Wednesday 30 December 2015

आरोग्यम् सुखसंपदा - चांगले बॅक्टेरिया - आरोग्याची खरी गुरुकिल्ली !!!

सर्वसामान्यत:  anti-biotics हा शब्द ऐकला नाही असा माणूस शोधून देखिल सापडणे दुर्मिळच म्हणावे लागेल इतका आजकाल हा anti-biotics शब्द हा आजाराशी अगदी जवळचे नाते बनवून बसलाय. सर्वसामान्यपणे सर्दी/पडसे किंवा, खोकला , ताप , जुलाब झाले आणि डॉक्टरांकडे गेले तर आपल्याला डॉक्टर सांगताना आढळतात की तुम्हाला बॅक्टेरियल इनफेक्शन ( bacterial infection/ viral infection) झाले आहे आणि anti-biotics  घ्यावी लागतील. तर कधी कधी उलटेच चित्र दिसते की डॉक्टर सांगतात दोन तीन दिवस औषधे घ्या बरे वाटेल, पण आम्हालाच घाई झालेली असते लवकर बरे वाटावे म्हणून आणि मग आम्हीच डॉक्टरांना सांगतो, " नाही डॉक्टर, ताबडतोब बरं वाटलं पाहिजे, तुम्ही आताच anti-biotics सुरु कराच !

बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. पण जीवाणू म्हणण्यापेक्षा बॅक्टेरिया हा शब्द जास्त परिचयाचा असल्याने पुढील भागात आपण जीवाणूऐवजी बॅक्टेरिया शब्दच वापरू या.  

बॅक्टेरिया हे अपायकारक , घातक असतात , पण सर्वच बॅक्टेरिया हे वाईट किंवा अपायकारक असतातच असे नाही, काही बॅक्टेरिया चांगले पण असतात हे मला डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांच्या " आपले आरोग्य " ह्या दिनांक १३ डिसेंबर २०१४ च्या व्याख्यानाला जाऊन कळले.  
     

डॉक्टर अनिरूध्द जोशी सांगत होते की आपली आतडी अत्यंत चांगली असणं , हीच आपल्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. 
The Healthy Gut is hidden key to perfect health. 



ह्याची माहिती आपण http://www.aarogyamsukhsampada.com/gut-bacteria-gut-flora/ ह्या लिंकवर वाचू शकता. 
आपण अंदाजही बांधू शकत नाही इतके मोठ्या संख्येने हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात वावरत असतात. 
100 Trillion म्हणजे (१००,०००,०००,०००,०००,०००,०००,००० ) एवढे बॅक्टेरिया आपल्या शरीरात, आपल्या आतडयात असतात.  
ही किती मोठी अवाढव्य संख्या आहे, ह्याचा अंदाज येण्यासाठी डॉक्टर अनिरूध्दांनी एक गंमतीशीर गोष्ट मांडली की One Trillion dollar bills laid end-to-end would stretch from the earth to the Sun - and back - with a lot of miles to spare म्हणजेच थोडक्यात सांगायच झाले तर, लाखो अब्ज. डॉलरची नोट असते ती एकाला एक अशी जोडत गेल्यास आपण पृथ्वीपासून सूर्याकडे जाऊन परत पृथ्वीवर येऊ , तरी देखिल अनेक बॅक्टेरिया उरलेलेच असतील. ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या आपल्या पेशी आहेत, त्याच्यापेक्षा दहा पट जास्त बॅक्टेरिया आहेत.      
The Human gut contains 10 times more bacteria than all the human cells in the entire body. म्हणजेच डॉक्टर गंमतीने म्हणाले की आपण फक्त एक टक्का माणूस आहोत आणि नव्याण्णव टक्के बॅक्टेरिया आहोत. 
आपलं माणूसपणं, आपला स्वभाव, आपल्या acticities, आपली रोगप्रतिकारक शक्ती , रोगप्रतिबंधक शक्ती, आपली व्यायाम करण्याची शक्ती ह्या सगळ्या गोष्टी ह्याच बॅक्टेरियांशी निगडीत असतात.   
बॅक्टेरिया हे तीन प्रकारचे असतात. 
१. चांगले बॅक्टेरिया - हे bacteroids जातीतले असतात , जे माणसासाठी अत्यंत उपायकारक आणि मदत करणारे असतात. 
२. वाईट बॅक्टेरिया - हे firmicutes जातीतले असतात, जे माणसासाठी अत्यंत अपायकारक, धोकादायक असतात. 
३. मधले बॅक्टेरिया- हे फार चांगले नाहीत आणि फार वाईट नाहीत असे मधल्या प्रकारातले असतात. 

चांगले बॅक्टेरिया हे Vitamin K, vitamin E अशी चांगली द्रव्ये , चांगली हॉर्मोन्स, चांगली रसायनं बनवितात , ज्याने आपले आरोग्य चांगले राखले जाते तर वाईट बॅक्टेरिया हे आपल्या शरीरात शरीराला घातक ठरतील असे अनेक पदार्थ बनवितात, Insulin च काम थांबविणारे पदार्थ बनवितात, आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी भगवंताने जी रचना केलेली आहे, त्या रचनांना वाईट बॅक्टेरिया कापून काढतात. 

उदाहरणार्थ Typhoid झाला असता salmpnelaa typhi नावाचे रोग आणारे बॅक्टेरिया शरीरात घुसतात आणि ते फक्त एकच Typhoid हा रोग आणत नाहीत तर ते हजारो दुसरे रोगही उत्पन्न करू शकतात.  


आजारांना तोंड देण्याचे काम आपल्या शरीरामध्ये हिपोटाईस नावाच्या पेशी करत असतात आणि काही प्रोटीन्स करत असतात आणि त्यांना अगदी बरोबरीने मदत करीत उभे असतात ते Gut मधील बॅक्टेरिया. 
Gut म्हणजे घश्यापासून गुद्द्वारापर्यंत सगळं आतडं. ह्या आतड्यामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया हे आपल्या शरीराचे खरे राखणदार असतात. 

आरोग्य हीच आपली खरी सुखसंपदा तेव्हाच होऊ शकेल जर आपण ह्या चांगल्या बॅक्टेरियांची नीट निगा राखली आणि जोपासना केली तरच...

शोधाअंती आता असे लक्षात आले आहे की लठ्ठ माणसाच्या (obese person )शरीरामध्ये असणारे बॅक्टेरिया हे निरोगी माणसाच्या शरीरात असणार्‍या बॅक्टेरियांपेक्षा वेगळे असतात. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी असे संशोधन केले आहे की लठ्ठ माणसाच्या आतड्यात firmicutes वाईट बॅक्टेरियांचे प्रमाण हे bacteroids चांगल्या बॅक्टेरियांच्या पेक्षा जास्त असते. ह्यावरून आपल्याला आपले आतडे किती काळजीपूर्वक सांभाळणे गरजेचे आहे हे कळू शकते. 

आता हे बॅक्टेरिया खराब (वाईट) कशामुळे होतात ? आपल्या शरीरात वाईट बॅक्टेरिया वाढतात का आणि चांगले बॅक्टेरिया मरतात का ? व चांगले बॅक्टेरिया मारण्याचं काम आणि वाईट बॅक्टेरिया वाढण्याचं काम कशामुळे होते, हे आपण पुढील भागात पाहू या....

संदर्भ:
१. डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांचे "आपले आरोग्य" ह्या विषयावरील १३ डिसेंबर २०१४ चे व्याख्यान

  

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog