Sunday 6 August 2017

चीनचे मानसिक दबावतंत्र आणि ...

दैनिक प्रत्यक्षच्या ३१ जुलैच्या अंकातील "चिनी लष्करांना आक्रमकांना  पराभूत करण्याची क्षमता" ह्या शीर्षकाखालील राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा दावा आणि १ऑगस्टच्या अंकातील ’डोकलाम’ नंतर चीनची भारताच्या हद्दीत नवी घुसखोरी हे लेख वाचून पूर्वापार चालत आलेल्या "मानसिक दबाव तंत्र "युध्दाचा चीन अवलंब करून भारतावर अरेरावी करीत आहे असेच वाटते.

दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशी ह्यांनी दिनांक १०-०८-२००६ रोजी दैनिक प्रत्यक्ष मध्ये लिहिलेल्या व नंतर "तिसरे महायुध्द" ह्या पुस्तक स्वरूपात प्रकाशित झालेल्या "आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रभाव -१० मानसिक दबाव युध्दतंत्र " ह्या अग्रलेखाची आठवण झाली. त्यात डॉ अनिरूध्द जोशी ह्यांनी नमूद केल्या प्रमाणे मानसिक दबाव युध्दतंत्र ह्या अत्यंत प्रगल्भ झालेल्या युध्दशास्त्राच्या अंगाचा चीन पुरेपूर वापर करीत असलेला स्पष्टपणे आढळत आहे.

मानसिक दबाव युध्दतंत्राचा प्रभावी वापर तेराव्या शतकात क्रूर , आक्रमक चंगीजखानने जगाचा खूप मोठा भूभाग जिंकताना केला होता. ज्या प्रदेशावर हल्ला करावयाचा त्या प्रदेशातील लोकांचे मानसिक धैर्य खच्ची करून मगच आक्रमण करायचेह हा मार्ग त्याने अवलंबिला होता. चंगीजखानचा आपल्या प्रचंड सैन्यताकदीच्या व क्रौर्याच्या कथा प्रत्यक्ष युध्द पीडितांच्या तोंडातून ऐकून हल्ला करावयाच्या राज्यातील नागरिकांचे व शासकांचे मनोधैर्य ढासळून टाकावयाचे असा त्यामागील मूळ हेतु असायचा. 
                                                                 


अशाच रणकुशलयुध्दनीतिचा वापर करून चर्चिलने जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या हिटलरच्या मनात सदैव अमेरिका व रशियाच्या प्रभावाविषयी व सहभागाविषयी भयगंड निर्माण केला होता आणि रशियावरील आक्रमणात हिटलरला चूक करण्यास भाग पाडून सैबेरिया प्रांतात मनुषयबळा ऐवजी नैसर्गिक बळाच्या आधाराने ६ लाख जर्मन सैनिकांचा पराभव करून बळी घेतला होता. अमेरिकेने ह्याच तंत्राने इराकवर आक्रमण करण्याआधी इराकला एकटे पाडले होते. आता सध्याच्या परिस्थितीत चीन भारतावर ह्याच मानसिक दबाव तंत्राचा प्रयोग करताना जराही कसूर सोडीत नाही आणि आपल्या कणखोर भूमिकेने भारतही चीनला पुरेपूर पुरुन उरला तर आहेच.

                                                                   


सिक्कीमच्या सीमेवरील ’डोकलाम’ येथे भारत व चीनचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि तडजोडीची भाषा करायला चीन मुळीच तयार नसल्याचे दिसत असतानाच चीनची वर्तमानपत्रे , त्यांचे संबंधित अधिकारी  सतत भारताला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देऊन भारतीय नागरिकांचे  व शासनकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे जबरदस्त प्रयत्न करीत आहे. जरी प्रत्यक्षात भारताविरूध्द चीनला युध्द पुकारणे ही दिसते तितकी सहज , सोपी बाब नाही हे चीनला पुरते ठाऊक असले तरी  चीन ह्या प्रकरणी भारतावर दडपण टाकण्याची एकही संधी न सोडता मानसिक दबावतंत्राचा वापर अधिकाधिक करीत असल्याचेच उघडकीस येत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चीनच्या नेत्यांच्या मनातील जगातील सर्वात मोठी महासत्ता बनण्याचे मनसुबे तर उघडच आहेत सर्व जगासमोर. ह्या त्याच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी चीनला आधी आशिया खंडात पूर्ण वर्चस्व स्थापन करणे अत्यावश्यक आहे व ह्याही उद्दिष्टाच्या आड जर कॊण येत असेल तर फक्त ’भारत’ . 

त्यामुळे भारताची चोहो बाजूंनी कोंडी करून भारताच्या नाकीनऊ आणण्याचे चीन पराकोटीचे प्रयत्न करीत आहे. भारताचा शत्रू तो चीनचा मित्र हे जणू चीनचे सहज सोपे समीकरण आहे. भारतची कट्टर शत्रूता निभावणारा पाकिस्तान हा तर चीनच्या गळ्यातील ताईतच आहे जणू आणि भारताच्या जवळच्या सर्वच राष्ट्रांशी चीनचे प्रेम अगदी भरभरून वाहात असते ते ह्याच करिता मग तो श्रीलंकेच्या हंबंटोटो बंदराचा विकास असो की पाकिस्तानचा सीपीईसी प्रकल्प . 

चीन हा देश स्वत:चा नकाशा कमीत कमी चार पट करण्याच्या विचारात आहे हे डॉ अनिरूध्द जोशींचे वक्तव्य ह्याची प्रचिती देते       
आग्नेय आशियातील छोट्या देशांसह आशिया प्रशांत क्षेत्रातील ऑस्ट्रेलियासारख्या देशांनाही चीन सातत्याने इशारे व धमक्या देत आहे. "ईस्ट चायना सी " क्षेत्रावरून जपान्शी सुरु असलेल्या वादात चीन जपानलाही अद्द्ल घडविण्याची भाषा बोलत आहे. ’साऊथ चायना सी’ क्षेत्रावरून चीन अमेरिकेलाही धमक्या देत आहेच. चीन हा देश स्वत:चा नकाशा कमीत कमी चार पट करण्याच्या विचारात आहे हे डॉ अनिरूध्द जोशींचे वक्तव्य ह्याचीच खूण पटविते. यावरून आणि पूर्वीच्या अनेक घटनांवरून चीन आपल्या साम्राज्यवादाच्या महत्वाकांक्षेचा झटका सर्व देशांना दाखवून देत आहे हे जाणवते.

चीनने अरूणाचल प्रदेशाच्या ६ जागांची बदलेली नावे , ’डोकलाम’ नंतर भारतच्या हद्दीत उत्तराखंड येथेल चमोलीच्या ’बाराहोटी’ येथील घुसखोरी ही सारी मानसिक दबाव टाकून थिथावण्याची युध्दतंत्रेच नाहीत का? 

अशा परिस्थितीत भारतीयांनी आपल्या सैन्यावर, जवानांच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसागणिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितींशी सामना करून आपले भारतीय जवान दहशतवाद्यांशीही कडवी झुंज देत आहेत , प्राणपणाने निकराने लढत आहेत. त्याच वेळी चीनचे नेते, वर्तमानपत्रे सतत युध्दाच्या धमक्या देत असूनही भारतीय लष्कर डोकलाम येथून तसूभरही मागे हटले नाही किंवा आपण माघार घेऊ असे चिन्ह ही दिसत नाही.त्यामुळेच चीनच्या ह्या मानसिक दबावतंत्र युध्दाला आम्ही भारतीय भीक घालीत नाही हेच चीनला सप्रमाण दाखविणे हे आम्हां नागरिकांच्याच हातात आहे.

१९६२ सालच्या युध्दाच्या पराभवाची चीन भारताला आठवण करून देतो. आम्ही भारतीय "हिंदी -चीनी भाई भाई " असे जरी गात असलो तरी आमच्या पाठीत सुरा भोसकणार्‍याचे हात देखिल वेळप्रसंगी उखडून टाकतो ह्याचे चीनने स्मरण ठेवणे तेवढेच आवश्यक आहे  मानसिक दबाव तंत्र ह्या युध्दतंत्राला आम्ही भारतीय मुळीच घाबरणार नाहीत , तुझ्यासारख्या नाठाळाच्या माथी सोटा हाणायला शिकविणारी रणनीतिचे धडे आम्हां  भारतीयांकडून आमच्या आर्य चाणक्यांनी आपल्या राज्यअर्थव्यवस्थेवरील ग्रंथातून कधीच गिरवून घेतले आहेत आणि ह्याच रणनीतिच्या आधारे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परीषदेतही भारत चीनच्या डावपेचांना उलथवून आपले स्थायी सदस्यत्व १०८ % मिळविणारच आहे आणि त्याच बरोबरीने चमोलीतून जशी माघार चिनी सैन्याला घ्यावी लागली तशीच माघार डोकलाममधून घ्यावीच लागेल भारताच्या कणखर भूमिकेपुढे हाच विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे आणि असाच वाढत राहील ! 

संदर्भ : 
१. दैनिक प्रत्यक्ष 
२. तिसरे महायुद्ध पुस्तक - लेखक डॉ अनिरूध्द जोशी 
३.http://www.defencenews.in/article/China-claims-Doklam-Plateau-in-Bhutan-to-gain-strategic-edge-over-India-262876

सूचना : "चीनचे मानसिक दबावतंत्र आणि ...  " हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या दि, ०६ ऑगस्टच्या अंकातील "व्यासपीठ" सदरात प्रसिध्द  झाला आहे.  
 

27 comments:

  1. Great analysis, completely relevant with current situation.

    ReplyDelete
  2. Great motivational article...well related WW3 book with current situation.

    ReplyDelete
  3. आपण आत्ताच्या परीस्थितीवर अतिशय मार्मिक आणि सखोल अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. युद्ध प्रथम या मानसिक पातळीवरच लढले जाते. इतिहासात अशा अनेक युद्धांचा उल्लेख आहे. शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यासारख्या रणधुरंधरांनी धक्का तंत्राचा वापर करून अतिशय कमी मनुष्यबळाचा वापर करीत मोठमोठ्या लढाया जिंकल्या. परंतु आज भारतीय सेना आणि रणनीतिचे विचारवंत (वॉररूम स्ट्रॅटेजीस्ट) अजीबात बेसावध नाहीत. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अगदी म्यानमार सुद्धा विचारात घेऊन रणनीतिचे आरेखन चालू आहे. अंतर्गत अस्थिरता हा मुद्दा आता जम्मू - काश्मीर आणि ईशान्य पूर्व राज्यांपूरता आहे पण हीच ती आघाडी आहे जीथे हे भारताचे पारंपारिक शत्रू धडका मारत आहेत. चिनी लोक मुळातच क्रुर आहेत आणि हे तथाकथित जिहादी मुसलमान हे बापाला मारून गादीवर बसणारे आहेत चेंगीज खानाचीच ही खानावळ... ही मंडळी रक्तातच लांड्यालबाड्या, स्वार्थलोलूपता, सत्तेची हाव, आणि यासाठी क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडण्याची मनोवृत्ती हे दोष घेऊन जन्माला येतात. परंतु इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा यांनी मुजोरी केली तेव्हा तेव्हा यांचा फणा चिरडून टाकला गेला. विरोधी शक्तींनी कितीही मोठे रुप धारण केले तरी शुद्ध धर्माची ताकद त्याच्यापुढे अगणित असते. आजपर्यंत सत्याचाच विजय झाला आणि पुढेही होणारच. दैनिक प्रत्यक्ष हा असा पेपर आहे जो वाचकांना केवळ माहिती पूरवत नाही तर सजग करतो सतर्कता वाढवतो आणि त्याचबरोबर मनोधैर्यही. कारण येथे फक्त चर्चा नाही तर त्यावरील उपाययोजनांचे उत्तम विश्लेषण केले जाते. तिसरे महायुद्ध हे डॉ. अनिरुद्ध जोशी यांचे पुस्तक हे पाच खंडातील अशा सर्व गोष्टींचा तौलनिक अभ्यास आहे ज्यानूसार आज घटना घडत आहेत. विचारवंतांसाठीच नाही तर सर्व सामान्य माणसांसाठीही हे पुस्तक संग्राह्य आहे. पुनश्च एकवार या लेखासाठी धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. अजित मालफाटकजी आपण खूप सुंदर रीत्या चीनची पार्श्वभूमी मांडून आपले मत व्यक्त केले आहे. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज , रणधुरंधर राणा प्रताप ह्यांनी देखिल ह्या मानसिक दबाव तंत्राचा वापर मोठ्या कौशल्याने करून बलाढ्य सैन्यबळाच्या शत्रूला चारी मुंड्या चित केले होते. तिसरे महायुद्ध हे एकमेवाद्वितीय पुस्तक आहे जे प्रत्येकाने किमान एकदा तरी जरूर वाचावे असेच आहे ह्यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद.

      Delete
  4. खूप सुंदर लेख :)
    " ज्या प्रदेशावर हल्ला करावयाचा त्या प्रदेशातील लोकांचे मानसिक धैर्य खच्ची करून मगच आक्रमण करायचेह हा मार्ग त्याने अवलंबिला होता." हेच सर्वत्र पहायला मिळतय.
    पण भारतीयांमधे आपल्या देशाच्या हीताची व सुरक्षेची, अनेक पातळ्यांवर वाढत चाललेली जागरूकता फार महत्वाची आहे.
    भारत माता की जय!

    ReplyDelete
  5. very nice n in depth analysis.any war is first fought in our minds n winner of such mound games always wins but wars.our soldiers are high on mental toughness n can defeat counterparts of any country in the world.
    again to mention here is about book world war 3 written by dr.aniruddhas. joshi almost 10/12 years back.
    we are witnessing all the incidentshappening accross the globe as per book only.

    I strongly insist all readers of this blog should buy that book either online from Amazon or aanjaneya publications website or offline from upasana centres n get acquainted with the facts n figures mentioned in it.

    ReplyDelete
  6. You have put the analysis of present situation in a very splendid way. Situation on border front is grim and the need of the hour is to keep our mind focused and strong to sail through the mind game of China a real dragon. All our countrymen should come forward and respond to the mind pressure tactics of China in a broadway via media and should stand firmly at the back of our soldiers and entire defence system irrespective of politics. That's the need of hour.
    However, today's news about forthcoming morcha on 09th August in the financial capital of India is a disturbing news. This morcha and such kind of things all over other states could also be the game plan of the dragon. If a common man understands this, he will refrain from participating in such kind of activities for the country's sake, I feel. Let's all spread the word through whatever the media we have and awaken the people.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Milind Sarpotdar. I second your opinion that common man's awareness is must.

      Delete
  7. खूप सुंदर आणि मार्मिक विश्लेषण केलत तुम्ही.
    चीन जरी अश्या तंत्रांचा वापर करत असला तरी सद्यपरिस्तिथी अशी आहे की चीन भारतावर हल्ला करण्याआधी हजारवेळा विचार करेल.असं म्हणणं सैयुक्तिक ठरेल कि चीन फक्त धमक्या देणार बाकी काही करणार नाही.असं का?कारण
    १.आताच्या काळात भारताशी दुश्मनी घेणं म्हणजे अख्या जगाचा रोष ओढवून घेण्यासारखे आहे ,त्यात भर म्हणून चीनचे जेवढे दुश्मन आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट,तिप्पट भारताचे मित्र आहेत म्हणजे चीनने त्याच्या हेकेखोरपणामुळे आणि दुसऱ्यांच्या प्रदेश मिळवण्याच्या अतिहव्यासापायी जगभरात दुश्मन निर्माण करून ठेवलेत.
    २.चीनची मोठी बाजारपेठ हि भारत आहे म्हणून युद्धामुळे आपल्या बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो हे चीन चांगलंच जाणतो.
    थोडक्यात काय ,आताच्या चीनच्या धमक्यांमध्ये काडीमात्रही धमक नाही असच म्हणावं लागेल. आताचा भारत हा १९६२ पेक्षा बहुतांश गोष्टींमध्ये वेगळा आणि अनेक पटीने सरस आहे.त्यामुळे चीनच्या मानसिक युद्धतंत्राचा भारतावर काही परिणाम होईल असे वाटत नाही.इस्राईलसारख्या देशासोबत मैत्री असंण हे जगभरात भाग्याच समजलं जातं.अश्या देशाशी आपली मैत्री असंण हे भारताच्या हिताचच आहे.क्षेपणास्त्र विकास,जगातील बऱ्याच राष्ट्रांशी वाढत चाललेले मैत्रीपूर्ण संबंध,अंतराळ मोहीम अश्या अनेक हिताच्या गोष्टी भारताच्या बाजूने घडत आहे .तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर भारताच्या हिताच्या अश्या अनेक गोष्टी घडण हे भारतासाठी चांगलंच म्हणावं लागेल.
    होय,तुम्ही जी गोष्ट मांडली आणि अजित मालफाटकजी जी गोष्ट बोलले ते खरंच आहे की डॉक्टर अनिरुद्ध जोशींच्या 'तिसर महायुद्ध' ह्या पुस्तकात मांडलेल्या बऱ्याच गोष्टींचा आणि सध्या घडणाऱ्या गोष्टींशी बऱ्याच अंशी साधर्म्य आहे.सहज ,सोपी भाषा आणि मुद्देसूद मांडणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय घडामोडीसारखा क्लिष्ट विषयही वाचायला,समजायला सोपा जातो.यासाठी लेखकाचं विशेष कौतुक आणि आभार.एकमेवाद्वितीय पुस्तक जे सामान्य माणसांसाठी पण आहे आणि अभ्यासू विचारवंतांसाठी देखील आहे .प्रत्येकाने वाचलच पाहिजे असं हे पुस्तक.Amazon वर मला हे पुस्तक भेटलं होत ,तुम्ही Amazon वर बघू शकता.सुनिता कारंडेजी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद या लेखाबद्दल आणि तुमच्याकडून यापुढे येणारे बरेच लेख वाचायला आम्हाला नक्की आवडेल.

    ReplyDelete
  8. हरि ओम सुनीतावीरा.. आपण अतिशय सुरेख व विस्तृत रित्या ह्या मुद्द्याचे विवरण केले आहे ,खासकरून चांगेसखान व चर्चिल विषयी च्या माहितीमुळे सध्या चीन हि तीच पुनरावृत्ती करत आहे हे लक्षात आले व ह्याची खरोखरच खूप गंभीररीत्या दाखल घेणे फार गरजेचे आहे हे स्पष्ट होते. परमात्म्याच्या अकारण कारुण्यामुळेच व भारतवर्षाच्या उदात्त अंतःकरणामुळे गौतम बुद्धांसारखे थोर सद्गुरुतत्व लाभून हि बुद्धी ताळ्यावर आणता न आल्याचे परिणाम चीन ला नक्कीच भोगावे लागतील, "सांगू एकदा सांगू दोनदा...." ह्या सद्गुरू साईनाथांच्या उक्ती नुसार गौतम बुद्धांच्या द्वारे शांतीचा संदेश देऊन त्यांना जीवनाचे सार्थक करण्याची संधी ईश्वराने नक्कीच दिल्याचे दिसते पण आता मात्र "चिरून व्दिधा टाकू कि... " हाच मार्ग त्यांच्यासाठी योग्य आहे शेवटी आपण आपल्या DAD च्या अग्रलेखात वाचल आहेच हे चिनी म्हणजे ग्रे एलिअनच आहेत त्यामुळेच ते त्यांची मूळ असुरी वृत्ती सोडण्यास तयार दिसत नाही "परी हरी कृपे ह्यांचा नाश अटळ आहे"



    एकंदर खूपच छान माहितीपर लेख आहे,कृपया तुमचे विविध मुद्द्यांवरील लेखन असेच चालू ठेवा,

    Bapu Aai Dada Bless you forever....Shree Ram...Ambadnya...!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Satish Pednekar. In Apt words you have put India's role.

      Delete
  9. Great analysis....
    It is true...!!
    China is a dragon for all other country and it is a current situation

    ReplyDelete
  10. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog