Wednesday 18 November 2015

HAPPY BIRTHDAY OUR BESTEST DAD !!! We Love YOU DAD !!!

हरि ॐ.
माझ्या जीवनाचा एकमेव सच्चा सांगाती - माझे सदगुरु, माझे लाडके बापू म्हणजेच डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी !


तुम ही हो माता पिता तुम्ही हो
तुम ही बंधू , सखा तुम्ही हो

तुम्ही हो साथी तुम ही सहारे
कोई न अपना सिवाए तुम्हारे

तुम्ही हो नैया तुम्ही खिवैया
तुम ही हो बंधू सखा तुम्ही हो ...

जो खिल सके न वो फूल हम हैं
तुम्हारे चरणों की धुल हम हैं

दया की दृष्टि सदा ही रखना
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो...





हे भजन ऐकताना नयनचक्षूंपुढे साकार होते ती फक्त माझ्या गुरुमाऊलीची सावळी सुंदर गोजिरवाणी छबी !!! 
आपण पाहतो की सर्वसाधारणपणे एखाद्या बाळाचे संगोपन करताना कधी मातेला पित्याची  धाकाची, करड्या व्यक्तीमत्त्वाची भूमिका निभवावी लागते तर वेळप्रसंगी एखाद्या पित्याला प्रेमळ , समंजस मातेची भूमिका निभवावी लागते. पण एकाचे वेळी आई- वडीलांची भूमिका आणि त्याच बरोबरीने व तेवढ्याच ताकदीने भावाची, बहिणीची , मित्राची , मैत्रिणीची अशा सगळ्याच भूमिका कोणी एकच व्यक्ती पार पाडू शकणे तसे बघायला गेले तर केवळ अशक्यप्रायच! कारण आई-वडील बनणारी व्यक्ती , कदाचित समवयस्क बहीण-भावाची वा मित्र-मैत्रीणीची भूमिका करताना कधी वयाची आडकाठी बनू शकते. म्हणजेच एकच व्यक्ती सर्वच्या सर्व नाती व्यवस्थितपणे पूर्ण न्याय देऊन कोणतीही तडजोड न करता निभावून नेणे मला तरी अवघ्हदच वाटते. पण जो स्वत: "अनिरुध्द" आहे त्याला कोण अडवू शकणार ? जो कशानेही अवरूध्द होऊच शकत नाही, ज्याला कोणी, कधीच, कुठेही, कशानेही रोखूच शकत नाही अशा सर्वसमर्थ-सर्वार्थसमर्थाला म्हणूनच कोणतीच गोष्ट  अशक्य नसते. असा हा सर्वांचा सर्वस्व असलेला माझा सदगुरु , माझा बापूराया !
माणसाच्या जीवनात सुख-दु:खाचे चढ-उतार, उन्हाळे-पावसाळे सदैव चालूच असतात. जोवर धन-दौलत, प्रतिष्ठा, मान -मरातब, ऐश्वर्य ही सुख- समृध्दीची साधने हात जोडून उभी असतात तेव्हा सगळेच साथ द्यायला तयार असतात. पण जेव्हा ह्याच गोष्टी साथ सोडून देतात तेव्हा खर्‍या भक्कम आधाराची ,पाठीवरून मायेने फिरणार्‍या हाताची, केवळ खांद्यावरच्या हाताच्या स्पर्शाने जाणीव करून देणार्‍या अढळ साथीची नितांत गरज असते आणि त्यावेळी "माझा कुणा म्हणू मी " असा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावत राहतो. कधी कधी सगळी नाती एकाएकी परकी होऊन जातात, कोणतेच नाते मनाला भावत नाही आणि तरीही असा एक मैत्रीचा, जिव्हाळ्याचा , मायेचा आधार हवाहवासा वाटतो की जो अंधाराचे जाळे चिरून येईल आणि मला अलगद आईच्या मायेने कडेवर उचलून घेऊन, बापच्या प्रेमाने  होरपळणार्‍या आगीपासून , कासावीस करणार्‍या वेदनां पासून , जीवघेण्या चटक्यांपासून दूर ठेवेल आणि अंधारातून प्रकाशाची वाट दाखवेल. कधी कधी नाका-तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरून टाकणारा पूर येतो आणि मला कितीही याचना करून मदतीचा हात ही मिळत नाही. म्हणजेच मत्स्यावतार धारण करून माझ्या जीवनात होणार्‍या जगबुडीतून स्वत: नाव आणि स्वत:च नावाडी बनून वाचविणारा , कूर्मासारखे पाठीवर कठीण कवच घेऊन बिकट परिस्थितीत संरक्षण करणारा, मी रसातळाला गाडला जात असताना वराह अवतार धारण करून माझा उध्दार करणार - माझ्या जीवनाचा एकमेव सांगाती, माझा सच्चा सांगाती मला सतत हवा असतो. 


अशी सर्व नाती समर्थपणे पेलणार्‍या आणि तीनही काळी, अहोरात्र साथ देणार्‍या माझ्या सदगुरुला , माझ्या गुरुमाऊलीला , माझ्या जनक-जननीच्या चरणी माझे वारंवार लोटांगण आणि सदभावाने शरणागती ! 
श्रीसाईसच्चरितातील एक ओवी -
" इतर देव सारे मायिक । गुरुचि एक शाश्वत एक । चरणी ठेविता विश्वास देख । रेखेवर मेख मारी तो।। " ह्याची साक्षात प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे माझे बापू - माझी सदगुरुमाय !
माझे बापू , माझी सदगुरूमाय अशीच दयेचा अपार सागर . करूणार्णव , द्याघन ! "लाभेवीण प्रेम" फक्त माझे बापूरायच करू जाणो जेथे कशाकशाची आस नसते एक प्रेमाशिवाय ! 

मनाच्या न नांगरलेल्या भूमीवर अहल्येवर नांगर फिरवून , त्यातील कुचकामी , निरूपयोगी अनुचित गोष्टींची तणे दूर करून माझा बापू  - माझा  सदगुरु  माझ्या मनरूपी शेताची मशागत करणार्‍या जातिवंत शेतकर्‍याच्या भूमिकेतही  वावरतोच. 

एखाद्या दगडातील अनावश्यक भाग काढून टाकला की त्यातून सुंदर , सुबक शिल्प साकार होते असे माझ्या जीवनीचे शिल्प साकार करणार्‍या  माझ्या सदगुरुंच्या प्रेमाचे हे स्तवन . कोणत्याच शब्दांनी परिपूर्ण होऊच शकत नाही.

आज माझ्या गुरुमाऊलीचा -  माझ्या बापूंचा  जन्मदिवस, त्या निमीत्त्ताने ही गुणसंकीर्तनाची पुष्पांजली त्यांच्या चरणी समर्पित! 

अखिल जगताचा समर्थ , मूळ आधार असणारे दत्तगुरु आमच्या बापूंना उदंड आयुष्य देवो,हीच तुमच्या चरणी प्रार्थना !

हे आदिमाता माय चण्डिके माझ्या प्रेमळ पित्याला, माझ्या गुरुमाऊलीला, माझ्या बापूंना उदंड आयुष्य़ लाभो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER !!!

हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ

संदर्भ:   http://aniruddhakaladalan.blogspot.in/



3 comments:

  1. हरिॐश्रीरामअंबज्ञ

    ReplyDelete
  2. Kharach....
    Jethe jato tethe tu maza sangati...
    Unconditional love he fakt sadguruch,
    Aapala bapuch karu shakato.
    Ambadnya

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog