Wednesday 30 August 2017

चीन भारतावर वॉटर वॉर लादू पाहत आहे का?

File image of China's Three Gorges Dam. Reuters


दैनिक प्रत्यक्षच्या २० ऑगस्ट २०१७ च्या अंकातील "भारतातील महापुरामागे चीनचे कटकारस्थान - सामरिक विश्लेषकांचा आरोप " हे पहिल्याच पानावरील वृत्त वाचले आणि बुध्दी चक्रावून गेली. "डोकलाम" प्रश्न सहजासहजी सुटण्याची  दुरान्वये शक्यता दिसत नाही, भारत तर आपले सैन्य तसूभर माघारी घेण्यास तयार नाही, राजनैतिक चर्चेचा भारताने दिलेला प्रस्ताव आपणच धुडकावून लावला आहे त्यामुळे ती संधी आपणच गमावली आहे आणि आता आपल्या साम्राज्य विस्ताराच्या स्वप्नाला सुरूंग लावून भारत चंगलीच खिंडारे पाडीत आहे, आपला शेजारील शत्रू राष्ट्रांना धमकाविण्याचा मनसुबाही त्याने विफल ठरत आहे आणि आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच नाचक्की होऊ शकते ह्या  न्युनगंडाने ग्रासलेला चीन दिवसेंदिवस नवनवीन क्लुप्त्या लढवून भारताला नामोहरम करण्याची एकही संधी सोडीत नाही असे दिसत आहे. मानसिक दबावतंत्र वापरूनही ना भारत द्बत आहे ना भारताचे नागरिक हे पाहून तर चीन आता इरेलाच पेटला आहे जणू ! त्यातील एक भाग म्हणून १५ ऑगस्ट ह्या भारताच्या स्वातंत्र्य दिवशी भारतीय जनता स्वातंत्र्य्दिन साजरा करीत असताना बेसावध असेल असे समजून चीनच्या सैन्याने लडाखच्या पॅंन्गॉंग सरोवराजवळील भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण डोळ्यांत तेल घालून अहोरात्र  जागता पहारा देणार्‍या आमच्या भारतीय जवानांनी चीनच्या घुसखोरीला कडवे प्रत्युत्तर देऊन  तेही मनसुबे हाणून पाडले. चीनच्या अरेरावीला जराही भारत भीक घालीत नाही हे लक्षात घेऊन आता चीन कुटील नीतीचा अवलंब करून भारतात महापूर आणण्याचे सूत्रबध्द कत कारस्थान रचित असल्याचा सामरिक विश्लेषक आरोप करीत आहेत त्यात नक्कीच तथ्य असावे असे दिसत आहे व त्यामागे तसेच सबळ पुरावेही हाती लागत आहेत .           

जपान मध्ये २०११ साली त्सुनामीचे जे अस्मानी संकट ओढावले होते ते सुरुवातीला निसर्गाचा प्रकोप आहे असे आढळले होते आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून गणलेही गेले होते , परंतु काही काळाने ही त्सुनामी ही मानव-निर्मीत आपत्ती असू शकल्याचे आरोप व त्यावर रंगलेले वाद वाचनात आले होते. तेव्हा बुध्दीला खरेच कोडे पडले होते की मानव हा विज्ञानाचा वापर वरदान म्हणून करत आहे की तो शाप ठरावा इतक्या अधोगतीला जाऊन त्याचा दुरुपयोग करीत आहे. त्यानंतरही बरेच वेळा येणार्‍या काळात तिसरे महायुध्द कधीही भडकू शकते ह्यावर अनेकांनी आपली मते मांडली होती आणि ह्यात पाण्यावरून युध्द पेटण्याचच्या शक्यता असल्याचे मतप्रवाह ही वाचनात आले होते. सध्याची भारतात आसाम, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये आलेल्या भयंकर महापुरात होणारी मनुष्यहानी , वित्तहानी पाहता जरी हे निसर्गाचे तांडव आहे असे म्हणावे , तरी त्याच वेळी वास्तव  काही  वेगळ्याच गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करीत आहे ह्याकडे डोळेखांक करून चालणार नाही.  मानवाचा घात होत असतो अंध;कारातच आणि हा अंध:कार असतो  अज्ञानापोटीच ! तो दूर करण्यासाठीच दैनिक प्रत्यक्ष अविरत परिष्रम घेत आहे. त्यामुळेच  ह्या दुर्लक्षिल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण वास्तवाची जाण करून देणार्‍या दैनिक प्रत्यक्ष च्या नागरिकांना सुजाण व  जागरूक बनविण्याच्या कार्याला मनापासून सलाम !

पाणी,अन्न , वस्त्र , निवारा ह्या मानवाच्या अत्यंत मूलभूत गरजा आहेत आणि त्यामुळेच ह्यांचा दुर्भिक्ष्य (अभाव ) म्हणजे जीवन जगण्यावर ओढावलेली आपत्तीच ! सामान्यत: नैसर्गिक आपत्ती (Natural Disasters)  व मानव निर्मित आपत्ती ( Man made disasters) अशा दोन प्रकारांत प्रामुख्याने आपत्तींचे वर्गीकरण होते. वरवर पाहता आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, व बिहार मध्ये उद्भवलेली महापूराची परिस्थिती पाहता हा पूर मुसळधार पावसाने आला असावा असा भारतीयांचा समज झाला होता, पण तो किती फोल आहे हे ह्या बातमीच्या वाचनातून प्रकर्षाने जाणवले. यावर्षी देशातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी कमी आहे आणि विशेष म्हणजे ईशान्य भारतातही पावसाचे प्रमाण वाढलेले नाही. मग हा महापूर आला कसा ? असा साहजिकच प्रश्न उद्भवू शकतो.

चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमधून उगम पावणार्‍या नद्यांचा प्रवाह भारतातून पुढे जातो. या नद्यांवर चीनने लहान - मोठी धरणे , पाण्याशी निगडीत बांधकामे  ( dams, barrages and other water infrastructure ) उभारली आहेत. जेव्हा काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया पाकिस्तानने वाढविल्यानंतर, भारताने पाकिस्तान सोबतच्या "इंडस वॉटर ट्रिटी " (सिंधु जल वाटप )ह्या कराराचे पुनरावलोकन करण्याची शक्यता दर्शविली तेव्हा चीनच्या गळ्यातील कंठमणी असलेल्या पाकिस्तानला वाचविण्यासाठी चीनने भारताला उलटपक्षी ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडविण्याची धमकीही दिली होती. ब्रम्हपुत्रा ही आसाम आणि ईशान्योत्तर राज्यांची जीवन-संजीवनी आहे हे चीन चांगलेच जाणतो, त्यामुळे भारताची गळचेपी करण्यासाठी ब्रम्हपुत्रेचे पाणी अडविण्याचा आडमुठेपणा तेव्हा चीनने धमकीतून उघड केला होता हे आम्हाला विसरून चालणार नाही. त्याच पाण्याचा वापर विपरीत तर्‍हेने करून आता ही चीन भारताला काटशह देऊ पाहत आहे. दुर्दैवाने ब्रम्हपुतेचा उगम हा चीनमधील Yarlung Tsangpo ह्या नदीपासोन होतो व पुढे ती भारतातून व बांग्ला देशातून वाहत जाते. हे जाणून चीनने अतिशय धूर्तपणाने ब्रम्हपुत्रा व इतर नद्यांवर अवाढव्य धरणे बांधून त्यांचे पाणी अडविले आहे
                                                                    
             

२०१३ व २०१४ मध्ये  भारत व चीन ह्या दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय कराराप्रमाणे (bilateral MOUs) चीनने भारताला १५ मे ते १५ ऑक्टोबर ह्या काळात दर वर्षी तिबेटमधील ब्रम्हपुत्रा आणि इतर नद्यांच्या वरील प्रवाहावरील  ३ महत्त्वाच्या देखरेख करणार्‍या स्टेशन्सकडून हायड्रोलॉजिकल डेटा ( धरणांमधून किती पाणी नद्यांमध्ये सोडले जाते व तत्स्म माहिती ) देणे बंधनकारक आहे. पण ह्या वर्षी१५ मे पासून असा कोणत्याही स्वरूपाची माहिती चीनने भारताला पुअरविली नाही आहे. परंतु करारचे पालन करणार्‍या भारताने मात्र ह्याची रक्कम नियमाप्रमाणे आधीच चीनला दिली आहे असे सूत्रांच्या माहिती नुसार कळते

तसे चीन अनेक वेळा आंतरराष्ट्रीय कायद्यांना आपण मानत नसून, त्याचे पालन करणे चीनला बंधनकारक नाही अशी बेताल वक्तव्ये वारंवार करीत असल्याचेच निदर्शनास येते. त्यामुळे भारत व चीन मधील ह्या द्विपक्षीय करारालाही चीनने झुगारल्याचे नाकारता येत नाही. या उलट भारत मात्र नीती -नियमांचे पालन करून आपल्या शेजारील पाकिस्तान व बांग्लादेश ह्या राष्ट्रांशी झालेल्या पाणी वाटप करारानुसार त्या देशांना आपल्या देशातील नद्यांच्या धरणांवरील हायड्रोलॉगिकल डेटा  पुरविताना कोणतेही मूल्य आकारत नाही अशी माहिती वाचनात आली.
                                                                  
      

दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशी ह्यांनी लिहिलेल्या "तिसरे महायुध्द " ह्या  पुस्तकात त्यांनी महायुध्द म्हणजे काय हे सांगताना असे लिहिले आहे की युध्दाचे उद्दिष्ट शत्रुपक्षाला शरण आणून त्याच्यावर आपली इच्छा लादणे हेच असते. ह्यात त्यांनी ’क्लाओसवेत्ज’ (कार्ल फॉन क्लाओसवेत्ज , १७८० ते १८३१)’ ऑन वॉर ’ ह्या महान ग्रंथाच्या लेखकाचे मत प्रतिपादीत केले आहे -
’ ऑन वॉर ’ च्या सिध्दांतानुसार युध्द म्हणजे आपल्या स्वार्थासाठी शत्रूला आपल्या इच्छेनुसार बलप्रयोगाने वाकविणे, ह्यात दयाळूपणा, सौम्यता, वेळकाढूपणा व नैतिकता ह्यांना जराही स्थान उरत नाही. वाटेल ते करून शत्रुपक्षाचे सामर्थ्य व वैभव पूर्णपणे उध्वस्त करणे, हेच युध्दाचे एकमेव उद्दीष्ट असते.चीनचे सद्य परिस्थितीतील महापुराचे कटकारस्थान हेच दाखवून देत आहे. 

चीनवर भारताने कारवाई केली तर त्यांच्या आर्थिक नाड्या भारतालाही आवळता येतील ह्याचेही भान चीनने अवश्य बाळगावे. तिबेटचा लचका चीनला केवळ भारताच्या मूर्खपणामुळे तोडता आला तेव्हाचा भारत वा १९६२ साली हार मानणारा भारत आणि आताचा भारत व भारताचे बलाढ्य व सामर्थ्यस्थान, जागतिक पातळीवरील भारताचे वाढते वर्चस्व ह्यात जमीन-अस्मानचा फरक आहे हे चीननेही नक्कीच ध्यानात ठेवावे. 

सूचना - 
१.  "तिसरे महायुध्द " हे पुस्तक मराठी , हिंदी व इंग्लिश अशा भाषा मध्यें उपलब्ध आहे -
२. `Third World War eBook by Aniruddha D. Joshi - Amazon Kindle Edition
३. हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या ३० ऑगस्ट २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता. 

4 comments:

  1. Article is very informative. Indeed China is using all alternatives to irritate India. With huge dams built by China@ strategic locations, v r under constant threat of man-made flooding.

    ReplyDelete
  2. Very much Informative Article..one can get whole idea and study how China is backstabbing India in all possible ways. References from Third world war book are mind blowing. Infact, I read this Book written by Dr Aniruddha Joshi..Hatts off to him and his studies and Visualisation..he has given wholesome knowledge and preventive measures to simple common man in clean, clearcut and precise way.
    Thanks a lot Sunitaji.

    ReplyDelete
  3. Very true.. Suneetaveera. Ambadnya.

    ReplyDelete
  4. दैनिक प्रत्यक्ष चे कार्यकारी संपादक डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी लिहिलेल्या तिसरे महायुद्ध ह्या पुस्तकात त्यांनी महायुद्ध म्हणजे काय हे सांगताना.

    "आता युद्ध हे केवळ सीमेलगतच मर्यादित राहिले नसून ते प्रत्येकाच्या घराघरात येऊन पोहोचले आहे" असे हि स्पष्ट सांगितले आहे ,आणि चीन मध्ये उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदी वरील बांध,साऊथ चायना सी वरील व डॉकलाम मधील दादागिरी,,भारताकडे निर्यात होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये विषारी तत्वांची भेसळ करणे वैगेरे वैगेरे हे निर्भर्त्सना करण्या योग्य चीनच्या कुकृत्यानि डॉ अनिरुद्ध जोशी च्या ह्या वक्तव्यांची जणू सत्यरूपात पूर्तता होतानाच दिसत आहे.

    दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा जर्मनी ने इतर राष्ट्रांबरोबर झेकोस्लोव्हाकियाला सुद्धा गिळायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या बाजूने फ्रान्स व इंग्लंड ने मदतीचा करार केला असूनही कोणी हि त्याच्या बाजूने लढण्यास आले नाही व सोयीस्कर रित्या तो मंत्री करार विसरला गेला म्हणून आम्हाला वाचवायला बाहेरून कोणी येतिल असा विचार करणे आता थांबवले पाहिजे स्वतःचे रक्षण करण्यास स्वतःच समर्थ बनायला हवे हे ३ ऑकटोबर २००२ च्या प्रवचनात बोलताना डॉ. जोशी म्हणाले होते.

    तसेच आज चीनही त्याचा नकाशा चौपटीने वाढविण्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी जर्मनीचाच कित्ता गिरवताना दिसत आहे .व आपणही मित्रराष्ट्राच्या पाठिंब्याने हुरळून न जाता स्वसमर्थ बनण्याच्या दिशेने आपली पावलं तेज करणं फार गरजेचं आहे.

    आपल्याला तिसरे महायदुद्ध हे पुस्तक वाचताना ह्या संपूर्ण इतिहासाचा आढावा घेत येणाऱ्या काळातील युद्धजन्य स्थितीची बीजे फार पूर्वीच रोवली गेली आहेत व बऱ्याच घडामोडी समतुल्य प्रमाणात तशाच घडतही आहेत असेच प्रकर्षाने जाणवते. व डॉ. जोशींच्या तिसरे महायुद्ध हे पुस्तक लिहिण्यामागच्या भूमिकेची व जागतिक स्तरावरील विस्तृत घडामोडीं विषयीच्या सखोल अभ्यासाची कल्पना येते.

    ह्या लेखातही सौ सुनीता ह्यांनी ह्याच विषयावर खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog