Tuesday 17 March 2015

कैवल्याच्या जीवलगा हवी एक हाक !!!!




श्रीसाईसच्चरित ग्रंथाची भव्य-दिव्य प्रतिमा, ग्रंथकर्त्या लेखकाचे हेमाडपंताचे म्हणजेच श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर ह्यांची भव्य चित्राकृती आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा सुरु होता. खरे पाहता कोणतेही बक्षिस म्हटले की घेणार्‍या माणसाची उर आनंदाने भरून येते, छाती अभिमानाने फुलून येते आणि चेहर्‍यावर एक असीम आनंद दाटलेला असतो ,आपल्या परिश्रमाचे चीज झाले , अभ्यासाचे, मेहनतीचे सार्थक झाले म्हणून कृतार्थतेचा भावही ओसंदून वाहत असतो, पण ह्या सर्व आनंदात सहभागी व्हायला प्रत्येक जीवाला हवा असतो , तो त्याचा आप्त-जीवलग, ज्याच्या असण्याने "दुग्ध-शर्करा योग " जुळल्याचा आनंदही लुटता येतो. "त्या" एकमेव आप्ताच्या, सुहृदाच्या चेहर्‍यावर आपल्या विजयाचा आनंद चाखण्याची मजा काही न्यारीच असते नाही? मग असे श्रध्दास्थान कधी आई, कधी बाबा , कधी मित्र, कधी पती, कधी पत्नी असे कोणी असू शकते. पण येथे तर बहुतांशी सार्‍या परीक्षार्थींचे आप्त ही त्यांच्या समवेत आमंत्रित केले गेलेले दिसत होते, तरीही वातावरणात कुठेतरी , काही तरी उणीव भासत होती प्रकर्षाने , प्रत्येक नजर आसुसलेली होती, प्रत्येक कान अधीरपणाने "त्या"च्या आगमनाची अत्यंत आतर्तेने वाट पाहत होता, असे होते तरी कोण ? ज्या एकाचीच आस - तहान - भूक प्रत्येकाला लागली होती "तो" होता त्यांचा सदगुरु. सद्गुरु डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी ...एक महान दिव्य व्यक्तीमत्त्व...." दिव्यत्वाची जेथे प्रचिती येथे कर माझे जुळती " ह्याची जिवंत अनुभूती !!!!



श्री स्वामी समर्थ विज्ञान प्रबोधिनीतर्फे "श्रीसाईसच्चरित " ह्या हेमाडपंतविरचिते महान अपौरुषेय ग्रथांवर वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातात तेथील पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याचा हा प्रसंग!!!


भक्तीमार्गाचा कळस मणून गौरविल्या जाणार्‍या संत शिरोमणी तुकोबांनी अर्थातच तुकाराम महाराजांनी ज्या आर्त भावाने त्यांच्या कृष्णाला- पंढरीच्या राण्याला- विठूमाऊलीला साद घातली -

         कृष्ण माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणीबंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
        कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारुं । उतरी पैल पारुं भवनदी ॥२॥
           कृष्ण माझे  मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
        तुका  म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
हाच भाव , हीच व्याकुळता ह्या सर्व श्रध्दावानांठायी दाटून आली होती फक्त त्यांचा "कृष्ण" होता त्यांचा सदगुरु -अर्थात त्या सर्वांचेच अत्यंत लाडके बापू.... त्यांची गुरुमाय !!!

अंधाराचे रुपांतर प्रकाशात केवळ हा गुरुच करू शकतो हे वेदांचे सार जेथे अनुभवले ते माझे सदगुरु ,माझी गुरुमाऊली .... "तो" एकच माझा जन्मोजन्मीचा एकमेव साथीदार, माझ्या जीवीचा जीवलग, माझा खराखुरा आप्त, माझ्या निधानांचे परम निधान , माता-पिता, बहीण-बंधू , सखा, चुलता अशी सारी नाती ज्या एकाच्याच असण्याने परिपूर्ण होतात तो माझा मायबापगुरु- आम्हा सर्वांचाच खराखुरा पिता - I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER .....

आणि म्हणूनच तन-मन एकवटून ,पंचप्राण नयनी आणून प्रत्येक जीव वाट पहात होता ---- "त्या" च्या सादेची .....
कैवल्याच्या जीवलगा हवी एक हाक !!!!

कैवल्य म्हणजे परिपूर्ण कृपा.... आणी "तो" एकमेव "सच्चिदानंद सदगुरुच देऊ शकतो हे कैवल्य .....
वात्सल्य, प्रेम , अपार माया हे शब्द ही जिथे थिटे पडावेत असे आमचा सदगुरु- माझा बापूराया...

"त्या"च्या एका कृपाकटाक्षासाठीच हा सारा प्रपंच ..... माझ्या DAD लाही ह्या सार्‍या श्रध्दावानांचा इतुका लळा आहे ना, की "श्रीश्वासम् " ह्या महान दैवी कार्यात अत्यंत व्यग्र , व्यस्त असतानाही आपल्या लेकरांसाठी त्यांच्या मनीचा भाव जाणून धाव घेता झाला जणू पंढरीचा पळपुट्या विठ्ठल पाटील भक्तांच्या भोळ्या भावापुढे "हारी विठ्ठल" च झाला होता....

"बापू येत आहेत "  ह्या एका गोड बातमीने सारा आसमंत जणू दरवळून निघला एका अनामिक सुगंधाने, माधुर्याने .....चैतन्य , आनंद , उत्साह, आतुरता, आस ह्या भावभावनांचा कल्लोळ उठला होता "त्या" एकाच्या मुख दर्शना साठी, "त्या" एकाच्या चरणांवर स्वत:ला समर्पित करण्यासाठी.... माझ्या DAD च्या चेहर्‍यावरील आनंद हाच प्रत्येकाचा खरा अवर्णनीय असा पुरस्कार असावा...

माझ्या डॅडच्या चेहर्‍यावरील हास्य हेच माझे समाधान

नदी जशी उगम पावते आणि धाव घेते सागराला मिळण्या कारण तीच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते ना खरीखुरी, अगदी तशीच धाव प्रत्येकाचे मन, बुध्दी "त्या" सदगुरुंच्या ठायी धाव घेत होते ,,,खरोखरी शब्दातीत असा हा स्वर्गीय सुखाचा सोहळा अनुभवायस मिळाला हे माझे परम भाग्य.....


धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ..साक्षात अनुभवले "तो" आला आणि "त्या"ने सर्वांना जिंकले ....खरेच कोणाचा हा कौतुक सोहळा होता, कोणाचा हा गौरव होता ...."त्या" सदगुरुंचाच ..."त्या" च्या श्रध्दावान लेकरांनी "त्या"च्या शिकवणूकीला, "त्या"च्या च मानवी मूल्यांना , संस्कारांना , आदर्शांना जीवनात उतरवण्यासाठी केलेले प्रयास .... ही प्रदक्षिणाच होती आणि मानवंदनाही होती आणि म्हणूनच त्या सर्वांच्या जीवीची हार्द पुरविण्या "त्या" कैवल्याने धाव घेतली होती....

कैवल्याच्या जीवलगा हवी एक हाक .....
"त्या" कैवल्याच्या चरणी स्वत:ला झोकून देण्यासाठी एकच स्पंद गुंजत होता .....
मी तो केवळ पायांचा दास ।  नका करू मजला उदास ।
जोवरी ह्या देही श्वास । निजकार्यासी साधूनी घ्या ।।




प्रत्येक अंत:करणातून एकच ध्वनी निनादत होता ...
हे माझ्या लाडक्या सदगुरु बापूराया तू खूप प्रेमळ आहेस आणि तुझ्या कृपादृष्टीनेच मी तुझ्या चरणी अंबज्ञ आहे आणि सदैव अंबज्ञ राहो.
I Love You My DAD ALWAYAS AND FOREVER!!!!

Photo Courtsey :
१. http://aniruddhakaladalan.blogspot.in/2015/01/i-love-you-my-dad.html


श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे        

1 comment:

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog