करून वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न सोडवू शकतो. 

टीप - " भारताचा पहिला ’कचरा महोत्सव’ " हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १२ फेब्रुवारी  २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता. 

1 comment:

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog